आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 16, 2012

अंबाडा ची भाजी

                                       ॐ
अंबाडा ची भाजी: उन्हाळा मध्ये आंबाडा आंबंट भाजी पाले भाजी
म्हणून मिळते.आंबांडा भाजी ची पाने निवडून घेतली.धुवून घेतली.
मध्यम अशा प्रकारे चिरून घेतली.पातेल्यात आंबांडा भाजी चिरलेली घातली.
थोड पाणी घातले. पेटत्या ग्यास वर भाजी पाणी एकत्र केलेले पातेले ठेवले.
चांगली लगेच चं आंबांडा भाजी शिजली.आधी कुकर मध्ये तुरीची डाळ हळद पाणी घालून
चार शिट्या देऊन शिजवून घेतली.कुकर गार झाल्या नंतर आंबांडा भाजी शिजलेली डावाने हटवून
घेतली. तुरीचे डाळीचे वरण हटवून घेतले.आंबांडा भाजीत वाटीभर वरण घालून लाल तिखट मीठ थोडी हळद
कारण तुरीच्या डाळीच्या वरणात हळद घातली आहे.म्हणून थोडी हळद घालून सर्व आंबांडा भाजी तुरीचे डाळीचे वरण
तिखट मीठ हळद एकत्र हटविले,शिजवून परत एकत्र केले. नंतर तेल मोहरी याची फोडणी करून लाल मिरची घातली.
आंबांडा भाजीत घातली.भाकरी केली.भाकरी आंबांडा भाजी मस्त चवदार जेवण केले.झाले.आंबांडा भाजीचे पाणी काढून
टाकले नाही.तो आंबांडा भाजीचा आंबट पणा चांगला लागतो. उन्हाळा मध्ये चा आंबांडा भाजी मिळते. उन्हाळा मध्ये
आंबट खातात.कैरी आंबांडा भाजी.लिंबू सरबत इत्यादी.

                                               DSCF2484

कालाहारी वाळवंट

                                                ॐ
कालाहारी – आफ्रिका येथील सहारा खालोखाल आणखी एक प्रसिध्द
वाळवंट म्हणजे कालाहारी.हे वाळवंट बोटस्वाना, NAIRRUTYA आफ्रिका व
दक्षिण आफ्रिका च्या संघराज्यात पसरलेलं आहे.बोटस्वाना येथे माकारिका नावाच्या
खचलेल्या वालुकामय प्रदेशात क्षारयुक्त सरोवर आहे.या सरोवरात उत्तरेकडून वाहणाऱ्या
ओकाव्हयांगो नदीचे पाणी मुरतं.उत्तरेत खुरट्या वनस्पतीची अरण्यं ही आढळतात.येथे ‘बेओबाब’
नावाची वनस्पती आढळते.इथली वाळू प्राचीन प्रस्त्रातील लाल पाणी शोषून घेणारी असल्याने येथे पाण्याचे
प्रवाह कमी दिसतात.या भागात कालाहारी गेम्सबॉक हे राष्ट्रीय उद्दान असून हरणे शहामृग हत्ती सिंह चित्ता तरस
कोल्हा असे असंख्य प्राणी येथे आढळतात.वाळवंटा च्या आतल्या भागात शिंकारा (चिंकारा ) वरच जगणारी बुशमान
ही एकच जमात असून सरहद्दी वर बांटू लोकांची वस्ती आहे.दळण वळण यास लायक सुविधा झाल्याने बरेच उद्दोग येथे
आज वाढीस लागले आहेत.बोटस्वाना तील जनतेचा मतानुसार ते वाळवंट नसून कोरडा प्रदेश आहे.त्याचे कारण इतर
वाळवंट याचा मानाने येथील पर्जन्यमान जास्त आहे.पण तुरळक व एका ठिकाणी स्थिर नसलेला पाऊस व जमिनीतील न
मुरण्याने येणारा कोरडेपणा यामुळेच या प्रदेशाची गणना वाळवंट ह्यात होते..

%d bloggers like this: