आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 26, 2012

अंब्रेला धबधबा

                                               ॐ
अंब्रेला धबधबा – नाशिक जवळ भंडारदरा धरणाच्या खालच्या बाजूला
छत्रीचा आकारात कोसळणारा हा धबधबा नाशिक शहरापासून ५० कि.मी.
अंतरावर आहे.जवळच असलेल्या पुलावरून हा छत्रीचा आकाराचा धबधबा पाहता येतो.
हा धबधबा ही महाराष्ट्रातील इतर काही धबधबा प्रमाणे फक्त पावसाळा तच धबधबा याचे
सौंदर्य खुलून येतं. जवळ च असलेला ऑर्थर लेक व रंधा फॉल्स ही पाहण्या सारखा आहे.

पॅटागॉनिया (Patagonia) वाळवंट

पॅटागॉनिया (Patagonia ) – हे दक्षिण अमेरका तील सर्वात मोठं वाळवंट आहे.अर्जेटिना व चिलीचा प्रदेश या वाळवंट ह्यात येतो. अतिशय थंड हवामानाचं हे ठिकाण असून इथलं तापमान १२ अंश  सें च्या वर जात नाही.सात महिने हिवाळा व पाच महिने उन्हाळा चे दिवस असतात. काही अति प्राचीन गुहा दडलेल्या असून लोकवस्ती च्या खुणा गुहेतील भिंतीवर असलेल्या तैलाचीत्रात आढळतात. येथे चित्र विचित्र कोल्हे आढळतात. दक्षिण अमेरीकातील अँडीज पर्वत रंगाच्या पल्याड हे वाळवंट असून पॅसिफिक महासागरा वरून वाहणारा  दमटपणा येथे अलीकडेच अडतो. म्हणूनच सागरा पासून जवळ असूनही हा प्रदेश कोरडा आहे.

व म्हणूनच त्याला वाळवंट म्हटलं जातं.

%d bloggers like this: