आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 11, 2012

दही

                                                            ॐ
दही: दुपारी तीन साडेतीन वाजता चहा करतांना प्रथम आपल्याला हवं तेवढ दुध व दुधावर आलेली साय चीनी मातीच्या
बरणीत काढून घ्यावी.अर्धावाटी ताक किंवा दीड चमचा दही दूध व साय काढलेले त्यात घालावे.दुसरे दिवशी सकाळी सात आठ
वाजता त्या चे दही झालेले असते.थोड आंबट असते.आपण जसे विरजण लावतो तसे दही गोड आंबट असते.ताका करता दही
आंबट चांगले असते.
दही ह्यात साधे पाणी घालून ताक करावे.फ्रीज चे पाणी घालू नये.रवीने ताक करावे.दोन्ही हाताने मागेपुढे दही पाणी चांगले
घुसळले जाते.लोणी पण येते.ताक जेवतांना वाटीत वाढायची पद्दत पध्दत आहे.कोणी ताक मीठ लावून पितात.शेवटच्या
भातावर ताक दूध किंवा दही मीठ घालून खातात.ताका मध्ये साखर घालून लस्सी करतात.ताकात आलं हिंग मीठ घालून
पितात.कोणी ताकात हिरवी मिरची कुटून मीठ घालून पण ताक पितात.
दही पोहे पण करतात.पोहे पाण्यात भिजवून पाणी काढून टाकायचे पोह्या मध्ये दही मीठ हळद हिंग घालून तेलाची मोहरीची
फोडणी करून पोह्या मध्ये घालून दही पोहे करतात.
अशा प्रकारे दही तक याचा खाण्यासाठी दही ताक वापर घरोघरी करातात.
दही ताक घरोघरी खातातं.

DSCF2264  DSCF2265

%d bloggers like this: