ॐ
डेथ व्ह्यली (Death Valley ) –
हे जगातील अति उष्ण वालवंटा पैकी एक असून
अमेरिकन संघ राज्यातील क्यालिफोर्निया भागात आहे.
१९१३च्या जुलै च्या १० तारखेस येथील तापमान १३४ फ्यरनहिट
(५६ सेंटिग्रेड ) होतं.येथे हवेतील आर्द्रते चं बाष्पीभवन सर्वात जास्त आहे.
येथे वार्षिक दोन इंचापेक्षा ही कमी पाऊस पडतो.क्षार व अल्कली यांचं अनोखं
मिश्रण येथील खडकांच्या रचनेत आढळतं. या वालावंटा चं ‘मृत्यूदरी ‘ हे नाव
१८४९ च्या ‘गोल्ड रश च्या काळात पडलं. सोन्याच्या शोधात हा प्रदेश ओलांडून जावा
लागत असे. शुष्क व कोरड्या हवेमुळे बरीच जीवितहानी होत असल्याने ती मृत्यूदरी म्हणून
ओळखली जाऊ लागली. येथे ९०० प्रकारच्या विविध वनस्पती आढळतात. पाली उंदीर ,साप वगैरे
प्राणी वास्तव्यास आहेत पण या सर्वापेक्षा महत्वाचं म्हणजे येथे सापडणारा ‘डेव्हिल्स होल पपफिश’
(Devil ‘s Hole Pupfish ) नावाचा मासा.
ब्लॉग आवडला? इतरांना सांगा
Like this:
Like Loading...