येशू
ॐ
येशू : शत्रूवर प्रेम करणें
“आपल्या शेजाऱ्यावर प्रीति कर’व आपल्या वैऱ्या चा व्देष कर,
असे सांगितले होतें ते तुम्ही ऐकलें आहे.मी तर तुम्हांस सांगतो
तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीति करा.आणि जे तुमचा छळ करितात
त्यांच्या साठी प्रार्थना करा, म्हणजे तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे
पुत्र व्हाल कारण तो वाईट यावर व चांगल्या वर आपला सूर्य उगवितों आणि
धार्मिकांवर व अधार्मिकां वरही पाऊस पडतो.
तुमचा न्याय होऊ नये म्हणून तुम्ही न्याय करू नका लोकांनी जसे तुम्हां बरोबर
वर्तन करावें म्हणून तुमची इ च्छा आहे, तसेच तुम्ही त्याजबरोबर वर्तन करा.
जे तुम्हांवर प्रीति करितात त्याजवर तुम्ही प्रीति करीता तर रिता तर त्यात विशेष काय करीता ?
जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे,तसे तुं म्ही व्हा.