आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 19, 2012

सुबत्ता

सुबत्ता आणि समाधान: भारत देश शेती प्रधान देश आहे. पूर्वी एकत्र कुटुंब शेती असे घरातील आई (आजी) सर्व अधिकार पणे पाहतं असतं. मूले व सूना सासुबाई चं ऐकत असत. शेता मध्ये गारागोटी येत असत. प्रत्येक घराणं आमचे आंबे खावयाला या एक एक दिवस असे. टोपली च जवल ठेवत असत. पूर्वी दुकानात जाऊन लुगडे घेवयाची पध्दत नव्हती घरीच नवीन कपड्याचे कपड्याला नवा वास असतो. तसे येत माझ्या काकू आई त्यातील हवे त्या रंगाचे लुगडे जोडीने घेत असत. माझ्या आई पैठणी व काकू चा शालू डोळ्या पुढे आठवतो. वडिलांचे धोतर कोट पांढरी व काळी टोपी आठवते. माझी आई नवरात्राचे उपवास करत सर्वांना भगर देत असत. पूर्वी ज्वारीच्या लाह्या असत. मोठ्ठ पातेले भर असायचे काकू सर्वांना वाटी वाटी देत असे. सुबत्ता त्या मनाने कमी होती पण लोक समाधानी असायचे.

पूर्वी घरात बाज असयाच्या सतरंजी घोंगडी हिरावळ सोलापूर चादर असायचे घराण्यात कोणी युनरसिटीत पहिला आला तर गावात पेढे वाटत असत.नातू मुलगा अमेरिकेला जात असेल तर गावातील शेतावर काम करणारे मुंबई विमानातळा वर येत असतं. मार्केट मध्ये भाजीवाले फलवाले छान राहतात.नळ दुरस्ती वाले लाईट दुरस्ती वाले मोटर सायकल फटफटी नी येतात. तसा पैसा असतो त्यांचा कडे. काम करतात. धून भांडी वाल्या बायका छान साडी नेसून हातात बांगड्या कपाळी कुंकू नाकात चमकी घालतात. कष्ट करतात, पैसा कमावून समाधानी राहायचा प्रयत्न असतो. सगळी कडे ताशे राहणीमान सुधारत आहे, हळू हळू सुबत्ता पसरत आहे.

सुबत्ते बरोबर समाधानी स्वभाव अत्यंत गरजेचा आणि ही सोपी व साधी गोष्ट लक्ष्यात आल्या नंतरच खरी प्रगती साध्य होते.

मनाचे समाधान हीच खरी सुबत्ता आहे.

%d bloggers like this: