आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 20, 2012

रेडीओ सिलोन

                                        ॐ
रेडीओ सिलोन : रेडीओ सिलोन म्हटलं की आजही दर्दी श्रोते
आठवणीत हरवून जातात.विविध वयोगटातील, जातीधर्मांतील,
भिन्न विचार सारणी च्या देश परदेश येथील करोड श्रोत्यांना एका
सुरेल माळेत गुंफण्याचे कार्य सिलोन ने केले.१९४९ ते १९७४ या सुवर्ण काळातील
अजरामर गाणी रेडीओ सिलोन ने रसिकांना केवळ ऐकविली च नाहीत तर श्रोत्यांमध्ये
एक आगळा ऋणानुबंध निर्माण केला १९४९ ते ६० व्या काळखंडात ऑल इंडिया रे डी ओ वर
हिंदी सिनेमा गीतांना बंदी असतांना रे डी ओ सिलोन ने ती सारी गाणी घराघरात पोहचविली.
आशिया खंडातल्या विविध भाषा मधल्या ३५ हजार ओरीजनल रेकॉर्ड्स सिलीन च्या संग्रही असून
विविध भारती कडे नसलेल्या अनेक रेकॉर्ड्स चा त्यात समावेश आहे.
आज गुरुवार पासून १९ .एप्रिल (४) २०१२ सकाळी ६.४२ ते ९ आणि संध्याकाळी ७ ते ९ या वेळात
सिलोन चे प्रसारण (नवीन ट्रा न्स मिश न वर २५ मीटर SHORTWAVE सुरु होत आहे.

येशू

                                                    ॐ
                                येशू : मेंढपाळ आणि देवदूत
त्याच प्रांतात मेंढपाळ रानांत राहून रात्री आपले कळप
राखीव होते.तेंव्हा प्रभूचा त्यांच्या जवळ उभा राहिला.प्रभुचे
तेज त्यांच्या भोवते प्रकाशले आणि ते भयभीत झाले.तेंव्हा देवदूत
त्यांस म्हणाला.”भिऊ नका, कारण पाहा,जो मोठा आनंद सर्व लोकांस
होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हांस सांगतो.ती ही की,तुम्हांसाठी आज
दाविदाच्या गांवांत तारणारा जन्मला आहे.तो खिस्त प्रभु आहे,आणि तुम्हांस
खूण हीच की बांळंत्याने गोंडाळलेले व गव्हाणीत निजाविलेले उसे बाळक तुम्हांस
आढळलेल.” इतक्यात अकस्मात स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूता जवळ
प्रगट झाला, हे देवाची स्तुती करीत म्हणाले, “उर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर
मनुष्यांस शांति. यांजवर त्याचा प्रसाद झाला आहे.”
मग देवदूत स्वर्गास गेले.तेंव्हा ते घईघाईने गेले तो मरिया, योसेफ व गव्हाणीत निजाविलेले
बाळक ही त्यांस आढळली. मग सर्व ऐका णा ऱ्यां नी त्या मेंढपा ळांनी सांगितले ल्या गोष्टीविषयी
आश्चर्य केले नंतर मेंढपाळास सांगण्यात आले होते त्या प्रमाणे त्या सर्व गोष्टी त्यांनी ऐकल्या व
पाहिल्या ह्यामुळे ते देवाचे गौरव करीत माघारे गेले.

सोनोरण वाळवंट

                                                     ॐ
सोनोरण (Sonoran ) – हे वाळवंट अमिरका संघ राज्याच्या व मेक्सिको
च्या काही भागात पसरलं आहे.उत्तर अमेरका तील हे अति कोरडं, उष्ण व
सर्वात मोठं वाळवंट आहे.जगातील एकमेवाव्दितीय सागुआरा नामक क्याक्टस
(kyktasa ) ची जात येथे आढळते.या भागात १७ प्रकारचे स्थानिक, मूळ रहिवासी
वस्ती करून आहेत. या भागातील सर्वात मोठं शहर म्हणजे फिनिक्स (Phoenix ) हे
अॅरिझोन नातील ठिकाण.

%d bloggers like this: