आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 7, 2012

माघ पौर्णिमा


स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर उत्तरायण शिशिरऋतु नक्षत्र पुष्प रास कर्क मंगळवार माघ शुक्लपक्ष तसेच ७ फेब्रुवारी(२) २०१२ तारीख

दिनांक ला माघ पौर्णिमा आहे.

माघस्नान समाप्ति पौर्णिमा च्या शुभेच्छा !

DSCF1362  DSCF1361

बिट

                                                               ॐ
बिट : बिट याचे किसून दही घालून हिरवी मिरची मीठ शेंगदाणे याचा कूट घालून
कोशींबिर करतात. मिक्सर मधून काढून जांब साखर घालून करतात.बिट चिरून शिजवून
भाजी करतात.मी बिट धुवून मोठ्या फोडी करून उकडून घेतले. कुकर मध्ये पाणी घातले.
पाण्यात चिरलेले बिट घातले. चार पाच शिट्ट्या दिल्या. कुकर गार घाल्यावर चिरलेले बिट
पातेल्यात काढले. बिट गार झाल्यावर सालासगट बारीक बारीक चिरले. मी विळीने चिरायचे
काम करते.अजून ही मला विळी ने चिरायची सवय आहे. सुरी चाकू पेक्षा विळी ने चिरणे आवडते.
चिरलेल्या बिट मध्ये हळद हिंग लाल तिखट मीठ लिंबाचा रस शेंगदाने याचा कूट घातला.
कच्चं तेल घातले. प्रत्येक वेळेला फोडणी पेक्षा कच्च तेल वापरावे.कच्च तेलाची चव वेगळी लागते.
कोशिंबीर किंवा भाजी तयार झाली.कुकर मध्ये बिट याचे लाल पाणी राहते. त्या पाण्यात थोडे तांदूळ
हिरवे मुग सडलेले फोडलेले पाण्यात टाकून हिंग हळद लाल मिरची पावडर मीठ घालून छान बिट तांदूळ
हिरवे मुग याची खिचडी तयार करावी. कुकर गार झाल्यावर तेलाची मोहरीची फोडणी करून बिट तांदूळ हिरवे मुग
खिचडी वर टाकावी.पचण्यास हलक पोट भर होतं.बिट याचा वापर पण पूर्ण होतो.
घरोघरी बिट याचा वापर भाजी करण्यात वापरतात.

                                     DSCF2253

                                   DSCF2257

%d bloggers like this: