सज्जनगड
ॐ
सज्जनगड : सातारा शहराच्या पश्चिमेस दहा किलोमीटर सज्जनगड आहे.
समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने या गडास धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे.
एप्रिल १६७३ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहा कडून जिंकून घेतला.
त्याच वर्षी रामदास स्वामी या किल्ल्यावर वास्तव्यासाठी आले. गड चढण्यासाठी पायऱ्या
आहेत. अर्ध्या वाटेवर कल्याणस्वामीं चे मंदिर आहे.पुढे गेल्यावर एका बाजूस मारुतीचे व
दुसऱ्या बाजूस गोतमी चे मंदिर आहे.किल्ल्याचा दरवाजात श्रीधर स्वामींनी स्थापन केलेल्या
मारुती व वराहाच्या मूर्ती आहेत.प्रवेशव्दाराच्या डाव्या बुरुजाजवळ आम्ग्लाई देवीचे मंदिर आहे.
अंगापूर च्या कृष्णा नदीच्या डोहात रामादांना रामाच्या मूर्ती हीअंगलाई ची सापडली होती.आंगलाई
मंदिर समर्थांनी बांधले.रामदासांचे वास्तव्य होते शके १६०३ माघा नवमी (सन १६८२ ) समर्थांनी समाधी घेतली.
समाधीवर राममूर्ती बसवून शिष्यांनी लहान देऊळ बांधले.संभाजीने त्यावर मोठे देऊळ व सभामंडप बांधला.
श्रीराम मंदिराच्या सभामंदापात सिद्धिविनायक व हनुमानाची मूर्ती आहे.मुख्य मंदिरात राम,लक्ष्मण,सीता च्या
पंचधातूचा मूर्ती आहेत.जवळच समर्थांची धातूची मूर्ती आहे.भुयारात समर्थांचे समाधीस्थान आहे.समाधी मागील
कोनाड्यात पितळी पेटीत दत्तात्रेयाच्या पादुका आहेत.मंदिरा बाहेर एका कोपऱ्यात मारुती आहे.दुसऱ्या कोपऱ्यात
समर्थशिष्या वेणा हिचे वृंदावन आहे.मंदिरा पुढे उत्तर बाजूस आणखी एक शिष्या आक्काबाई वृंदावन आहे.माघ
वद्द प्रतिपदा ते नवमी या काळात दासनवमी चा उत्सव साजरा करतात.
सज्जन गड मी हे व आमची मुले लहान असतांना पाहिले आहे.पायऱ्या चढून सर्व पाहिले आहे.तेथे तेंव्हा रामनवमी
चं होती आम्हाला साबुदाणा खिचडी पाना च्या पत्रावळी मध्ये दिलेली आजही आठवते.