आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 13, 2012

काईलकुम वाळवंट

                                                     ॐ
                                       काईलकुम (Kyzyl Kum ) –
उझबेक व तर्किश भाषेत काईलकुम चा अर्थ लाल माती असा होतो.
हे वाळवंट मध्य आशिया तील कझाकिस्तान, उझबेकिस्तान व तुर्कमेनिस्तान या
राज्यात पसरलेलं आहे.याचं क्षेत्रफळ २९८००० चौ. कि. मी. आहे.इथला बराचसा भाग
वाळूने व वाळूच्या डोंगरां नी व्यापलेला आहे.काही ठिकाणी ओयासिस हीआढळतात.
शेती करणाऱ्या काही जमाती या ओयासिस च्या बाजूने वस्ती करून राहतात.
येथील तपमान उन्हाळ्यात ५० डिग्री सें. पार करून जातं. १९८३ मध्ये येथील केरकी या
ठिकाणी ५१.७८ डिग्री से.तपमान याची नोंद झाली होती.बऱ्याच प्रकार च्या पाली,काळवीट,
रानडुक्कर आदि प्राणी येथे आढळतात. या प्राण्यांसाठी १९७ मध्ये राखीव सुरक्षित प्रदेशाची
योजना केली गेली.हे वाळवंट येथे मिळणाऱ्या सोने, युरेनियम, तांबे यल्युमिनिअम, नैसर्गिक
तेल व वायू यासाठी प्रसिध्द आहे. मुरूनटाऊ येथील सोन्याच्या खाणीची प्रगती १९७० च्या दशकात
झाली. समरकंद हे या वाळवंट येथील प्रमुख शहर आहे.

%d bloggers like this: