सुधारस !
ॐ
सुधारस : एका भांड्यात अर्धा बाऊल साखर घेतली.अर्धा बाऊल पाणी घेतले .
भांड्यात साखर व पाणी एकत्र सम सारखे घेतले.ग्यास पेटवून साखर व पाणी
एकत्र केलेले ऊकळविले पातळ पण ठेवला.
साखर व पाणी भांड्यात पाक केलेला गार करण्यास ठेवला. साखर व पाणी याचा
पाक भांड्यात गार झाला.लिंबू सुरीने कापून अर्धा लिंबू साखर व पाणी भांड्यात केलेला
पाकात पिळले.चारोळी घातली. जायफळ बारीक करून पाकात घातले रंग पण घालतात.
मी रंग घातला नाही.साखर व पाणी पाकात चारोळी चं चांगली लागते.बदाम पिस्ता काजू याची
चव वेगळी असते म्हणून मी साखर पाक ह्यात चारोळी घातली आहे.साखर पाणी एक सारखे
घेऊन एकतारी पाक करून गार झाल्या नंतर लिंबू अर्धा पिळले चारोळी जायफळ घालून सुधारस
तयार केला.झाला.मी सुधारस तयार केला आहे यं !