येशू
ॐ
येशू : येशू वादळ शांत करतो
मग तो डोंगरावरून उतरल्यावर लाकांचे थव्यांचे थवे
त्याच्या मागे चालले.
संध्याकाळ झाल्यावर तो त्यास म्हणाला, आपण पलीकडे
जाऊ.तेंव्हा लोक समुदायाला सोडून तो मचव्यावर होता तसेच ते
त्याला घेऊन गेले.नंतर मोठे वादळ झालें. व लाटा मचव्यावर
अशा उसळल्या की तो भरू लागला तो वरामावर उशास घेऊन
निजला होता.तेंव्हा ते त्याला उठवून म्हणाले ” गुरुजी, आपण
बुडतों याची आपणालाल चिंता नाही काय ? “
तेव्हा त्यानें उठून वाऱ्याला दबाविले व समुद्राला म्हटले
उगा रहा, शांत हो मग वारा पडला व अगदी निवांत झालें.
यांवर त्याने त्यांस म्हटले ” तुम्ही का घाबरला ? तुम्हाला
विश्वास नाही काय ? “
तेंव्हा ते फार भ्यालें व एकमेंकास म्हणू लागलें “हा आहे
तरी कोण ? वारा व समुद्र हे देखील याचें ऐकतात.”