केम्टी धबधबा
ॐ
केम्टी धबधबा – केम्टी धबधबा डेहराडून शहरापासून २० कि.मी.
अंतरावर तर मसुरी पासून १५ कि.मी. अंतरावर आहे.१८३५ साली
जॉन मेकिनन या ब्रिटिशानं या जागेचा शोध लावला. केम्टी हा शब्द
कँप – टी (Camp – tea ) पासून उदयास आला. त्याकाळी इंग्रज ‘टी पार्टी ‘
चं ठिकाणी आयोजन करीत. हा धबधबा भारतातल्या अप्रतिम धबधबां पैकी
एक मानला जातो.जवळच म्हणजे बारा कि.मी.अंतरावर यमुना नदी वाहते.या
नदीतील मासे मासेमारे यांना नेहमीच आकर्षित करतात.मात्र मासेमारी साठी
परवानगी घ्यावी लागते.हा धबधबां चा परिसर फक्त मार्च ते जुलै या दरम्यान
पर्यटक यांच्या साठी खुला असतो.