तलैयार धबधबा
ॐ
तलैयार धबधबा – दिंडगुल जिल्हातील मंडलार नदीवर पळणी च्या
खोऱ्यात हा तलैयार धबधबा आहे.तामिळ नाडूतील हा सर्वात मोठा
धबधबा आहे.यास ‘रॅट टेल’ धबधबा असं ही म्हणतात.या धबधबा च्या
वरच्या दोन्ही बाजूंस सिमेंटची भिंत असल्याने प्रवाह जेव्हा भिंती वरून
खाली येतो तेव्हा त्याचा आकार उंदरा च्या शेपटी सारखा होतो.या धबधबा च्या
वरच्या भागावर म्हणजेच सिमेंट च्या भिंती पर्यंत जाता येतं. मात्र हा भाग कठीण व
थोडा आव्हानात्मक आहे.कोडाई च्या डमडम व्हा पॉ ई ट पासून सहज दिसून येणारा हा
धबधबा हळूहळू प्रकाश झोतात येत आहे.