महावीर जयंती
ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
उत्तरायण वसंतऋतु चैत्र शुक्लपक्ष गुरुवार १३/१४ नक्षत्र उत्तरा
राशिप्रवेश कन्या महावीर जयंती आहे. श्रीनृसिंह दोलोत्सव
दवणा वाहणे.हनुमान जयंती चा उपवास करतात.
ॐ
बाहुबली : कोल्हापूर पासून २५ ते ३० किलोमीटर वर कुंभोज
या गावाजवळ बाहुबली हे जैन धर्मीय यांचे तीर्थ स्थळ आहे.
जैन धर्मीय गुरुकुलाची परंपरा ध्यानात घेऊन १९३४-३५ च्या
सुमारास या ठिकाणी बाहुबली ब्रह्मचर्याश्रमाची स्थापना झाली.
याच परिसरात जैन मुनी बाहुबली यांनी ध्यानधारणा केली.त्यामुळे
त्यांचेच नाव या परिसराला दिले गेले.आचार्य शांतीसागर महाराज
यांच्या पुढाकाराने या परिसरात बाहुबलीची २८ फूट उंचीची भव्य
संगमरवरी मूर्ती उभारण्यात आली आहे. दर बारा वर्षांनी या मूर्तीवर
महामस्तकाभिषेक होतो. बाहुबली ला जाण्यासाठी सांगली व कोल्हापूर
एथून एसटी .खाजगी वाहनांची चांगली सोय आहे.राहण्याची सोय ही चांगली आहे.