आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 14, 2012

आयुष्याचे शंभर वर्ष

आयुष्याचे शंभर वर्ष
आयुष्याचे शंभर वर्ष लाभले
मानवी देहाचे सार्थक झाले आणि केले
आयुष्य बाल पणाचे सुखाचे गेले
सासरी माहेरी अंगणी खेळले
साथीदारा बरोबर सर्व तऱ्हेचे दिवस घालविले रमविले
कधी वस्त्रे होती धड नेसायला तर कधी दांडीची लुगडी पांघरायला
मुले नातवंडे पतवंडे सारी लाभली तिला गुणाची
तिची ही माया त्या लेकरावरती अति प्रेमाची
उंची भरजरी वस्त्रे ही नात सुनांनी घेतली
दर्शनासाठी तिने नेसली आंनदाने आशीर्वाद दिले
जीवन मान अपमान चे सुख दु:खा चे गेले
त्याचे उच्चारण मात्र कधी नाही केले
देह मात्र थकला थकला सोशीकपणा च गुण आपला केला
देवाशी मागे एकच मागणे देह आत्मा सैदेव सुंदर व्हावा
तुझाच आशीर्वादाने

सौ सुनीती रे देशपांडे

दही पोहे

                                                           ॐ
दही पोहे : प्रथम पोहे चाळणी घेऊन चाळून घ्यावेत.पोहे पातेल्यात काढून पाण्यानं धुवून काढावे.
थोडे भिजल्यावर पोहे मध्ये हिरवी कुटलेली मिरची मीठ हळद हिंग टाकावे. दही पोहे ओले होई पर्यंत
भरपूर टाकावे. तेल मोहरी याची फोडणी करावी.फोडणी गार करावी.नाहीतर पोहे गरम होतात.फोडणी
गार घाल्यावर दही पोहे मध्ये घालावी.फोडणी दहीपोहे एक सारखे डावाने चमचा ने हलवावे.डिश मध्ये
खाण्यास द्यावे.
घरोघरी दही पोहे करतात.

                                              DSCF2267

%d bloggers like this: