आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 18, 2012

हारोळी

                                             ॐ
हारोळी : कणिक म्हणजे गव्हाचं पीठ घेतले.त्यात रोजच्या पेक्षा
जास्त चव येईल असे असं मीठ घातले.तेल पण जास्तच घातले. रोजच्या
पेक्षा घट्ट कणिक तिंबली तिंबले.भिजविली.थोड्यावेळ ठेवून हातानेच कणिक मोठी
केली.त्याला तेल लावले.परत घडी केली.परत तेल लावले परत घडी केली.पेटलेल्या ग्यास वर
चिमटा त हारोळी धरून दोन्ही बाजूने चांगली भाजून घेतली.भरपूर तेल घालून ही हारोळी नुसतीच
खातात.माझी आजी आई ची आई अशा प्रकारे हारोळी चुली च्या बाजूला भाजून आम्हाला खाण्यास देत असे.
मी थोडी जाड सर कणिक घेऊन लाटण्याने लाटून तव्यावर पण भाजून हारोळी केली आगे.कांही जणांना ग्यास चा
वास आवडत नाही.फुलके आधी तव्यावर भाजून ग्यास शेगडीवर भाजतात.

                                          DSCF2504

              DSCF2483

नामिब वाळवंट

                                                ॐ
नामिब (Namib ) वाळवंट – आफ्रिका येथील नामिबिया व अंगोला चा काही
भाग व्यापणारं हे वाळवंट असून त्याच क्षेत्रफळ ८०,९०० चौ.कि.मी. आहे.
जगातील हे सर्वात जुनं वाळवंट मानलं जातं.ते ८० दशलक्ष वर्ष अस्तित्वात
असल्याचा संदर्भ सापडतो.त्या काळी वाळूचा वाहता समुद्रच होता असाही उल्लेख
सापडतो.तेव्हा ३५० मीटर उंच वाळूरूपी लाटा येथे उठत.येथे सरासरी पाऊस’ ०४ इंच
इतकाच पडतो.त्यामुळे हा अति शुष्क व अति कोरडा प्रदेश मानला जातो.बेंगुओला नावाच्या
प्रवाहामुळे येथे थोडी आर्द्रता आहे येथे दुर्मिळ वनस्पती व प्राणीजीवन आढळतं. इथे ‘वेल्विश्र्चीया’
नामक एक वनस्पती असून याला दोनच पट्ट्यासारखी पाने उगवतात.या पानाची लांबी बरीच असू शकते.
अति कोरड्या नामिब वाळवंटात ही वनस्पती तग धरून आहे.काही वेळा किनारपट्टी वरून वाहत असलेल्या
हुक्यातील आर्द्रता शोषून घेते.वालुकामय डोंगरां च्या पायथ्याशी वस्ती करून जाती -जमाती वस्ती करून आहेत.
या वातावरणा कडे व निसर्ग ह्या कडे शास्त्रज्ञ आकृष्ट झाले आहेत.ज्यामुळे ‘स्केलेटन कोस्ट’ च्या आजूबाजूला
बऱ्याच जहाजां ची दिशा भूल होऊन ती भरकटतात.हा किनारा बोटी फुट ण्यासाठी (Shipwreck ) कुप्रसिध्द आहे.
हिरे मीठ व टंगस्टन यांचा मोठा साठा सापडतो.येथे जायच म्हणजे नामिबिया च्या विंडहोक या राजधानी च्या
शहरा पासून ४८० कि.मी. पुढे विमानाने जावं लागतं.

%d bloggers like this: