आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 3, 2012

येशू

                                           ॐ
                         येशू : काळजी करू नका
” यास्तव मी तुम्हांस सांगतो आपल्या जीवाविषयी म्हणजे
आपण काय खावे, प्यावे,पांघरावे याची चिंता करू नका
आकाशातील पाखरे पहा, ते पेरीत नाहीत,कापीत नाहीत व
कोठारात साठवित नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांस
खावयास देतो. त्यां पेक्षा श्रेष्ठ आहा की नाही ? वस्त्रा विषयी
का काळजी करता ? रानातील भूकमेळ पाहा, ती कष्ट करीत
नाहीत व काटीत नाहित. जेरानातले गवत आहे त्याला जर देव
असा पोशाख घालतो तर विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार
नाही काय ?
म्हणून काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत
काळजी करित बसू नका. कारण यासाठी विदेशी लोक खटपट
करितात. या सर्वांची गरज तुम्हास आहे हे तुमच्या स्वर्गीय
पित्यास ठाऊक आहे.तर तुम्ही प्रथम त्याचे राज्य व त्याची
धार्मिकता मिळवावयाची खटपट करा, म्हणजे यांबरोबर तीहि
सर्व तुम्हांस मिळतील.

                                       नववर्ष फुगे

%d bloggers like this: