ऑस्ट्रेलिया खंडातील वाळवंट
ॐ
ग्रेट व्हिक्टोरिअन वाळवंट (Great Victoriaan Desert ) –
ऑस्ट्रेलिया खंडातील हे सर्वात मोठं वाळवंट असून याचं क्षेत्रफळ
४२४४०० चौ. कि.मी.आहे.खाणकाम व आण्विक चाचण्या यांच्या वरच
येथील लोकजीवन अवलंबून आहे.कोगारा नावाची जमात येथे वस्ती करून आहे.
हा भाग जरी कोरडा व दुर्गम असला तरी ऑ स्ट्रे लि या तील कॉनी सू हायवे व यान बीडेल
हायवे हे दोन महामार्ग या भागातून जातात. १८७५ मध्ये ब्रिटिश संशोधक अर्नेस्ट गाईल्स याने
पहिल्यांदा हा भाग ओलांडला व त्याने तेव्हाची राणी व्हिक्टोरिया हिचं नाव या भागास दिलं.
आज हा भाग तेथे असलेल्या प्राणी संपदेमुळे ‘वर्ल्ड वाइल्ड लाईफ फंड ‘चा संरक्षित विभाग
(Protected area )आहे.येथे मामुंगाऱी कॉ न्झ र्वे श न पार्क आहे.पालीचे वेगवेगळे प्रकार येथे
पाहावयास मिळतात.