आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 21, 2012

होगेनाक्कल धबधबा

                                                ॐ
होगेनाक्कल (Hogenakkal ) – कर्नाटक व तामिळनाडू च्या सीमेवर असलेला
हा धबधबा बंगळुरु हून १३३ कि.मी. अम्तरावर व सेलमपासून ११४ कि.मी. अंतरावर
आहे.हे अतिशय नयनरम्य व सुंदर ठिकान आहे.तिथे जान्यासाठी उत्तम काळ म्हणजे जुलै,
ऑगस्ट. या दरम्यान पाणी मुबलक असतं. या काळात धबधबा तून पडणाऱ्या पाण्याची पातळी
नेहमीपेक्षा २० ते ३० फूट जास्त असते.होगेनाक्कल हा एकच धबधबा नसून धबधबा यांची मालिकाच आहे.
आजूबाजूला औषधी वनस्पती युक्त जंगलातून याचा प्रवाह वाहत येत असल्याने या paanyaatil आंघोळ स्वास्थाला
लाभदायक व उत्साहवर्धक मानली जाते.आंघोळी नंतर विविध औषधी युक्त तेलाने मालिश केल्याने प्रकृतीला फायदा
होतो.असं मानतात.होगेनाक्कल ला जाऊन तेथील ‘तप्पा’ म्हणजे च वाड ग्या सारखा तराफा तून विहार केल्याशिवाय
आपली सफर पूर्ण होतच नाही.तेप्पा हे जगातील, नौका नयनाच्या सर्वात जुन्या साधना पैकी एक मानल जातं आजूबाजूच्या
टेकड्या वरून ट्रेकिंग किंवा पडब्रम णाचा पर्याय ही आजमावता येतो.

थर वाळवंट

                                                    ॐ
थर (Thar ) – भारताच्या पश्र्चिम सीमेवरील राजस्थान व गुजराथ पासून शेजार च्या
पाकिस्तान च्या पूर्व भागा पर्यंत पसरलेला या वाळवंटास ‘ग्रेट इंडियन डेझर्ट ‘ असंही
म्हणतात.मैलो न् मैल पसरलेली इथली वाळू सोनेरी उन्हात चमचमत असते.तज्ञाच्या मते
हे वाळवंट ४००० वर्षां पेक्षा ही प्राचीन आहे. येथे फार पूर्वी धग्गर नावाची नदी वाहत होती.
ती कालां तराने लुप्त झाली. या वाळवंटा चा उल्लेख रामायणात ‘लवणसागर’ असा केलेला आहे.
ऋग्वेद व महाभारत ह्यात याचा उल्लेख आढळतो.थोड्या पाण्यावर चालणारी शेती व पशुपालन
हा इथला मुख्य व्यवसाय.ब ऱ्याच वेळा येणाऱ्या अवर्षाणात ही येथील जनजीवन मस्त, रंगील आहे.
येथील लोकांना रंगीबेरंगी कपडे व दागिने घालण्याचा शौक असून ते पर्यट कांच खास आकर्षण आहे.
जैसलमेर हे येथील प्रमुख पर्यटन केंद्र येथून सरक त्या वालुकामय टेकड्या ची उंटा वरून सफर करण्याची
सोय आहे.तळपत ऊन व तळपत्या वाळूत ही येथील जीवन संपन्न आहे.

%d bloggers like this: