आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 19, 2012

डिस्कवरी अंतरीक्ष विमान

अमेरिकेने डिस्कवरी नावाचे अंतरीक्ष विमान निवृत्त केले.

ह्या विमानाला वॉंशिंग्टन येथे स्मिथसोनीयन संगहालयात ठेवणार आहेत.

एक नेहमीचे विमान ह्या अंतरीक्ष विमानाला फ्लोरिडा ते वॉंशिंग्टन संग्रहालयात घेऊन गेले

त्याची हि सुंदर दृश्ये बघण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा

अॅबी धबधबा

                                             ॐ
अॅबी – कर्नाटक येथील कोडुगु जिल्हा तील मेडिकेरी या प्रसिध्द
पर्यटन स्थळापासून १० कि.मी. अंतरावर असलेला हा धबधबा कॉफी
व मसाल्याचा जंगलासाठी प्रसिध्द आहे.हा धबधबा म्हणजे घनघाट
जंगल रुपी कोंदणात वसलेलं शुभ्र रत्नच जणू वर्षभर मुबलक पाण्याचा
वरदहस्त लाभल्याने उन्हाळा तही एक आल्हादायक सुखद गारवा तिथं
अनुभवता येतो.धबाधबा बरोबर च आजूबाजूला असलेल्या कॉफी च्या वेलची च्या
बागाही पर्यटन पाहतात धबधबा राष्ट्रीय महामार्गा जवळ च असल्यानें जाण्यायेण्यास
अत्यंत सोयीस्कर आहे.पक्षी निरीक्षणा साठी हे ठिकाण प्रसिध्द आहे.पहाटेच्या सुमारास
होणारे पक्षाचे गुंजन वातावरण संगीतमय बनवतं.आजूबाजूचा डोंगर हिरवीगार वनराई व
वातावरणा वरील गारवा यामुळे हि जागा पर्यटक ह्या साठी प्रसिध्द आहे.

गोबी वाळवंट

                                              ॐ
गोबी (Gobi ) – हे मध्य आशियातील सर्वात मोठं वाळवंट !
मंगोलिया, इनर मंगोलिया व चीनचा कान्सू हे प्रांत मिळून
मोठ्या चंद्रकोरी सारखा भाग या वाळवंट याने व्यापलेला आहे.
चिनी भाषेत गोबीला shomaa (वाळूचा ओसाड प्रदेश ) म्हणतात.
तसंच हानहाई (कोरडा समुद्र ) असंही म्हणतात.गोबीच्या nairrutya भाग
पूर्ण पणे वालुकामय आहे.झिजलेल्या रुंद माथ्याच्या घडीच्या टेकड्या आहेत.
गोबी चं वाळवंट सरळ, लांबलचक गाडी चालविता येईल एवढं सपाट आहे.
अधून मधून रुंद द्रोणाच्या आकाराचे प्रदेश इथे सापडतात.ज्याला मंगोलियन्स ‘ताल’
असं म्हणतात.वनस्पती व वस्ती आढळते.थंडीत बर्फाचे वादळ व उन्हाळ्यात उष्ण वाळूच्या
तुफानी वादळां च्या तडाखा बसतो.नद्दा जवळ जवळ नाहीत सांबर खारी हरण त्याचा प्रमाणे
भटक्या लोकां नी पाळलेल्या शेळ्या – मेंढ्या ,गाई -बैल ,उंट -घोडे हेच येथील प्राणीजीवन.
phronsisa यंगहजबंड (१८६५ -१९५२ ) व त्याच्या सहका ऱ्यास येथे डायनॉसॉर व त्यांची अंडी
मिळाल्या ची नोंद सापडते.१९५० च्या आसपास पश्र्चिम गोबी मध्ये चीन यांनी तेल खाणीचा शोध लावला.
या वाळवंट याला फ्लेमिंग क्लि ट्स (fiaming clitts ) असं ही म्हणतात.

%d bloggers like this: