आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 23, 2012

सावदाव धबधबा

                              ॐ
सावदाव – कोकणातील कणकवली गावापासून १० कि.मी.
अंतरावर हा धबधबा आहे.हा धबधबा फक्त पावसाळ्यातच
वाहतो.उन्हाळ्यात काहिलीपासून वाचण्यासाठी.पर्यटक तिथेही
येतात.जवळ च असलेल्या कुणकेश्र्वर मंदिरात ही जाता येतं. अजून ही
पर्यटक यांना जास्त माहित नसलेला भाग हा भाग प्रसिध्द पावतो आहे.

                               DSCF2506

अंटार्क्टिका वाळवंट

अंटार्क्टिका – पृथ्वी च्या दक्षिणेकडील टोक म्हणजेच दक्षिण ध्रुवा जवळील प्रदेश याचं क्षेत्रफळ १४ दशलक्ष चौ.कि.मी.असून ९८ टक्के प्रदेश बर्फाच्या जाड थराने व्यापलेला आहे.हा एकाच वेळेला बर्फामुळे थंड पण कोरडा प्रदेश असून याला वाळवंट म्हटलं जातं, ते तिथे होणाऱ्या अति कमी पर्जन्या मुळे या वाळवंट याचा शोध १८२० मध्ये मिखाईल लाझारेव व फाबियन गोटलिब वॉन बेलिं ग्जहाऊसेन या दोघांनी लावला.१८९० साली स्कॉटिश कार्टोग्राफर जॉन जॉर्ज बार्थोलोम्यू याने या जागेचं अंटार्क्टिका
असं नामकरण केलं.

ग्रीक शब्द ‘Antartike ‘ – म्हणजेच उत्तरेच्या विरुध्द – या शब्दापासून Antarctic या नावाची व्युत्पती झाली.१९५९ मध्ये १२ देशांनी मिळून ‘अंटार्क्टिक ट्रीटी’ नावाचा तह केला आज ४८ देश तहात सहभागी आहेत. येथे टोकाचं थंड हवामान असून आधुनिक काळात बरेच पर्यटक या वाळवंट या कडे आकर्षित झाले आहेत.

%d bloggers like this: