जोग फॉल्स धबधबा
ॐ
जोग फॉल्स किंवा गिरसप्पा चा धबधबा:
कर्नाटक येथील शिमोगा जिल्हा असलेला हा धबधबा गिरिसिप्पा, जोगदागुंडी अशा विविध नावानं संबोधिल जातो.हा धबधबा भारतातील सर्वात उंच धबधबा मानला जातो.सरावती नदीच्या प्रवाहातून तयार झालेला हा धबधबा २५३ मीटर उंचीवरुन खाली कोसळतो.याचा उगम तीर्थहल्ली जिल्हातील अंबुतीर्थ येथे होतो.पश्र्चिम घाटातून वायव्य दिशेनं वाहत वाहत हा जलौघ होनावर या शहरातून पुढे अरबी समुद्रास मिळतो.गीरसप्पा धबधब्याजवळ च होन्नेरमारडू (Honnermaradu ) नावानं ओळखली जाणारी नदी (खाडी ) आहे.पाण्यातील खेळासाठी ही नदी प्रसिध्द आहे.चहुबा जुंनी हिरव्यागार वनश्रीनं नटलेल्या या ठिकाणाहून सूर्योदय व सूर्यास्त बघण्याची गंमत कांही और च आहे.
जवळच असलेलं तुंगा अ नैकट ANAIKATA ण्यकट धरण व तेथील तलाव नौका विहारासाठी प्रसिध्द असून तेथून जवळ च असलेल ‘लायन टायगर रिझर्व’ तेथील रॉयल BEMGOLA टायगर, हरीण अस्वल व गोल्डन लंगुर यांच्या साठी प्रसिध्द आहे.