पोकळा ची भाजी
ॐ
पोकळा ची भाजी : पोकळा पालेभाजी आहे. कोल्हापूर येथे
पोकळा पालेभाजी बारा महिने मिळते,या भाजीला लाल देठ असतात.
पानं पाने हिरवी असतात.लाल माठ पाले भाजीला लाल देठ व पानं पण लाल
असतात.पोकळा पालेभाजी देठा सगट निवडून घेतली. धुवून घेतली. विळीने बारीक
चिरली कोणी कोणी देठा सगट पोकळा भाजी न चिरता करतात. ग्यास पेटवून ग्यास वर
पातेले ठेवले तेलाची मोहरी घालून फोडणी केली चिरलेली पोकळा भाजी फोडणीत घातली.
थोडस शिजण्या करता एक बाउल पाणी घातले.पोकळा भाजीला वाफ आणली हरबरा डाळीचे
पीठ लावले.हळद हिंग लाल तिखट मीठ घालून सर्व पोकळा भाजी हलविली.परत दोन वाफ आणली.
पोकळा हरबरा डाळीचे पीठ लाल तिखट मीठ हिंग हळद तेल मोहरी ची फोडणी सर्व एकत्र पोकळा भाजी
तयार केली मी.कांदा घालून परतून पण पोकळा भाजी तयार करतात.