अतिरमपल्ली व वाझाचल धबधबे
ॐ
अतिरमपल्ली व वाझाचल – केरळ येथील त्रिशूल जिल्हातील
शोलैयार जंगलातून वाहत येणारे हे दोन्ही धबधबे त्रिशूल शहरा पासून
९० कि. मी. अंतरावर आहेत. अतिरमपल्ली हा धबधबा ८० फुटां वरून खाली
कोसळतो.व नंतर चालक्कुडी या नदीस मिळतो.वाझाचल हा धबधबा घनदाट
मध्यावर असून नदीचाच एक भाग आहे.सकाळी आठ ८ ते संध्याकाळी सहा ६ वाजेपर्यंत
तिथे जाता येतं. सप्टेंबर -ऑक्टोबर महिना तिथे जाण्यास उत्तम आहे.हा जंगलमय प्रदेश वन्य
पशु व वनस्पती जीवनासाठी प्रसिध्द आहे.जवळ च असलेलं ‘सिल्व्हर स्टोन व ड्रीम ‘ हे थीम पार्क
प्रसिध्द आहे.तऱ्हे तऱ्हे च्या औ ष धी वनस्पती, हत्ती वगैरे प्राणी तिथे सहज आढळतात.मलकापारा टी
बाग ही तेथे मिळणा ऱ्या चहा साठी प्रसिध्द आहे.या धबधबा जवळ जाण्यास मात्र सक्त मनाई आहे.