आपले स्वागत आहे!

महाशिवरात्रि

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतु
नक्षत्र श्रवण रास मकर माघ कृष्णपक्ष १४ सोमवार महाशिवरात्रि शिवरात्र शिवपूजन आहे. तसेच तारीख दिनांक २० फेब्रुवारी(२) २०१२ सोमवार आहे. महादेव याची पूजा व उपवास करतात.

तेरावे ज्योतिर्लिंग : भारतात भगवान शंकराची बारा ज्योतिर्लिंगं आहेत. परंतु तेरावे तेरावं ज्योतिर्लिंग मॉरीशस मध्ये आहे. मॉरीशस मधील एक शिवमंदिर जगातील १३ वं ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिध्द आहे.

पृथ्वीच्या नकाशात ठिपक्या एवढं दिसणारं मॉरीशस हे एक नितांत रमणीय बेट आहे.या बेटाला ‘भूतलावरचं नंदनवन’ म्हणतात.या देशाला ‘मॉरीशस’ हे नाव का पडलं यामागे इतिहास आहे.

प्रभू रामचंद्राने ज्यावेळी रावणाचा पराभव केला त्यावेळी ‘मारिच ‘राक्षसाचे वंशज ‘द्वीप’ ‘व्दीप’ या बेटावर पळून आले,त्यामुळे या बेताला ‘मॉरीशस’ हे नाव पडलं पडले. हे बेट हिंदी महासागरांत आफ्रिके जवळ आहे.याची लांबी दक्षिणोत्तर ३९ मैल आहे.पूर्व -पश्र्चिम रुंदी २९ मैल आहे.एकूण क्षेत्रफळ ७१६ चौरस मैल आहे.शेती प्रधान देश आहे. मॉरीशस मध्ये भारतीय लोकांची संख्या खूप आहे. हे मंदिर गंगा तलावाच्या काठी आहे.याला ‘परी तलाव’ पण म्हणतात.

भारतात रामेश्र्वर केदारनाथ देवळांना महत्व आहे तसेच १३ तेरावं ज्योतिर्लिंग मॉरीशस मंदिर याला महत्व आहे.

घरातं देवातं महादेव नंदी असतो त्याची पूजा केली तरी घर बसल्या महादेव याची मनोभावे पूजा करतात होते.

घरोघरी महादेव व नंदी देवातं पूजेत असतात.

तेरावे ज्योतिर्लिंग : या मंदिराचा संबंध एका चमत्कारी घटनेशी निगडीत आहे.या मंदिराच्या प्रतिष्ठापना समारोहाच्या पाचव्या दिवशीच म्हणजे २ मार्च १९८९ रोजी सायंकाळी पाचच्या ५ सुमारास अचानक आकाशांत काळे ढग जमले, विजा कडाडू लागल्या आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्याचा वेळी मंदिराच्या घुमटावर एक दिव्य ज्योती अवतरली आणि तिने त्रिशूळा द्वारे शिवलिंगात प्रवेश केला.हे सगळ
एका क्षणात घडलं.त्यावेळी तेथील कमांडिंग ऑफिसर गाभाऱ्या जवळ महाज्योती प्रज्वलीत करीत होते.या प्रकारामुळे अचानक विद्दुतप्रवाह खंडित झाला. परंतु २१ बल्ब झगमगू लागले. जनसमुदाय एक आनंद मिश्रित गंभीर लहर पसरली.त्रिशूळातून पवित्र जल वाहू लागलं. आणि बाजूलाच असलेल्या मखमली कपड्यांवर डाव्या पायाचं
निशाण उमटलं. काही वेळाने त्या पदचिन्हाचं रुपांतर गजमुखात झालं. पाऊस सतत एक तास पडत राहिला.अभिषेक च्या वेळी घडलेली ही घटना अनेक लोकांनी पाहिली.
आठव्या दिवशी गणेश पूजनाच्या वेळेश गाभाऱ्यातील देवतेने गणपती च रूप धारण केलं. शिवलिंगावर नाग व स्वस्तिकाचे चिन्ह उमटलं. असं हे चमत्कारपूर्ण मंदिर गंगा तलावाच्या काठी आहे.या तलावाला ‘परी तलाव’सुध्दा सुद्दा म्हटलं जातं.

DSCF2281

13th Jyotirling

Comments on: "महाशिवरात्रि" (1)

  1. आज आमच्या वडिलांचा वाढदिवस असायचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: