आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 5, 2012

पालक व बटाटा भाजी

                                                 ॐ
पालक व बटाटा भाजी :पालक देठा काड्यासगट पालकाची पानं निवडून घ्यावीत.
बटाटा एक घ्यावा बटाटा व पालक निवडलेले धुवून घ्यावे.पालक चिरुन घ्यावा.
बटाटा सालासगट चिरावा.बारीक चिरावा.तेलाच्या फोडणी मध्ये मोहरी टाकून
फोडणी करावी.प्रथम फोडणी मध्ये बटाटा घालावा.कळत नकळत पाणी घालावे.
बटाटा शिजवून घ्यावा.पालक चिरलेला बटाटा मध्ये घालावा.परत थोड पाणी घालून
बटाटा व पालक शिजवून घ्यावे.पालक व बटाटा मध्ये हळद हिंग तिखट मीठ घालावे.
परत बटाटा पालक याला वाफं आणावी.भाजीतले पाणी अगदी संपवू नाही पण कोरडी करावी.
कोणती ही पालेभाजी तुरट असते.म्हणून पालेभाजीला कांदा बटाटा हरबरा डाळीचे पीठ लावतात.
चव पण गोड लागते.
घरोघरी पालक बटाटा पालेभाजी करतात.

                                               DSCF2247 

                                              DSCF2248

%d bloggers like this: