आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 7, 2012

मिरज येथील मीरासाहेब दर्गा

मिरज येथील मीरासाहेब दर्गा

सर्व धर्म समभावाचे प्रतीक मिरज येथील हजरत ख्वॉजा शमणा मीरासाहेब
यांचा दर्गा होय.हिंदू -मुस्लिम ऐक्याचे चित्र येथे दररोज पाहायला मिळते.
दर्गाचा उरूस असो वा संगीत अब्दुल करीम खाँसाहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित संगीत महोत्सव असो. सर्व जाती-धर्माचे भाविक या सोहळ्यात आनंदाने,उत्साहाने सहभागी होतात. येथील उरुसाची परंपरा सहाशे वर्षाहून अधिक आहे.

येथील दर्ग्यात दोन कबर आहेत पहिली हजरत महंमदमीरा यांची.दुसरी हजरत ख्वॉजा शमनामीरा यांची आहे.शमनामीरा यांची कबर दर्ग्याच्या मध्यभागी आहे.येथे फुले व अत्तराचा सुगंध दरवळत असतो.

दर्ग्याच्या बाहेर आवारात उदबत्ती लावण्याची सोय आहे.येथे समई तेवत असते. मीरासाहेब दर्ग्याचा उरूस म्हणजे मोठी धामधूम असते.महाराष्ट्र, कर्नाटक हिंदू – मुस्लिमभाविक या नमित्ताने मिरज येथे मोठ्या संख्येने एकत्र येतात.उरुसा च्या दरम्यान संगीत अब्दुल करीम खाँसाहेब यांची पुण्यतिथी येते. यानिमित्त तीन दिवस येथे संगीत महोत्सव होतो.

नामवंत गायक, वादक त्यात श्रध्देने विनामूल्य सेवा रुजू करतात.अब्दुल करीम खाँसाहेब यांच्या किराणा घराणा तील गायक आजही दर्गा परिसरातील चिंचेच्या झाडाखाली बसून आपली गानकला पेश करतात.

याच चिंचेच्या झाडा खाली खाँसाहेब ख्वॉजासाहेबांची आराधना गायनाने केल्याचे सांगण्यात येते.

DSCF2475

%d bloggers like this: