आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 16, 2012

लाल भोपळा ची भाजी

                                                                    ॐ
लाल भोपळा ची भाजी : लाल भोपळा मध्ये बिया असतात.त्या काढून घ्यावात.उन्हात वाळवून
सोलून खाव्यात.भोपळा धुवून घ्यावा.साल काढून मोठ्या मोठ्या फोडी कराव्यात.पातेले पेटलेल्या
ग्यास वर ठेवून पातेल्यात सादूक तूप भरपूर घालावे जिरे घालावे तूप व जीरे याची फोडणी झाल्यावर
चिरलेला लाल भोपळा तूप व जीरे ह्या फोडणीत घालावे.दोन वाट्या पाणी घालावे. दोन हिरव्या माराच्या घालाव्यात.
साखर गूळ कांही घालू नये लाल भोपळा ला गोड चव असते.पाणी व लाल भोपळा शिजल्यावर त्यात मीठ व भाजलेले
साल काढलेले शेंगदाणे याचा कूट दोन चमचे घालावा.परत पाणी लाल भोपळा शेंगदाणे याचा कूट मिरची मीठ सर्व
परत थोड्यावेळ शिजवू ध्यावे.भाजी शिजतांना पातेल्यावर झाकणं ठेवावे वाफ बाहेर जात नाही उतू जात नाही याची
पण काळजी घ्यावी. लाल भोपळा तूप जीरे हिरवी मिरची मीठ शेंगदाणे कूट सर्व एकत्र लाल भोपळा याची तयार झाली.
लाल भोपळा ची भाजी उपवास याला पण चालते.घरोघरी लाल भोपळा याची करतात.

                                             DSCF2293                  DSCF2284                                DSCF2285

श्रीरामदास नवमी

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर उत्तरायण शिशिरऋतु
नक्षत्र ज्येष्ठा रास धनु माघ कृष्णपक्ष नवमी व दशमी एक दिवस आली आहे.
नवमी ९ गुरुवार श्रीरामदास नवमी आहे. तसेच दिनांक तारीख १६ फेब्रुवारी (२) २०१२
आहे.

|| श्री हरि : ||
श्रीसमर्थ रामदासस्वामीविरचित
मनाचे श्लोक व करुनाष्टके
( मराठी )

||श्री राम ||
गणाधीश जो सर्वां गुणांचा |
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा |
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा |
गमूं पंथ आनंत या राघवाचा ||१||

मना सज्जना भक्तिपंथेचि जावें |
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें |
जनीं निंद्द तें सर्व सोडूनि द्दावें |
जनीं वंद्द तें सर्व भावें करावे ||२||

प्रभाते मनी राम चिंतीत जावा |
पुढें वैखरीं राम आधी वदावा |
सदाचार हा थोर सांडू नये तो |
जनीं तोचि तो मानवीं धन्य होतो ||३||

मना वासना दुष्ट कामा नये रे |
मना सर्वथा पापबुध्दि नको रे |
मना धर्मता नीति सोडूं नको हो |
मना अंतरी सार विचार राहो ||४||

DSCF2288

%d bloggers like this: