येशू
ॐ
लोक समुदाय येशूचे स्वागत करतो.
येशू : दुसऱ्या दिवशीं सणास आलेंला मोठा लोक समुदाय
येशू यरुशलेमास येत आहे असें ऐकून खजूरीच्या झावळ्या
घेऊन त्याच्या भेटीस बाहेर निघाला. आणि पुढे चालणार व मागे
चालणारे गजर करून बोलले येणारे राज्य धन्यवादित असो.
प्रभूच्या नामाने येणारा राजा धन्यवादित असो.
स्वर्गात शांती, आणि ऊर्ध्वलोकी गौरव.
मग अंधळे व लंगडे त्याजकडे मंदिरात आले,त्यांस त्याने बरे केलें
तेंव्हा त्यानें केलेले चमत्कार व दाविदाच्या पुत्राला ‘होसान्ना ‘ असे
मंदिरात गजर करणारी मुलें हीं पाहून मुख्य याजक व शास्त्री रागावले व
त्याला म्हणाले, “हीं काय म्हणतात हें तुम्हीं ऐकतां काय ?”
नंतर तो त्यांस सोडून नगरा बाहेर बेथानीस गेला, व तेथे वस्तीस राहिला.