आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 10, 2012

माघ संकष्ट चतुर्थी

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर उत्तरायण शिशिरऋतु नक्षत्र पूर्वा रास कन्या माघ कृष्णपक्ष संकष्ट चतुर्थी आहे. तसेच दिनांक तारीख १० फेब्रुवारी ( २ )२०१२ संकष्ट चतुर्थी आहे.कांही ठिकाणी शनिवार ११ फेब्रुवारी ( २ ) २०१२ तारीख दिनांक ला पण संकष्ट चतुर्थी आहे.

संकष्ट चतुर्थी आहे मी पेढे याचे मोदक केले आहेत. मैदा व ख्वा साखर याचे मोदक करतात.

मी कणीक मध्ये तेल मीठ घालून दुधात मळवून तिंबून भिजवून घेतली कणीक याचा गोळा केला.

हातानेच पेढे मऊ केले. हातानेच तींबलेला कणीक याचा गोळा घेतला.हातानेच गोल गोल पात पाती केले.

पाती मध्ये मऊ केलेला पेढा भरला मोदकाचा आकार दिला.तुपात कणीक पेढा याचे तयार केलेले मोदक

तळून काढले. मोदक केले की त्या बरोबर करंजी करतात करंजी केली की त्या बरोबर मोदक करतात.

मी एक करंजी केली आहे.

घरोघरी मोदक व करंजी करतात.

DSCF2279

घंटा

घंटा: घंटा मी कांही ब्लॉग पूर्वी मध्ये दाखविली आहे.  घंटा पितळी स्टील चांदी मातीची पण शोभे साठी घंटा असते.

घरातील देवातं डाव्या हाताने घंटा व उजव्या हातात आरती असते.घंटा वाजवून आरती करतात. गणपती देवी दत्त महादेव बरेच देवळात घंटा टांगलेली असते.

उजव्या हातील चार बोटांनी देवळात घंटा वाजवितात. 

घंटे चा आवाज नाद मधुर असतो. घंटे ला हातातील बोटांचा स्पर्श व घंटा याचा आवाज घुमतो. घंटा ऐकून ब्रह्मांड जवळ गेल्या सारखे सारखं वाटतं.

कोल्हापूर महालक्ष्मी च्या देवळात सकाळी पाचं ५ वाजता काकड आरातीच्यावेळी घंटा वाजवितातं तो आवाज महाद्वार पर्यंत ऐकु जातो. एवढी मोठी घंटा व घंटा चा आवाज असतो. कोणी कोणी हॉल मध्ये टांगून ठेवतात. बाहेर जातांना घंटा वाजवून घंटा याचा आवाज ऐकून बाहेर पडतात. 

सतार वाजवितांना तारांचा आवाज ऐकू चांगला येतो. खूप रियाज झाला की ब्रह्मांड पर्यंत माणूस जातो. मी खूप सतार वाजविली आहे.रियाज केला आहे. कोणतही वाध्य याचा आवाज बराचं वेळ घुमतो. घर देऊळ शाळे मध्ये पण तासाला घंटा वाजवितात. तो पण आवाज घुमतो. घंटे चा आवाज, वाध्य याचा आवाज घुमून नाद मधुर होऊन ब्रह्मांड सापडतं. घर देऊळ भरून जात. घरोघरी घंटा असते.

 

%d bloggers like this: