आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 13, 2012

आरोग्य

                                                               ॐ
आरोग्य : नियमित जेवण करायला हवे.स्वंयपाकात साखर गुळ याचा वापर करु नये. गोड रोज फार खावू नये
चाहा कॉफीत साखर असते तेवढी बसं होते.गोड पदार्थ आठवड्यात एकदा खाण्यास हरकत नाही.पाले भाज्या जास्त
प्रमाणात खाव्यात. कोबी फ्लावर कमी खावा.बीट काकडी गाजर भरपूर खावे.आठवड्यात एकदा वेगवेगळ्या भाज्या खाव्यात.
मुग चवळी हिरवे पांढरे हरबरे पाण्यात भिजवून मोड न आणता तसेच कुकर मध्ये पाचं सहा शिट्या देवून मीठ तिखट हळद हिंग
घालून उसळी सारखे करून खावे.रोज एक फळ खावे.संत्र केळ पपई ऋतू प्रमाणे जसे फळ मिळेल तसे खावे.ताका पेक्षा दुध प्यावे .
कधी पोळी कधी भाकरी करावी आंबलेले ईडली डोसा खावू नये नारळ खराब झालेले खावू नये.शेंगदाने दाणे तीळ वापरावे पदार्थामध्ये
लवंग दालचीनी मिरे रोज वापरू नये.मसाला फार वापरू नये.
नियमित झोप फिरणे असावे.वर्तमानपत्र नियमित वाचावे.रेडीओ वरची गाणी ऐकावी.फार सिरीयल पाहत बसू नये.एखादी पहावी.
बातम्या ऐकाव्यात.फोन करून नातेवाईक यांना आज आपण काय केले ते सांगावे.कोणतं ही लिखान रोज करावे.वहीत श्र्लोक मंत्र लिहून
काढावे.रोज सकाळ संध्याकाळ रामरक्षा महावी गणपती स्तोत्र म्हणावं.महिनात एकदा डॉक्टर ला तब्येत दाखवावी.

                                          DSCF2270

हिरवे टमाटो

                                                     ॐ
हिरवे टमाटो : हिरवे टमाटो ची चिरून हरबरा डाळी चे पीठ लावून भाजी करता.
मी हिरवे टमाटो ची चटणी केली आहे.प्रथम हिरवे टमाटो धुवून घ्यावेत.
जाडसर चिरावे.तेलावर परतून काढावे. तीळ भाजलेले बारीक मिस्कर मधून करून घ्यावेत.
गार झालेले टमाटो तीळ कूटात टाकावे. त्याबरोबर आवडी प्रमाणे हिरवी मिरची मीठ टाकावे.
परत सर्व मिस्कर मध्ये बारीक करावे.काचेच्या सटात काढावे काढावी.परत तेल मोहरी ची फोडणी
करावी.फोडणी गार करून हिरव्या टमाटो चटणी त घालावी.हळद टाकू नये.टमाटो चा हिरवा रंग चांगला
दिसतो.हिरव्या टमाटो त तीळ कूट असल्यामुळे हिरव्या टमाटो ला तिळाची चव चांगली लागते.
घरोघरी हिरवे टमाटो वापरतात.हिरव्या टमाटो ची भाजी चटणी करतात.

                                          DSCF2274                                                                     DSCF2269

%d bloggers like this: