अरेबियन वाळवंट
ॐ
अरेबियन वाळवंट (Arabian Desert ) –
येमेन पासून पर्शियन आखाता पर्यंत पसरलेले हे वाळवंट असून ओमान, जॉर्डन व इराक पर्यंत अरेबियन उपखंडा चा बराच भाग त्याने व्यापलेला आहे.
याचं क्षेत्रफळ २,५०,००० चौ. मैल असून युरापातील फ्रान्स, बेल्जियम,नेदरल्यंडस् या तिन्ही देशांच्या एकत्रित क्षेत्रफळा पेक्षा ही ते मोठं आहे.या वाळवंटा च्या मध्यावर रुब -अल -खली नावाचा सलग वाळू चा डोंगर आहे.येथे ऑरिक्स , वाळू वर राहणारी मांजर व गोलाकार शेपट्या असणाऱ्या पाली आढळतात.अति गरम वाळूच्या डोंगरा पासून दलदली पर्यंत निसर्गाची सर्व रूपं येथे दिसतात.सौदी अरेबिया हा या वाळवंटा चाच एक भाग. येथे उन्हाळ्यात तापमान ४० – ४५ डिग्री से.व हिवाळ्यात ५ -१५ डिग्री से असते.तेल फॉस्फेट व सल्फर यांचा येथे मोठा साठा आहे.व यातील बराच साठा सौदी अरेबिया मध्ये मोडतो.
अल-खली या डोंगराची रांग पुढे पश्र्चिम ओमान व पूर्व येमेन मध्ये जाते.या भागात बऱ्याच वंशाचे लोक असून त्यात शिया व सुन्नी पंथ प्रमुख आहेत.