आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल, 2012

बटाटे वडे

बटाटे वडे : प्रथम छोटे बटाटे घेतले.धुतले त्याचे दोन भाग विळीने केले. कुकर मध्ये बटाटे घातले.बटाटे भिजतील इतके पाणी कुकर मध्ये घातले. गॅस पेटवून कुकर ठेवला. ४/५ चार/पाच शिट्या दिल्या.कुकर गार झाल्यानंतर कुकर चे झाकण काढले.उकडलेले बटाटे एका पातेल्यात गार करण्यास ठेवले. बटाटे गार झाल्या नंतर उकडलेल्या बटाटे याचे साल काढली.अंदाजाने मीठ हिरवी मिरची वाटलेली लसून वाटलेला चिरलेली कोथिंबीर असं सर्व उकडलेल्या बटाटा मध्ये घातले.हाताने उकडलेला बटाटा व सर्व मिश्रण एकत्र उकडलेल्या बटाटा मध्ये एकत्र केले.त्याचे छोटे छोटे गोळे लाडू केले.दुसऱ्या पातेल्यात डाळीचे पीठ अंदाजाने घेतले. डाळीच्या पिठात लाल तिखट मीठ हळद हिंग कच्च तेल घातले.पातळ करण्या करता पाणी घातले.सर्व डाळीचे पीठ तयार केले. गॅस पेटवून तेल कढई सगट पेटत्या शेगडी वर ठेवले.एक एक बटाटा गोळा चपटा केला डाळीच्या पिठात बुडवून तापत्या तेलात तळून काढला.असे सर्व बटाटे वडे तयार केले.मस्त चव आली.उकडलेल्या बटाटा मध्ये मीठ हिरवी मिरची बारीक केलेली लसून बारीक केलेला कोथिंबीर चिरलेली गरम तेलात डाळीच्या पिठात मीठ लाल तिखट कच्च तेल हळद सर्व घातलेले ह्यात बुडवून तापत्या तेलात तळलेले बटाटे वडे मी तयार केले. तसेच बटाटे याच सारण थोड बाजूला ठेवले. कणिक घेतली कणिक मध्ये लाल तिखट मीठ कच्च तेल हळद घातली. पाण्यात सर्व कणिक भिजवून ठेवली.गॅस पेटवून तवा ठेवला.पोळपाट लाटणे घेतले.कणिक याचा गोळा घेतला कणिक मध्ये बटाटा सारण भरलं.पोळी सारखे लाटून तापत्या तव्यावर पोळी व बटाटा सारण एकत्र केलेले पराटा दोन्ही बाजूने भाजून तेल लावले.बटाटा पराटा तयार केला.कणिक मध्ये मीठ लाल तिखट कच्च तेल ह्यामुळे पापुद्रा याला पराटा याला चव चांगली आली.

   

येशू

                                                        ॐ
                              येशू : तुमच्या विरुध्द पाप करणाऱ्या विषयी
“तुझ्या भावानें तुझा अपराध केला,तर जा,आणि तूं व तो
एकटे असतांना त्याचा अपराध त्याला दाखीव; त्यानें तुझे ऐकलें
तर तूं आपला भाऊ मिळविला असें होईल, परंतु त्यानें जर न ऐकलें तर
तूं आणखी एकाडोघास आपणा बरोबर घे; अशासाठी कीं दोन किंवा तीन
साक्षीदारां च्या तोंडा ने प्रत्येक शब्द शाबीत व्हावा; आणि जर त्यानें त्यांचे न ऐकलें तर
मंडळी ला कळीव;आणि त्यानें मंडळी चें हि न एकले तर तो तुला विदेशी किंवा जकातदार यांच्या
सारिखा होवो.”
“मी तुम्हांस खचीत सांगतो,जें कांही तुम्हीं पृथ्वी वर बंद कराल,तें स्वर्गात बंद केलें जाईल; आणि जें
कांही तुम्ही पृथ्वी वर मोकळें कराल,तें स्वर्गाम्त मोकळे केले जाईल”
“आणखी तूं म्हास सांगतो,पृथ्वीवर तुमच्यां तील दोघे कोणाएका गोष्टी विषयी एकचित होऊन विनंती
करतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्या कडून त्यासाठी केली जाईल; कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या
नामानें जमलें तेथे त्याज मध्ये मी आहें “

कैरी व शेंगदाणे चटणी

कैरी व शेंगदाणे याची चटणी : प्रथम शेंगदाने भाजून घेतले.
साल काढली. त्यातील थोडे शेंगदाने घेतले. कैरी चिरून किसून घेतली.
अंदाजा प्रमाणे मीठ घेतले ४ चार हिरव्या मिरच्या घेतल्या.फोडणी करून
गार करण्यास ठेवली.मिक्सर मध्ये प्रथम शेंगदाणे पाणी थोडसं घालून
बारीक वाटून घेतले.परत हिरवी मिरची कैरी मीठ घालून परतएक सारखे
मिक्सर मधून बारीक केले. चांगली एकत्र शेंगदाने कैरी हिरवी मिरची मीठ सर्व एकत्र
शेंगदाने चटणी केली मी.नंतर फोडणी कांही चटणी मध्ये घातली.बिन फोडणी ची चटणी
पण चांगली लागते.मूळ कैरी ची चव येते शेंगदाने चटणीला.व ही चटणी उपवास याला पण चालते.
वापरतात.खाली वस्त काचेची डिश काचेचे सट छान वाटतं बघायला. वाढायला.हे सर्व कोल्हापूर
येथे मिळतात. मी वस्त्र विणल आहे.

   

येशू

                                                       ॐ
                                  येशू : शिष्यांचे सांत्वन करतो.
येशू ने शिष्यांना म्हटले,पिता स्वत: तुम्हावर प्रीति करितो,
कारण तुम्हीं मजवर प्रीति केली आहे.आणि मी पित्या पासून आलों
असा विश्वास धरिला आहे.मी पित्यापासून निघून जगात आलो आहें.
पुन्हा जग सोडून पित्याकडे जातो.
तुमचे अंत:कारण अस्वस्थ होऊ नये देवावर विश्वास ठेवा,आणि मजवर हि विश्वास ठेवा.
पित्याच्या घरांत राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत,नसल्यातर मी तुम्हांस सांगितले असते,
मीं तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हांस आपल्या जवळ घेईन, यासाठी कीं
जेथे मी आहे तेथे तुम्हीं ही असावें.
मार्ग,सत्य,व जीवन मीच आहे; माझ्या व्दारे आल्यावांचून पित्या जवळ कोणी जात नाही.
मी तुम्हांस खचीत खचीत सांगतो,मी जीं कृत्यें करितों ती मजवर विश्वास ठेवणारा हि करील,
आणि त्यांपेक्षा मोठी करील,कारण मी पित्या कडे जातो.
तुम्हीं पित्या जवळ कांही मागाल तें तो तुम्हांस माझ्या नावाने देईल. तुम्ही अजून माझ्या नांवाने कांही
मागितले नाहीं, मागा म्हणजे तुम्हास मिळेल,यासाठी कीं आनंद परिपूर्ण व्हावा.

अतिरमपल्ली व वाझाचल धबधबे

                                         ॐ
अतिरमपल्ली व वाझाचल – केरळ येथील त्रिशूल जिल्हातील
शोलैयार जंगलातून वाहत येणारे हे दोन्ही धबधबे त्रिशूल शहरा पासून
९० कि. मी. अंतरावर आहेत. अतिरमपल्ली हा धबधबा ८० फुटां वरून खाली
कोसळतो.व नंतर चालक्कुडी या नदीस मिळतो.वाझाचल हा धबधबा घनदाट
मध्यावर असून नदीचाच एक भाग आहे.सकाळी आठ ८ ते संध्याकाळी सहा ६ वाजेपर्यंत
तिथे जाता येतं. सप्टेंबर -ऑक्टोबर महिना तिथे जाण्यास उत्तम आहे.हा जंगलमय प्रदेश वन्य
पशु व वनस्पती जीवनासाठी प्रसिध्द आहे.जवळ च असलेलं ‘सिल्व्हर स्टोन व ड्रीम ‘ हे थीम पार्क
प्रसिध्द आहे.तऱ्हे तऱ्हे च्या औ ष धी वनस्पती, हत्ती वगैरे प्राणी तिथे सहज आढळतात.मलकापारा टी
बाग ही तेथे मिळणा ऱ्या चहा साठी प्रसिध्द आहे.या धबधबा जवळ जाण्यास मात्र सक्त मनाई आहे.

आटाकामा वाळवंट

                                                   ॐ
आटाकामा (Atacama ) – दक्षिण अमेरिका च्या पश्र्चिम किनारपट्टीवर असलेलं हे
मरूस्थल अँडीज पर्वत रंगाच्या पायथ्याशी आहे. पॅसिपिक महासागराच्या किनारा जवळील
या वाळवंट याच क्षेत्रफळ ३,६२,६०० चौ.कि.मी. आहे.पृथ्वीवरील हा कोरडा भाग मानला जातो.
त्यामुळे येथे सगळीकडे वाळू वाळू आणि वाळूच असून वाळवंट चं खरं स्वरूप येथे दिसून येतं .
वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७५ सें. मी. पेक्षा जास्त नसून काही भागात गेल्या १४ वर्षात पावसाचा
एकही थेंब पडलेला नाही.१९ व्या शतकापर्यंत हा प्रदेश पूर्ण दुर्लक्षित होता.भूमीत खजीन संपत्ती
असल्याचा शोध लागल्याने त्याला ऊर्जीतावस्था आली.१९०० मध्ये कृत्रिम खतांचा शोध लागेपर्यंत
हा चिली च्या अखत्यारीत असल्याने चिली हा देश ही समृध्द झाला.आज सर्व खनिज साठ्यामुळे
येथे वस्ती आहे.

बेडा घाट धबधबा

                                                ॐ
बेडा घाट – हे ठिकाण मध्य प्रदेशातील जबलपूर जवळ असलेल्या
संगमरवरी डोंगरा साठी प्रसिध्द आहे.जबलपूर पासून २० कि. मी.
अंतरावर असलेल्या या संगमरवरी डोंगरावरून पवित्र नदी धबधबा च्या
रुपानं वाहते.यास ‘धु आँधार किंवा ‘स्मोक कॅ स्के ड असही म्हणतात.हा
धबधबा प्रचंड आवाजासहित खाली कोसळतो.व या संगमरवरी दगडा वर
आपटून त्या प्रवाहाच विभाजन होतं. सर्व दृश्या चा अनुभव म्हणजे च
एकाच वेळेस थरार व सौं द र्य अनुभव ना सारखं.

दस्त-ए– कविर वाळवंट

                               ॐ
दस्त – ए – कविर (Dasht -e Kavir ) व दस्त – ए लुत
(Dasht – e – Lut ) – हे वाळवंट ‘कविर – ए -नमक किंवा
‘greta solta dejharta म्हणून प्रसिध्द आहे.हे वाळवंट इराण च्या
पठाराच्या मधोमध आहे. याचं क्षेत्रफळ ७७६०० चौ.कि.मी.असून
इराण मधील अलबोर्झ या पर्वत रांगा पासून दस्त – ए -लुत या आणखी
एका वाळवंटा पर्यंत ते पसरलेलं आहे.येथील मिठागरा पासून यांची नावं पडलेली
आहेत.या दोन्ही वाळवट ह्यात पाऊस पडत च नाही.तापमान उन्हाळ्यात ५० डीर्गीसे. पर्यंत
व हिवाळ्यात खूप खाली म्हणजे उणे २२ डीर्गी से. पर्यंत उतरते.जगातील जास्त सर्वात तापमान
दस्त – ए – लुत मध्ये २००४ व २००५ मध्ये ७१.७ डीर्गी से.इतकं नोंदल गेलं या दोन्ही वाळवंट ह्यात थोडा
फार पाऊस हिवाळ्यात पडतो.वाळू व बारीक खडे यांनी भरलेल आहे.त्यामुळे वाळू ४० फुट उंचा पर्यंत उडते.
‘mugavort नावाची वनस्पती येथे प्रामुख्याने आढळते.लार्क बिवा ट्या वाघ रानटी बकरे हे सर्वसाधारण पणे
आढळतात.जगातील या सर्व वाळवंट याच्या विस्तीर्ण वालुकामय प्रदेश अभ्यासताना तेथे पर्यावरण घडत असलेल्या
बदलांचा अनुभव आला.ग्लोबल vormimg मुळे आपल्या सभोवतालचा प्रदेश वाळवं टी’ होणार नाही याचे प्रतत्न व्हायला
हवेत.नद्दा व वाळवं ट हि आहेत.तेथे सोनेरी सौंदर्य आहे.आनंदी व सुखी लोक जीवन आहे.

अंब्रेला धबधबा

                                               ॐ
अंब्रेला धबधबा – नाशिक जवळ भंडारदरा धरणाच्या खालच्या बाजूला
छत्रीचा आकारात कोसळणारा हा धबधबा नाशिक शहरापासून ५० कि.मी.
अंतरावर आहे.जवळच असलेल्या पुलावरून हा छत्रीचा आकाराचा धबधबा पाहता येतो.
हा धबधबा ही महाराष्ट्रातील इतर काही धबधबा प्रमाणे फक्त पावसाळा तच धबधबा याचे
सौंदर्य खुलून येतं. जवळ च असलेला ऑर्थर लेक व रंधा फॉल्स ही पाहण्या सारखा आहे.

पॅटागॉनिया (Patagonia) वाळवंट

पॅटागॉनिया (Patagonia ) – हे दक्षिण अमेरका तील सर्वात मोठं वाळवंट आहे.अर्जेटिना व चिलीचा प्रदेश या वाळवंट ह्यात येतो. अतिशय थंड हवामानाचं हे ठिकाण असून इथलं तापमान १२ अंश  सें च्या वर जात नाही.सात महिने हिवाळा व पाच महिने उन्हाळा चे दिवस असतात. काही अति प्राचीन गुहा दडलेल्या असून लोकवस्ती च्या खुणा गुहेतील भिंतीवर असलेल्या तैलाचीत्रात आढळतात. येथे चित्र विचित्र कोल्हे आढळतात. दक्षिण अमेरीकातील अँडीज पर्वत रंगाच्या पल्याड हे वाळवंट असून पॅसिफिक महासागरा वरून वाहणारा  दमटपणा येथे अलीकडेच अडतो. म्हणूनच सागरा पासून जवळ असूनही हा प्रदेश कोरडा आहे.

व म्हणूनच त्याला वाळवंट म्हटलं जातं.

ध्यानलिंग

Anyone who comes into the sphere of Dhyanalinga cannot escape the sowing of the spiritual seed of liberation – Sadhguru

ध्यानलिंग च्या  क्षेत्रांत जो येतो त्याच्या मध्ये अध्यात्माचे बीज रुतल्या शिवाय राहत नाही – सद्गुरू

http://dhyanalinga.org/architecture.htm

[youtube:http://youtu.be/vwbiGiNmkDk%5D

गोकाक चा धबधबा

                                             ॐ
गोकाक चा धबधबा – कर्नाटक येतील बेळगाव पासून ६५ कि.मी.
अंतरावर, घटप्रभा नदीवरील हा धबधबा आहे.गोकाक गावापासून बरीच
वळणं घेत घटप्रभा नदीचा प्रवाह ५२ फूट खोल धबधबा च्या रुपात कोसळतो.
तोही वालुकामय टेकडीवरून. त्यामुळे पाण्याला एक प्रकारचा मातकट रंग आहे.
या धबधबा चा प्रवाह त्याचा एकूण आकार, प्रसिध्द नायगारा धबधबा चा छोटा अवतारच
वाटतो.वाटावा असा आहे.घटप्रभा नदीवरील एक झुलता पूल असून तो अजून ही कार्यरत आहे.
१०० वर्ष जुन्या अशा गोकाक मिलमध्ये जाण्यासाठी च त्याचा सहसा वापर केला जातो.जुलै-ऑक्टोबर
हा तिथे जाण्यासाठी योग्य काळ आहे. जवळ च असलेलं चालुक्य काळातील महालिंग श्र्वर याच मंदिर व
इतर चालुक्य काळातील शिल्पं ही येथे बघता येतात.

मोजावे वाळवंट

                                                        ॐ
मोजावे (Mojave ) – अमेराका येथील संघराज्याच्या पश्र्चिम कडचा भाग
बराचसा या वाळवंट याने व्यापलेला आहे.विविध वनस्पती येथे आढळतात.
अमेराका येथील प्रसिध्द राष्ट्रीय उद्दाने आहेत.डेथ व्हॅली नॅशनल पार्क जोशुआ
नॅशनल पार्क मोजावे नॅशनल प्रिझर्व्ह ही त्यांची नावे.प्रसिध्द ‘ग्रँड कॅन्यन’ हे खोरं ही
पर्यटक यांना आकर्षून घेतं या तापमाप काची उंची १३४ फूट आहे.लास वेगास हे येथील
खास आकर्षण आहे.

तलैयार धबधबा

                                                  ॐ
तलैयार धबधबा – दिंडगुल जिल्हातील मंडलार नदीवर पळणी च्या
खोऱ्यात हा तलैयार धबधबा आहे.तामिळ नाडूतील हा सर्वात मोठा
धबधबा आहे.यास ‘रॅट टेल’ धबधबा असं ही म्हणतात.या धबधबा च्या
वरच्या दोन्ही बाजूंस सिमेंटची भिंत असल्याने प्रवाह जेव्हा भिंती वरून
खाली येतो तेव्हा त्याचा आकार उंदरा च्या शेपटी सारखा होतो.या धबधबा च्या
वरच्या भागावर म्हणजेच सिमेंट च्या भिंती पर्यंत जाता येतं. मात्र हा भाग कठीण व
थोडा आव्हानात्मक आहे.कोडाई च्या डमडम व्हा पॉ ई ट पासून सहज दिसून येणारा हा
धबधबा हळूहळू प्रकाश झोतात येत आहे.

वाडी रम वाळ्वंट

                                                    ॐ
वाडी रम (Wadi Rum ) – जॉर्डन देशातील हे वाळवंट देखण्या वाळवंट ह्यात मोडतं.
वाळूपासून झालेल्या दगडां च्या पर्वतांनी व ग्रॅनाईट खडकांनी हे वाळवंट व्यापलेलं आहे.
एकाच वेळेला १७०० फूट उंच खडकाळ डोंगर व दुसऱ्या बाजूला दरी असं रौद्र रूप हे वाळ्वंट
आपल्याला दाखवतं. या इथे पुरातन काळातील मनुष्याचे अवशेष सापडल्याचा उल्लेख आहे.आजही
या वाळवंट याचा अंतर्भागात काही जमाती वस्ती करून आहेत.येथील नैसिर्गिक सौंदर्य अबाधित राहावे
म्हणून वाळवंट संरक्षित जागा घोषित झालं आहे.

सावदाव धबधबा

                              ॐ
सावदाव – कोकणातील कणकवली गावापासून १० कि.मी.
अंतरावर हा धबधबा आहे.हा धबधबा फक्त पावसाळ्यातच
वाहतो.उन्हाळ्यात काहिलीपासून वाचण्यासाठी.पर्यटक तिथेही
येतात.जवळ च असलेल्या कुणकेश्र्वर मंदिरात ही जाता येतं. अजून ही
पर्यटक यांना जास्त माहित नसलेला भाग हा भाग प्रसिध्द पावतो आहे.

                               DSCF2506

अंटार्क्टिका वाळवंट

अंटार्क्टिका – पृथ्वी च्या दक्षिणेकडील टोक म्हणजेच दक्षिण ध्रुवा जवळील प्रदेश याचं क्षेत्रफळ १४ दशलक्ष चौ.कि.मी.असून ९८ टक्के प्रदेश बर्फाच्या जाड थराने व्यापलेला आहे.हा एकाच वेळेला बर्फामुळे थंड पण कोरडा प्रदेश असून याला वाळवंट म्हटलं जातं, ते तिथे होणाऱ्या अति कमी पर्जन्या मुळे या वाळवंट याचा शोध १८२० मध्ये मिखाईल लाझारेव व फाबियन गोटलिब वॉन बेलिं ग्जहाऊसेन या दोघांनी लावला.१८९० साली स्कॉटिश कार्टोग्राफर जॉन जॉर्ज बार्थोलोम्यू याने या जागेचं अंटार्क्टिका
असं नामकरण केलं.

ग्रीक शब्द ‘Antartike ‘ – म्हणजेच उत्तरेच्या विरुध्द – या शब्दापासून Antarctic या नावाची व्युत्पती झाली.१९५९ मध्ये १२ देशांनी मिळून ‘अंटार्क्टिक ट्रीटी’ नावाचा तह केला आज ४८ देश तहात सहभागी आहेत. येथे टोकाचं थंड हवामान असून आधुनिक काळात बरेच पर्यटक या वाळवंट या कडे आकर्षित झाले आहेत.

केम्टी धबधबा

                                      ॐ
केम्टी धबधबा – केम्टी धबधबा डेहराडून शहरापासून २० कि.मी.
अंतरावर तर मसुरी पासून १५ कि.मी. अंतरावर आहे.१८३५ साली
जॉन मेकिनन या ब्रिटिशानं या जागेचा शोध लावला. केम्टी हा शब्द
कँप – टी (Camp – tea ) पासून उदयास आला. त्याकाळी इंग्रज ‘टी पार्टी ‘
चं ठिकाणी आयोजन करीत. हा धबधबा भारतातल्या अप्रतिम धबधबां पैकी
एक मानला जातो.जवळच म्हणजे बारा कि.मी.अंतरावर यमुना नदी वाहते.या
नदीतील मासे मासेमारे यांना नेहमीच आकर्षित करतात.मात्र मासेमारी साठी
परवानगी घ्यावी लागते.हा धबधबां चा परिसर फक्त मार्च ते जुलै या दरम्यान
पर्यटक यांच्या साठी खुला असतो.

                                        DSCF2505

आर्क्टिक वाळवंट

आर्क्टिक – पृथ्वी च्या उत्तरेकडील टोकाला उत्तर ध्रुवाच्या बाजूस हे वाळवंट आहे. इथे चहूकडे बर्फच बर्फ. हे वाळवंट आर्क्टिक समुद्र, क्यानडा, कॅनडा ग्रीन लँड, रशिया, अमेरिका संघराज्याचा भाग असलेला अलास्का,आईसलँड नॉर्वे, स्वीडन व फिनलँड च्या काही भागात पसरलेलं आहे.तापमान नेहमी ३० अंश से.च्या खाली पण वार्षिक पर्जन्याच प्रमाण १० इंचा पेक्षा ही कमी म्हणून यास वाळवंट म्हनायचं.येथे येणारा पर्यटकांच्या संखेत ही अलीकडे लक्षणीय वाढ झाली आहे.हा भाग जरी वस्ती करण्यास दुर्गम व कठीण असला तरी ‘पोलार बेअर’ नामक अस्वलाच कायम वास्तव्य येथे आहे. याशिवाय सील, वोलारीस इत्यादि प्राणी येथे आढळतात.याशिवाय इनुई, इ न्य प्लाक अल्यु ट स, युईत नावाच्या वंशाचे लोक ज्यांना एकत्रित पणे ‘ए स्किमो’ असं संबोधिल जातं त्यांचं येथे वास्तव्य आहे.यांच्या घरांना ‘इग्लू’ म्हणतात.हे एस्किमो संस्खेन साधारण एक लाख वीस हजार असून त्यांचं दळणवळण साधन म्हणजे ‘रेन डिअर ‘ नावाच्या प्राण्याने ओढली जाणारी बिनचाकाची गाडी.

होगेनाक्कल धबधबा

                                                ॐ
होगेनाक्कल (Hogenakkal ) – कर्नाटक व तामिळनाडू च्या सीमेवर असलेला
हा धबधबा बंगळुरु हून १३३ कि.मी. अम्तरावर व सेलमपासून ११४ कि.मी. अंतरावर
आहे.हे अतिशय नयनरम्य व सुंदर ठिकान आहे.तिथे जान्यासाठी उत्तम काळ म्हणजे जुलै,
ऑगस्ट. या दरम्यान पाणी मुबलक असतं. या काळात धबधबा तून पडणाऱ्या पाण्याची पातळी
नेहमीपेक्षा २० ते ३० फूट जास्त असते.होगेनाक्कल हा एकच धबधबा नसून धबधबा यांची मालिकाच आहे.
आजूबाजूला औषधी वनस्पती युक्त जंगलातून याचा प्रवाह वाहत येत असल्याने या paanyaatil आंघोळ स्वास्थाला
लाभदायक व उत्साहवर्धक मानली जाते.आंघोळी नंतर विविध औषधी युक्त तेलाने मालिश केल्याने प्रकृतीला फायदा
होतो.असं मानतात.होगेनाक्कल ला जाऊन तेथील ‘तप्पा’ म्हणजे च वाड ग्या सारखा तराफा तून विहार केल्याशिवाय
आपली सफर पूर्ण होतच नाही.तेप्पा हे जगातील, नौका नयनाच्या सर्वात जुन्या साधना पैकी एक मानल जातं आजूबाजूच्या
टेकड्या वरून ट्रेकिंग किंवा पडब्रम णाचा पर्याय ही आजमावता येतो.

थर वाळवंट

                                                    ॐ
थर (Thar ) – भारताच्या पश्र्चिम सीमेवरील राजस्थान व गुजराथ पासून शेजार च्या
पाकिस्तान च्या पूर्व भागा पर्यंत पसरलेला या वाळवंटास ‘ग्रेट इंडियन डेझर्ट ‘ असंही
म्हणतात.मैलो न् मैल पसरलेली इथली वाळू सोनेरी उन्हात चमचमत असते.तज्ञाच्या मते
हे वाळवंट ४००० वर्षां पेक्षा ही प्राचीन आहे. येथे फार पूर्वी धग्गर नावाची नदी वाहत होती.
ती कालां तराने लुप्त झाली. या वाळवंटा चा उल्लेख रामायणात ‘लवणसागर’ असा केलेला आहे.
ऋग्वेद व महाभारत ह्यात याचा उल्लेख आढळतो.थोड्या पाण्यावर चालणारी शेती व पशुपालन
हा इथला मुख्य व्यवसाय.ब ऱ्याच वेळा येणाऱ्या अवर्षाणात ही येथील जनजीवन मस्त, रंगील आहे.
येथील लोकांना रंगीबेरंगी कपडे व दागिने घालण्याचा शौक असून ते पर्यट कांच खास आकर्षण आहे.
जैसलमेर हे येथील प्रमुख पर्यटन केंद्र येथून सरक त्या वालुकामय टेकड्या ची उंटा वरून सफर करण्याची
सोय आहे.तळपत ऊन व तळपत्या वाळूत ही येथील जीवन संपन्न आहे.

रेडीओ सिलोन

                                        ॐ
रेडीओ सिलोन : रेडीओ सिलोन म्हटलं की आजही दर्दी श्रोते
आठवणीत हरवून जातात.विविध वयोगटातील, जातीधर्मांतील,
भिन्न विचार सारणी च्या देश परदेश येथील करोड श्रोत्यांना एका
सुरेल माळेत गुंफण्याचे कार्य सिलोन ने केले.१९४९ ते १९७४ या सुवर्ण काळातील
अजरामर गाणी रेडीओ सिलोन ने रसिकांना केवळ ऐकविली च नाहीत तर श्रोत्यांमध्ये
एक आगळा ऋणानुबंध निर्माण केला १९४९ ते ६० व्या काळखंडात ऑल इंडिया रे डी ओ वर
हिंदी सिनेमा गीतांना बंदी असतांना रे डी ओ सिलोन ने ती सारी गाणी घराघरात पोहचविली.
आशिया खंडातल्या विविध भाषा मधल्या ३५ हजार ओरीजनल रेकॉर्ड्स सिलीन च्या संग्रही असून
विविध भारती कडे नसलेल्या अनेक रेकॉर्ड्स चा त्यात समावेश आहे.
आज गुरुवार पासून १९ .एप्रिल (४) २०१२ सकाळी ६.४२ ते ९ आणि संध्याकाळी ७ ते ९ या वेळात
सिलोन चे प्रसारण (नवीन ट्रा न्स मिश न वर २५ मीटर SHORTWAVE सुरु होत आहे.

येशू

                                                    ॐ
                                येशू : मेंढपाळ आणि देवदूत
त्याच प्रांतात मेंढपाळ रानांत राहून रात्री आपले कळप
राखीव होते.तेंव्हा प्रभूचा त्यांच्या जवळ उभा राहिला.प्रभुचे
तेज त्यांच्या भोवते प्रकाशले आणि ते भयभीत झाले.तेंव्हा देवदूत
त्यांस म्हणाला.”भिऊ नका, कारण पाहा,जो मोठा आनंद सर्व लोकांस
होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हांस सांगतो.ती ही की,तुम्हांसाठी आज
दाविदाच्या गांवांत तारणारा जन्मला आहे.तो खिस्त प्रभु आहे,आणि तुम्हांस
खूण हीच की बांळंत्याने गोंडाळलेले व गव्हाणीत निजाविलेले उसे बाळक तुम्हांस
आढळलेल.” इतक्यात अकस्मात स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूता जवळ
प्रगट झाला, हे देवाची स्तुती करीत म्हणाले, “उर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर
मनुष्यांस शांति. यांजवर त्याचा प्रसाद झाला आहे.”
मग देवदूत स्वर्गास गेले.तेंव्हा ते घईघाईने गेले तो मरिया, योसेफ व गव्हाणीत निजाविलेले
बाळक ही त्यांस आढळली. मग सर्व ऐका णा ऱ्यां नी त्या मेंढपा ळांनी सांगितले ल्या गोष्टीविषयी
आश्चर्य केले नंतर मेंढपाळास सांगण्यात आले होते त्या प्रमाणे त्या सर्व गोष्टी त्यांनी ऐकल्या व
पाहिल्या ह्यामुळे ते देवाचे गौरव करीत माघारे गेले.

सोनोरण वाळवंट

                                                     ॐ
सोनोरण (Sonoran ) – हे वाळवंट अमिरका संघ राज्याच्या व मेक्सिको
च्या काही भागात पसरलं आहे.उत्तर अमेरका तील हे अति कोरडं, उष्ण व
सर्वात मोठं वाळवंट आहे.जगातील एकमेवाव्दितीय सागुआरा नामक क्याक्टस
(kyktasa ) ची जात येथे आढळते.या भागात १७ प्रकारचे स्थानिक, मूळ रहिवासी
वस्ती करून आहेत. या भागातील सर्वात मोठं शहर म्हणजे फिनिक्स (Phoenix ) हे
अॅरिझोन नातील ठिकाण.

डिस्कवरी अंतरीक्ष विमान

अमेरिकेने डिस्कवरी नावाचे अंतरीक्ष विमान निवृत्त केले.

ह्या विमानाला वॉंशिंग्टन येथे स्मिथसोनीयन संगहालयात ठेवणार आहेत.

एक नेहमीचे विमान ह्या अंतरीक्ष विमानाला फ्लोरिडा ते वॉंशिंग्टन संग्रहालयात घेऊन गेले

त्याची हि सुंदर दृश्ये बघण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा

अॅबी धबधबा

                                             ॐ
अॅबी – कर्नाटक येथील कोडुगु जिल्हा तील मेडिकेरी या प्रसिध्द
पर्यटन स्थळापासून १० कि.मी. अंतरावर असलेला हा धबधबा कॉफी
व मसाल्याचा जंगलासाठी प्रसिध्द आहे.हा धबधबा म्हणजे घनघाट
जंगल रुपी कोंदणात वसलेलं शुभ्र रत्नच जणू वर्षभर मुबलक पाण्याचा
वरदहस्त लाभल्याने उन्हाळा तही एक आल्हादायक सुखद गारवा तिथं
अनुभवता येतो.धबाधबा बरोबर च आजूबाजूला असलेल्या कॉफी च्या वेलची च्या
बागाही पर्यटन पाहतात धबधबा राष्ट्रीय महामार्गा जवळ च असल्यानें जाण्यायेण्यास
अत्यंत सोयीस्कर आहे.पक्षी निरीक्षणा साठी हे ठिकाण प्रसिध्द आहे.पहाटेच्या सुमारास
होणारे पक्षाचे गुंजन वातावरण संगीतमय बनवतं.आजूबाजूचा डोंगर हिरवीगार वनराई व
वातावरणा वरील गारवा यामुळे हि जागा पर्यटक ह्या साठी प्रसिध्द आहे.

गोबी वाळवंट

                                              ॐ
गोबी (Gobi ) – हे मध्य आशियातील सर्वात मोठं वाळवंट !
मंगोलिया, इनर मंगोलिया व चीनचा कान्सू हे प्रांत मिळून
मोठ्या चंद्रकोरी सारखा भाग या वाळवंट याने व्यापलेला आहे.
चिनी भाषेत गोबीला shomaa (वाळूचा ओसाड प्रदेश ) म्हणतात.
तसंच हानहाई (कोरडा समुद्र ) असंही म्हणतात.गोबीच्या nairrutya भाग
पूर्ण पणे वालुकामय आहे.झिजलेल्या रुंद माथ्याच्या घडीच्या टेकड्या आहेत.
गोबी चं वाळवंट सरळ, लांबलचक गाडी चालविता येईल एवढं सपाट आहे.
अधून मधून रुंद द्रोणाच्या आकाराचे प्रदेश इथे सापडतात.ज्याला मंगोलियन्स ‘ताल’
असं म्हणतात.वनस्पती व वस्ती आढळते.थंडीत बर्फाचे वादळ व उन्हाळ्यात उष्ण वाळूच्या
तुफानी वादळां च्या तडाखा बसतो.नद्दा जवळ जवळ नाहीत सांबर खारी हरण त्याचा प्रमाणे
भटक्या लोकां नी पाळलेल्या शेळ्या – मेंढ्या ,गाई -बैल ,उंट -घोडे हेच येथील प्राणीजीवन.
phronsisa यंगहजबंड (१८६५ -१९५२ ) व त्याच्या सहका ऱ्यास येथे डायनॉसॉर व त्यांची अंडी
मिळाल्या ची नोंद सापडते.१९५० च्या आसपास पश्र्चिम गोबी मध्ये चीन यांनी तेल खाणीचा शोध लावला.
या वाळवंट याला फ्लेमिंग क्लि ट्स (fiaming clitts ) असं ही म्हणतात.

हारोळी

                                             ॐ
हारोळी : कणिक म्हणजे गव्हाचं पीठ घेतले.त्यात रोजच्या पेक्षा
जास्त चव येईल असे असं मीठ घातले.तेल पण जास्तच घातले. रोजच्या
पेक्षा घट्ट कणिक तिंबली तिंबले.भिजविली.थोड्यावेळ ठेवून हातानेच कणिक मोठी
केली.त्याला तेल लावले.परत घडी केली.परत तेल लावले परत घडी केली.पेटलेल्या ग्यास वर
चिमटा त हारोळी धरून दोन्ही बाजूने चांगली भाजून घेतली.भरपूर तेल घालून ही हारोळी नुसतीच
खातात.माझी आजी आई ची आई अशा प्रकारे हारोळी चुली च्या बाजूला भाजून आम्हाला खाण्यास देत असे.
मी थोडी जाड सर कणिक घेऊन लाटण्याने लाटून तव्यावर पण भाजून हारोळी केली आगे.कांही जणांना ग्यास चा
वास आवडत नाही.फुलके आधी तव्यावर भाजून ग्यास शेगडीवर भाजतात.

                                          DSCF2504

              DSCF2483

नामिब वाळवंट

                                                ॐ
नामिब (Namib ) वाळवंट – आफ्रिका येथील नामिबिया व अंगोला चा काही
भाग व्यापणारं हे वाळवंट असून त्याच क्षेत्रफळ ८०,९०० चौ.कि.मी. आहे.
जगातील हे सर्वात जुनं वाळवंट मानलं जातं.ते ८० दशलक्ष वर्ष अस्तित्वात
असल्याचा संदर्भ सापडतो.त्या काळी वाळूचा वाहता समुद्रच होता असाही उल्लेख
सापडतो.तेव्हा ३५० मीटर उंच वाळूरूपी लाटा येथे उठत.येथे सरासरी पाऊस’ ०४ इंच
इतकाच पडतो.त्यामुळे हा अति शुष्क व अति कोरडा प्रदेश मानला जातो.बेंगुओला नावाच्या
प्रवाहामुळे येथे थोडी आर्द्रता आहे येथे दुर्मिळ वनस्पती व प्राणीजीवन आढळतं. इथे ‘वेल्विश्र्चीया’
नामक एक वनस्पती असून याला दोनच पट्ट्यासारखी पाने उगवतात.या पानाची लांबी बरीच असू शकते.
अति कोरड्या नामिब वाळवंटात ही वनस्पती तग धरून आहे.काही वेळा किनारपट्टी वरून वाहत असलेल्या
हुक्यातील आर्द्रता शोषून घेते.वालुकामय डोंगरां च्या पायथ्याशी वस्ती करून जाती -जमाती वस्ती करून आहेत.
या वातावरणा कडे व निसर्ग ह्या कडे शास्त्रज्ञ आकृष्ट झाले आहेत.ज्यामुळे ‘स्केलेटन कोस्ट’ च्या आजूबाजूला
बऱ्याच जहाजां ची दिशा भूल होऊन ती भरकटतात.हा किनारा बोटी फुट ण्यासाठी (Shipwreck ) कुप्रसिध्द आहे.
हिरे मीठ व टंगस्टन यांचा मोठा साठा सापडतो.येथे जायच म्हणजे नामिबिया च्या विंडहोक या राजधानी च्या
शहरा पासून ४८० कि.मी. पुढे विमानाने जावं लागतं.

जोग फॉल्स धबधबा

जोग फॉल्स किंवा गिरसप्पा चा धबधबा:
कर्नाटक येथील शिमोगा जिल्हा असलेला हा धबधबा गिरिसिप्पा, जोगदागुंडी अशा विविध नावानं संबोधिल जातो.हा धबधबा भारतातील  सर्वात उंच धबधबा मानला जातो.सरावती नदीच्या प्रवाहातून तयार झालेला हा धबधबा २५३ मीटर उंचीवरुन खाली कोसळतो.याचा उगम तीर्थहल्ली जिल्हातील अंबुतीर्थ येथे होतो.पश्र्चिम घाटातून वायव्य दिशेनं वाहत वाहत हा जलौघ होनावर या शहरातून पुढे अरबी समुद्रास मिळतो.गीरसप्पा धबधब्याजवळ च होन्नेरमारडू (Honnermaradu ) नावानं ओळखली जाणारी नदी (खाडी ) आहे.पाण्यातील खेळासाठी ही नदी प्रसिध्द आहे.चहुबा जुंनी हिरव्यागार वनश्रीनं नटलेल्या या ठिकाणाहून सूर्योदय व सूर्यास्त बघण्याची गंमत कांही और च आहे.

जवळच असलेलं तुंगा अ नैकट ANAIKATA ण्यकट धरण व तेथील तलाव नौका विहारासाठी प्रसिध्द असून तेथून जवळ च असलेल ‘लायन टायगर रिझर्व’ तेथील रॉयल BEMGOLA टायगर, हरीण अस्वल व गोल्डन लंगुर यांच्या साठी प्रसिध्द आहे.

           DSCF2498

ताक्लामकान वाळवंट

                                             ॐ
ताक्लामकान (Taklamakan ) – ताकलिमकान म्हणूनही ओळखलं जाणार
हे वाळवंट मध्य आशियात आहे. चीन क्झिनी जियांग व उयघूर या भागाचा समावेश
या वाळवंतांत होतो.जगातील मोठ्या वालुकामय वाळवंटात याचा समावेश होतो.याचं
क्षेत्रफळ २७०००० चौ. कि.मी.आहे.येथील हवामान अतिशय थंड असून २००८ मध्ये सर्वात
मोठा हिमवर्षाव झाला होता.’तुम्ही आत जाऊ शकता पण बाहेर येऊ शकत नाही’ असा उयघूर
भाषेत ताक्लामाकान चा अर्थ आहे.याला ‘मृत्यू चा समुद्र’ असंही म्हणतात तरीही एकेकाळी हा भाग
‘सिल्क रूट’ म्हणून प्रसिध्द होता.लोकांचे तांडे वाळवंटा च्या कडेने उत्तर दक्षिण प्रवास करायचे.उंदीर ससे
खेकडे कोल्हे उंट हे इथील महत्वाचे प्राणी आहेत.पाण्याच्या कमतरते मुळे येथील जीवनात अनेक अडचणी
असल्या तरी १९४९ पासून चीन सरकार या प्रदेशाच्या विकासासाठी लक्ष घालीत आहे.

 

                                                 DSCF2486

अंबाडा ची भाजी

                                       ॐ
अंबाडा ची भाजी: उन्हाळा मध्ये आंबाडा आंबंट भाजी पाले भाजी
म्हणून मिळते.आंबांडा भाजी ची पाने निवडून घेतली.धुवून घेतली.
मध्यम अशा प्रकारे चिरून घेतली.पातेल्यात आंबांडा भाजी चिरलेली घातली.
थोड पाणी घातले. पेटत्या ग्यास वर भाजी पाणी एकत्र केलेले पातेले ठेवले.
चांगली लगेच चं आंबांडा भाजी शिजली.आधी कुकर मध्ये तुरीची डाळ हळद पाणी घालून
चार शिट्या देऊन शिजवून घेतली.कुकर गार झाल्या नंतर आंबांडा भाजी शिजलेली डावाने हटवून
घेतली. तुरीचे डाळीचे वरण हटवून घेतले.आंबांडा भाजीत वाटीभर वरण घालून लाल तिखट मीठ थोडी हळद
कारण तुरीच्या डाळीच्या वरणात हळद घातली आहे.म्हणून थोडी हळद घालून सर्व आंबांडा भाजी तुरीचे डाळीचे वरण
तिखट मीठ हळद एकत्र हटविले,शिजवून परत एकत्र केले. नंतर तेल मोहरी याची फोडणी करून लाल मिरची घातली.
आंबांडा भाजीत घातली.भाकरी केली.भाकरी आंबांडा भाजी मस्त चवदार जेवण केले.झाले.आंबांडा भाजीचे पाणी काढून
टाकले नाही.तो आंबांडा भाजीचा आंबट पणा चांगला लागतो. उन्हाळा मध्ये चा आंबांडा भाजी मिळते. उन्हाळा मध्ये
आंबट खातात.कैरी आंबांडा भाजी.लिंबू सरबत इत्यादी.

                                               DSCF2484

कालाहारी वाळवंट

                                                ॐ
कालाहारी – आफ्रिका येथील सहारा खालोखाल आणखी एक प्रसिध्द
वाळवंट म्हणजे कालाहारी.हे वाळवंट बोटस्वाना, NAIRRUTYA आफ्रिका व
दक्षिण आफ्रिका च्या संघराज्यात पसरलेलं आहे.बोटस्वाना येथे माकारिका नावाच्या
खचलेल्या वालुकामय प्रदेशात क्षारयुक्त सरोवर आहे.या सरोवरात उत्तरेकडून वाहणाऱ्या
ओकाव्हयांगो नदीचे पाणी मुरतं.उत्तरेत खुरट्या वनस्पतीची अरण्यं ही आढळतात.येथे ‘बेओबाब’
नावाची वनस्पती आढळते.इथली वाळू प्राचीन प्रस्त्रातील लाल पाणी शोषून घेणारी असल्याने येथे पाण्याचे
प्रवाह कमी दिसतात.या भागात कालाहारी गेम्सबॉक हे राष्ट्रीय उद्दान असून हरणे शहामृग हत्ती सिंह चित्ता तरस
कोल्हा असे असंख्य प्राणी येथे आढळतात.वाळवंटा च्या आतल्या भागात शिंकारा (चिंकारा ) वरच जगणारी बुशमान
ही एकच जमात असून सरहद्दी वर बांटू लोकांची वस्ती आहे.दळण वळण यास लायक सुविधा झाल्याने बरेच उद्दोग येथे
आज वाढीस लागले आहेत.बोटस्वाना तील जनतेचा मतानुसार ते वाळवंट नसून कोरडा प्रदेश आहे.त्याचे कारण इतर
वाळवंट याचा मानाने येथील पर्जन्यमान जास्त आहे.पण तुरळक व एका ठिकाणी स्थिर नसलेला पाऊस व जमिनीतील न
मुरण्याने येणारा कोरडेपणा यामुळेच या प्रदेशाची गणना वाळवंट ह्यात होते..

येशू

                                                         ॐ
                                         येशू : शत्रूवर प्रेम करणें
“आपल्या शेजाऱ्यावर प्रीति कर’व आपल्या वैऱ्या चा व्देष कर,
असे सांगितले होतें ते तुम्ही ऐकलें आहे.मी तर तुम्हांस सांगतो
तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीति करा.आणि जे तुमचा छळ करितात
त्यांच्या साठी प्रार्थना करा, म्हणजे तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे
पुत्र व्हाल कारण तो वाईट यावर व चांगल्या वर आपला सूर्य उगवितों आणि
धार्मिकांवर व अधार्मिकां वरही पाऊस पडतो.
तुमचा न्याय होऊ नये म्हणून तुम्ही न्याय करू नका लोकांनी जसे तुम्हां बरोबर
वर्तन करावें म्हणून तुमची इ च्छा आहे, तसेच तुम्ही त्याजबरोबर वर्तन करा.
जे तुम्हांवर प्रीति करितात त्याजवर तुम्ही प्रीति करीता तर रिता तर त्यात विशेष काय करीता ?
जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे,तसे तुं म्ही व्हा.

सालार द उयानी वाळवंट

                                                    ॐ
          सालार – द – उयानी (Salar – de – uyani ) – हे वाळवंट
अमेरिका बोलिव्हिया येथे असून सामान्य माणसाच्या वालवांच्या
कल्पना पार बदलून टाकील असं हे जगातील सर्वात मोठं मिठाचं
वाळवंट आहे. येथे १० दशलक्ष टन मिठाचा साठा आहे. सर्व प्रदेश सपाट
असून कोठेही उंच – सखल पणा आढळत नाही.हे वालावंट अतिशय पारदर्शक
असून संपूर्ण आसमंताचं इथे पडणार वेगवेगळे निळ्या रंगातील प्रतिबिंब मोनामोहक
दिसतं. या वालावंटात बरीच सरोवरं असून ती नैसर्गिक खनिजां नी भरलेली आहेत.
त्यामुळे प्रत्येक सरोवराचे रंग त्यातील खजिना नुसार वेगवेगळे प्रतिबिंबित होतात.

सहारा वाळवंट

                                                    ॐ
सहारा वाळवंट – हजारो मैल पसरलेला वाळूचा सागर,डोक्यावर तळपत ऊन
जवळ पिण्यास पाणी नाही. उष्ण गरम दिवस व थंडगार रात्री.ही वस्तुस्थिती
जगातील सर्वात मोठं वाळवंट ‘सहारा’ येथील आहे.आफ्रिका खंडाचा उत्तर विभाग
या वाळवंटात येतो.तांबड्या समुद्रापासून अटलांटिक महासागराच्या किनाऱ्या पर्यंत
पसरलेल्या या वाळवंटात आफ्रिका तील चाढ,इजिप्त, लिबिया, माली नायजर सुदान,
अल्जिरीया,टयुनिया, मोरोक्को या देशाचा समावेश आहे.या वाळवंटातील एमी कौसी हे
सर्वात उंच शिखर ३,४१५ मीटर उंच असून चाढ देशातील तीबेस्ती पर्वत रांगांत वसलेलं आहे.
वाळूचे बरेच डोंगर असून काही ६०० फुटा पेक्षा ही जास्त उंचीचे असून वाळूच्या प्रवाबरोबर
या डोंगराची उंची कमी जास्त होते.या प्रकारच्या दोंग रांना येथे रेग्स(Regs ) म्हणतात.
या भागात स्य्प्ता ज्वालामुखी आढळ ण्याचा उल्लेख आहे.’लेक चाढ’ हे इथलं एकमेव गोड्या पाण्याचे
सरोवर कोणे एकेकाळी या भागात नद्दा वाहत असत.आज त्या सुकल्या आहेत.सुकलेल्या नदीच्या पात्राच्या
खुणा अजूनही दिसतात.त्यांना इथे ‘वाडीज म्हणतात.वाळवंट हा येथे नेमेची येणारा निसर्ग नियम आहे.
यामुळे येथील भूभाग सतत बदलत असतो.येथील timbaktu हे प्रसिध्द शहर सतत वाहणा ऱ्या वाळूच्या प्रवाहां
मुळे वालुकामय झाले आहे.बर्बर जमात हि येथील सर्वात जुनी जमात २/३ भाग या जमातीने व्यापला होता व आजही
बऱ्याच भागातून त्यांचं वास्तव आहे.सहारा वाळवं ट हे जगातील उत्तम वाळवंट याच प्रतिक आहे.

काईलकुम वाळवंट

                                                     ॐ
                                       काईलकुम (Kyzyl Kum ) –
उझबेक व तर्किश भाषेत काईलकुम चा अर्थ लाल माती असा होतो.
हे वाळवंट मध्य आशिया तील कझाकिस्तान, उझबेकिस्तान व तुर्कमेनिस्तान या
राज्यात पसरलेलं आहे.याचं क्षेत्रफळ २९८००० चौ. कि. मी. आहे.इथला बराचसा भाग
वाळूने व वाळूच्या डोंगरां नी व्यापलेला आहे.काही ठिकाणी ओयासिस हीआढळतात.
शेती करणाऱ्या काही जमाती या ओयासिस च्या बाजूने वस्ती करून राहतात.
येथील तपमान उन्हाळ्यात ५० डिग्री सें. पार करून जातं. १९८३ मध्ये येथील केरकी या
ठिकाणी ५१.७८ डिग्री से.तपमान याची नोंद झाली होती.बऱ्याच प्रकार च्या पाली,काळवीट,
रानडुक्कर आदि प्राणी येथे आढळतात. या प्राण्यांसाठी १९७ मध्ये राखीव सुरक्षित प्रदेशाची
योजना केली गेली.हे वाळवंट येथे मिळणाऱ्या सोने, युरेनियम, तांबे यल्युमिनिअम, नैसर्गिक
तेल व वायू यासाठी प्रसिध्द आहे. मुरूनटाऊ येथील सोन्याच्या खाणीची प्रगती १९७० च्या दशकात
झाली. समरकंद हे या वाळवंट येथील प्रमुख शहर आहे.

अमेरिका उबदार मार्च

                                             ॐ
अमेरिका येथील सर्वात उबदार मार्च !
 वॉंशिंग्टन : मार्च २०१२ हा अमेरिका तला आजवरचा
सर्वात उबदार मार्च ठरला आहे.अमेरीकातील तापमानाची नोंद
१८९५ साली सुरु झाली. तेव्हापासून नोंदणीत या वर्षीच्या मार्च ने
सर्वात उबदार पणाचा लौकिक प्राप्त केला आहे. आजवर १९१० सालातला
मार्च महिना हा सर्वाधिक उबदार ठरला होता.

                                      DSCF2487

डेथ व्ह्यली

                                                             ॐ
                                         डेथ व्ह्यली (Death Valley ) –
हे जगातील अति उष्ण वालवंटा पैकी एक असून
अमेरिकन संघ राज्यातील क्यालिफोर्निया भागात आहे.
१९१३च्या जुलै च्या १० तारखेस येथील तापमान १३४ फ्यरनहिट
(५६ सेंटिग्रेड ) होतं.येथे हवेतील आर्द्रते चं बाष्पीभवन सर्वात जास्त आहे.
येथे वार्षिक दोन इंचापेक्षा ही कमी पाऊस पडतो.क्षार व अल्कली यांचं अनोखं
मिश्रण येथील खडकांच्या रचनेत आढळतं. या वालावंटा चं ‘मृत्यूदरी ‘ हे नाव
१८४९ च्या ‘गोल्ड रश च्या काळात पडलं. सोन्याच्या शोधात हा प्रदेश ओलांडून जावा
लागत असे. शुष्क व कोरड्या हवेमुळे बरीच जीवितहानी होत असल्याने ती मृत्यूदरी म्हणून
ओळखली जाऊ लागली. येथे ९०० प्रकारच्या विविध वनस्पती आढळतात. पाली उंदीर ,साप वगैरे
प्राणी वास्तव्यास आहेत पण या सर्वापेक्षा महत्वाचं म्हणजे येथे सापडणारा ‘डेव्हिल्स होल पपफिश’
(Devil ‘s Hole Pupfish ) नावाचा मासा.

ऑस्ट्रेलिया खंडातील वाळवंट

                                                 ॐ
                 ग्रेट व्हिक्टोरिअन वाळवंट (Great Victoriaan Desert ) –
ऑस्ट्रेलिया खंडातील हे सर्वात मोठं वाळवंट असून याचं क्षेत्रफळ
४२४४०० चौ. कि.मी.आहे.खाणकाम व आण्विक चाचण्या यांच्या वरच
येथील लोकजीवन अवलंबून आहे.कोगारा नावाची जमात येथे वस्ती करून आहे.
हा भाग जरी कोरडा व दुर्गम असला तरी ऑ स्ट्रे लि या तील कॉनी सू हायवे व यान बीडेल
हायवे हे दोन महामार्ग या भागातून जातात. १८७५ मध्ये ब्रिटिश संशोधक अर्नेस्ट गाईल्स याने
पहिल्यांदा हा भाग ओलांडला व त्याने तेव्हाची राणी व्हिक्टोरिया हिचं नाव या भागास दिलं.
आज हा भाग तेथे असलेल्या प्राणी संपदेमुळे ‘वर्ल्ड वाइल्ड लाईफ फंड ‘चा संरक्षित विभाग
(Protected area )आहे.येथे मामुंगाऱी कॉ न्झ र्वे श न पार्क आहे.पालीचे वेगवेगळे प्रकार येथे
पाहावयास मिळतात.

अरेबियन वाळवंट

अरेबियन वाळवंट (Arabian Desert ) –

येमेन पासून पर्शियन आखाता पर्यंत पसरलेले हे वाळवंट असून ओमान, जॉर्डन व इराक पर्यंत अरेबियन उपखंडा चा बराच भाग त्याने व्यापलेला आहे.

याचं क्षेत्रफळ २,५०,००० चौ. मैल असून युरापातील फ्रान्स, बेल्जियम,नेदरल्यंडस् या तिन्ही देशांच्या एकत्रित क्षेत्रफळा पेक्षा ही ते मोठं आहे.या वाळवंटा च्या मध्यावर रुब -अल -खली नावाचा सलग वाळू चा डोंगर आहे.येथे ऑरिक्स , वाळू वर राहणारी मांजर व गोलाकार शेपट्या असणाऱ्या पाली आढळतात.अति गरम वाळूच्या डोंगरा पासून दलदली पर्यंत निसर्गाची सर्व रूपं येथे दिसतात.सौदी अरेबिया हा या वाळवंटा चाच एक भाग. येथे उन्हाळ्यात तापमान ४० – ४५ डिग्री से.व हिवाळ्यात ५ -१५ डिग्री से असते.तेल फॉस्फेट व सल्फर यांचा येथे मोठा साठा आहे.व यातील बराच साठा सौदी अरेबिया मध्ये मोडतो.

अल-खली या डोंगराची रांग पुढे पश्र्चिम ओमान व पूर्व येमेन मध्ये जाते.या भागात बऱ्याच वंशाचे लोक असून त्यात शिया व सुन्नी पंथ प्रमुख आहेत.येशू

                              ॐ
             येशू : स्वर्गाज्या राज्यात मोठा कोण
येशू : त्या वेळेस शिष्य येशूकडे येऊन म्हणाले,
स्वर्गाच्या राज्यांत मोठा कोण ? तेंव्हा त्याने एका
बाळकाला बोलावून त्याला त्यांच्या उभें केले आणि
म्हटलें “मी तुमहांस खचीत सांगतो, तुमचे मन
वळल्याशिवाय व तुम्ही बाळकां सारखे झाल्याशिवाय
स्वर्गाच्या राज्यांत तुमचा प्रवेश होणारच नाहीं. यास्तव जो
कोणी आपणाला या बाळकासारिखा लीन करील तोच स्वर्गाच्या
राज्यांत मोठा होय.आणि जो कोणी माझ्या नामानें अशा एका बाळ्काला
जवळ करील त्यानें मला जवळ केलें असे होईल.
मजवर विश्वास ठेवणाऱ्या ह्या लहाणांतील एकाला जो कोणी अडखळवील
त्याच्या गळ्यांत मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात
बुडवावें ह्यात त्याचें हित आहे.
सांभाळा, यां लहान मुलांतील एकालाही तुच्छ मानूं नका;कारण मी तुम्हांस सांगतो की
स्वर्गात त्यांचे दिव्यदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे तोंड नित्य पाहतात.
तुम्हांस कसे वाटतें,कोणाएका मनुष्या जवळ शंभर मेंढरें आहेत, आणि त्यातून एखादें
भटकले तर तो ती नव्याणव डोंगरावर सोडून त्या भटकले ल्याचा शेध करण्यास जाणार नाही
काय ? कदाचित ते त्याला सांपडले, तर न भटकलेल्या नव्याण्णव पेक्षा तो त्यावरून अधिक
आनंद करील असे मी तुम्हांस खाचीत सांगतों. तसे या लहानातील कोणाचाही नाश व्हावा
अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाहीं.”

                                                                DSCF0533

५०६ वा ब्लॉग पोस्ट

५०६ वा ब्लॉग पोस्ट : दिनांक तारीख ९ एप्रिल (४) २०१२ साल ला माझा ब्लॉग पोस्ट पाचशेसहा ५०६ वा ब्लॉग पोस्ट होत आहे. खरचं खूप लिखान वाचण्यास व लिहिण्यास मला मिळाले आहे. कांही घरगुती वयक्तिक सतार शिंकाळ मानिल्यंट पाककृती असे असे भरपूर विषय माझ्या ब्लॉग मध्ये आहेत. मी फोन मध्ये बोलतांना मी डांगर केले सातूचे पीठ केले असे कांही सांगितले की आम्ही पण करतो असे सांगून त्यांनी पण सातूचे पीठ घरी केले आहे.एकदम मस्त वाटलं !ताकातील हिरवी मिरची पण सर्वांनी केली.सहज रोजच जेवण पण चवदार वाटतं. येशू दर्गा सज्जनगड उज्वल त्रिकोण मी छायाचित्र फोटो काढून दाखविले आहे.घंटा सुबत्ता असे मनाचे विचार लिहिले आहेत. माझा ब्लॉग आपण वाचन करून प्रतिक्रिया दिल्या आहेत भेटी पण दिल्या आहेत त्या बध्दल बद्दल धंयवद ! धन्यवाद !

भेटी ४३,९२५

DSCF2442

पोकळा ची भाजी

                                         ॐ
पोकळा ची भाजी : पोकळा पालेभाजी आहे. कोल्हापूर येथे
पोकळा पालेभाजी बारा महिने मिळते,या भाजीला लाल देठ असतात.
पानं पाने हिरवी असतात.लाल माठ पाले भाजीला लाल देठ व पानं पण लाल
असतात.पोकळा पालेभाजी देठा सगट निवडून घेतली. धुवून घेतली. विळीने बारीक
चिरली कोणी कोणी देठा सगट पोकळा भाजी न चिरता करतात. ग्यास पेटवून ग्यास वर
पातेले ठेवले तेलाची मोहरी घालून फोडणी केली चिरलेली पोकळा भाजी फोडणीत घातली.
थोडस शिजण्या करता एक बाउल पाणी घातले.पोकळा भाजीला वाफ आणली हरबरा डाळीचे
पीठ लावले.हळद हिंग लाल तिखट मीठ घालून सर्व पोकळा भाजी हलविली.परत दोन वाफ आणली.
पोकळा हरबरा डाळीचे पीठ लाल तिखट मीठ हिंग हळद तेल मोहरी ची फोडणी सर्व एकत्र पोकळा भाजी
तयार केली मी.कांदा घालून परतून पण पोकळा भाजी तयार करतात.      DSCF2482

                                DSCF2476DSCF2480

मिरज येथील मीरासाहेब दर्गा

मिरज येथील मीरासाहेब दर्गा

सर्व धर्म समभावाचे प्रतीक मिरज येथील हजरत ख्वॉजा शमणा मीरासाहेब
यांचा दर्गा होय.हिंदू -मुस्लिम ऐक्याचे चित्र येथे दररोज पाहायला मिळते.
दर्गाचा उरूस असो वा संगीत अब्दुल करीम खाँसाहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित संगीत महोत्सव असो. सर्व जाती-धर्माचे भाविक या सोहळ्यात आनंदाने,उत्साहाने सहभागी होतात. येथील उरुसाची परंपरा सहाशे वर्षाहून अधिक आहे.

येथील दर्ग्यात दोन कबर आहेत पहिली हजरत महंमदमीरा यांची.दुसरी हजरत ख्वॉजा शमनामीरा यांची आहे.शमनामीरा यांची कबर दर्ग्याच्या मध्यभागी आहे.येथे फुले व अत्तराचा सुगंध दरवळत असतो.

दर्ग्याच्या बाहेर आवारात उदबत्ती लावण्याची सोय आहे.येथे समई तेवत असते. मीरासाहेब दर्ग्याचा उरूस म्हणजे मोठी धामधूम असते.महाराष्ट्र, कर्नाटक हिंदू – मुस्लिमभाविक या नमित्ताने मिरज येथे मोठ्या संख्येने एकत्र येतात.उरुसा च्या दरम्यान संगीत अब्दुल करीम खाँसाहेब यांची पुण्यतिथी येते. यानिमित्त तीन दिवस येथे संगीत महोत्सव होतो.

नामवंत गायक, वादक त्यात श्रध्देने विनामूल्य सेवा रुजू करतात.अब्दुल करीम खाँसाहेब यांच्या किराणा घराणा तील गायक आजही दर्गा परिसरातील चिंचेच्या झाडाखाली बसून आपली गानकला पेश करतात.

याच चिंचेच्या झाडा खाली खाँसाहेब ख्वॉजासाहेबांची आराधना गायनाने केल्याचे सांगण्यात येते.

DSCF2475

येशू

                                               ॐ
                      लोक समुदाय येशूचे स्वागत करतो.
येशू : दुसऱ्या दिवशीं सणास आलेंला मोठा लोक समुदाय
येशू यरुशलेमास येत आहे असें ऐकून खजूरीच्या झावळ्या
घेऊन त्याच्या भेटीस बाहेर निघाला. आणि पुढे चालणार व मागे
चालणारे गजर करून बोलले येणारे राज्य धन्यवादित असो.
प्रभूच्या नामाने येणारा राजा धन्यवादित असो.
स्वर्गात शांती, आणि ऊर्ध्वलोकी गौरव.
मग अंधळे व लंगडे त्याजकडे मंदिरात आले,त्यांस त्याने बरे केलें
तेंव्हा त्यानें केलेले चमत्कार व दाविदाच्या पुत्राला ‘होसान्ना ‘ असे
मंदिरात गजर करणारी मुलें हीं पाहून मुख्य याजक व शास्त्री रागावले व
त्याला म्हणाले, “हीं काय म्हणतात हें तुम्हीं ऐकतां काय ?”
नंतर तो त्यांस सोडून नगरा बाहेर बेथानीस गेला, व तेथे वस्तीस राहिला.

                                           DSCF0531

हनुमान पौंर्णिमा

                               ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
उत्तरायण वसंतऋतु नक्षत्र हस्त राशिप्रवेश कन्या
१५ शुक्रवार चैत्र शुक्लपक्ष हनुमान जयंती पौंर्णिमा आहे.
तसेच शुक्रवार तारीख दिनांक ६ एप्रिल (४)२०१२ साल ला हनुमान
पौंर्णिमा आहे.वैशाख स्नानारंभ ,सर्व देवांना दवणा वाहणे.

                                   DSCF1529


मारुती च्या आरत्या
१ सत्राणें उड्डाणें हुंकार वदनीं |करि डळमळ भूमंडळ गगनीं |
गडबडीलें ब्रह्मांड धाकें त्रिभुवनीं | सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ||१||
जय देव जय देव जय श्रीहनुमंता | तुमचेनी प्रसादें न भीं कृतांता ||धृ O ||
दुमदुमली पाताळें उठिला प्रतिशब्द | थरथरला धरणीधर मानीला खेद |
कडाडिले पर्वत उडुगणउच्छेद | रामीरामदासा शक्तीचा बोध ||जय O ||२||
||२||
कोटीच्या कोटी गगनीं उडाला ||अचपळ चंचल द्रोणाचळ घेउनी आला||
आला गेला आला कामा बहुतांला || वानर कटका चुटका लावुनिया गेला ||१||
जय देव जय देव.जय श्रीबलभीमा ||आरती ओवाळूं सुंदर गुनासिमा ||धृ O ||
उत्कट बळ ते तुंबळ खळबळली सेना || चळचळ करिती त्यासी तुळणा दिसेना
उदंड कीर्ति तेथें मन हे बसेना || दास म्हणे न कळे मोठा कीं साना ||१||
जय देव जय देव जय श्रीबलभीमा | आरती ओवाळूं सुंदर

महावीर जयंती

                              ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
उत्तरायण वसंतऋतु चैत्र शुक्लपक्ष गुरुवार १३/१४ नक्षत्र उत्तरा
राशिप्रवेश कन्या महावीर जयंती आहे. श्रीनृसिंह दोलोत्सव
दवणा वाहणे.हनुमान जयंती चा उपवास करतात.

                                       DSCF1528

बाहुबली : कोल्हापूर पासून २५ ते ३० किलोमीटर वर कुंभोज
या गावाजवळ बाहुबली हे जैन धर्मीय यांचे तीर्थ स्थळ आहे.
जैन धर्मीय गुरुकुलाची परंपरा ध्यानात घेऊन १९३४-३५ च्या
सुमारास या ठिकाणी बाहुबली ब्रह्मचर्याश्रमाची स्थापना झाली.
याच परिसरात जैन मुनी बाहुबली यांनी ध्यानधारणा केली.त्यामुळे
त्यांचेच नाव या परिसराला दिले गेले.आचार्य शांतीसागर महाराज
यांच्या पुढाकाराने या परिसरात बाहुबलीची २८ फूट उंचीची भव्य
संगमरवरी मूर्ती उभारण्यात आली आहे. दर बारा वर्षांनी या मूर्तीवर
महामस्तकाभिषेक होतो. बाहुबली ला जाण्यासाठी सांगली व कोल्हापूर
एथून एसटी .खाजगी वाहनांची चांगली सोय आहे.राहण्याची सोय ही चांगली आहे.

DSCF2477

येशू

                                                ॐ
                      येशू : येशू वादळ शांत करतो
मग तो डोंगरावरून उतरल्यावर लाकांचे थव्यांचे थवे
त्याच्या मागे चालले.
संध्याकाळ झाल्यावर तो त्यास म्हणाला, आपण पलीकडे
जाऊ.तेंव्हा लोक समुदायाला सोडून तो मचव्यावर होता तसेच ते
त्याला घेऊन गेले.नंतर मोठे वादळ झालें. व लाटा मचव्यावर
अशा उसळल्या की तो भरू लागला तो वरामावर उशास घेऊन
निजला होता.तेंव्हा ते त्याला उठवून म्हणाले ” गुरुजी, आपण
बुडतों याची आपणालाल चिंता नाही काय ? “
तेव्हा त्यानें उठून वाऱ्याला दबाविले व समुद्राला म्हटले
उगा रहा, शांत हो मग वारा पडला व अगदी निवांत झालें.
यांवर त्याने त्यांस म्हटले ” तुम्ही का घाबरला ? तुम्हाला
विश्वास नाही काय ? “
तेंव्हा ते फार भ्यालें व एकमेंकास म्हणू लागलें “हा आहे
तरी कोण ? वारा व समुद्र हे देखील याचें ऐकतात.”

                          DSCF1195

येशू

                                           ॐ
                         येशू : काळजी करू नका
” यास्तव मी तुम्हांस सांगतो आपल्या जीवाविषयी म्हणजे
आपण काय खावे, प्यावे,पांघरावे याची चिंता करू नका
आकाशातील पाखरे पहा, ते पेरीत नाहीत,कापीत नाहीत व
कोठारात साठवित नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांस
खावयास देतो. त्यां पेक्षा श्रेष्ठ आहा की नाही ? वस्त्रा विषयी
का काळजी करता ? रानातील भूकमेळ पाहा, ती कष्ट करीत
नाहीत व काटीत नाहित. जेरानातले गवत आहे त्याला जर देव
असा पोशाख घालतो तर विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार
नाही काय ?
म्हणून काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत
काळजी करित बसू नका. कारण यासाठी विदेशी लोक खटपट
करितात. या सर्वांची गरज तुम्हास आहे हे तुमच्या स्वर्गीय
पित्यास ठाऊक आहे.तर तुम्ही प्रथम त्याचे राज्य व त्याची
धार्मिकता मिळवावयाची खटपट करा, म्हणजे यांबरोबर तीहि
सर्व तुम्हांस मिळतील.

                                       नववर्ष फुगे

%d bloggers like this: