बटाटे वडे
ॐ
बटाटे वडे : प्रथम छोटे बटाटे घेतले.धुतले त्याचे दोन भाग विळीने केले. कुकर मध्ये बटाटे घातले.बटाटे भिजतील इतके पाणी कुकर मध्ये घातले. गॅस पेटवून कुकर ठेवला. ४/५ चार/पाच शिट्या दिल्या.कुकर गार झाल्यानंतर कुकर चे झाकण काढले.उकडलेले बटाटे एका पातेल्यात गार करण्यास ठेवले. बटाटे गार झाल्या नंतर उकडलेल्या बटाटे याचे साल काढली.अंदाजाने मीठ हिरवी मिरची वाटलेली लसून वाटलेला चिरलेली कोथिंबीर असं सर्व उकडलेल्या बटाटा मध्ये घातले.हाताने उकडलेला बटाटा व सर्व मिश्रण एकत्र उकडलेल्या बटाटा मध्ये एकत्र केले.त्याचे छोटे छोटे गोळे लाडू केले.दुसऱ्या पातेल्यात डाळीचे पीठ अंदाजाने घेतले. डाळीच्या पिठात लाल तिखट मीठ हळद हिंग कच्च तेल घातले.पातळ करण्या करता पाणी घातले.सर्व डाळीचे पीठ तयार केले. गॅस पेटवून तेल कढई सगट पेटत्या शेगडी वर ठेवले.एक एक बटाटा गोळा चपटा केला डाळीच्या पिठात बुडवून तापत्या तेलात तळून काढला.असे सर्व बटाटे वडे तयार केले.मस्त चव आली.उकडलेल्या बटाटा मध्ये मीठ हिरवी मिरची बारीक केलेली लसून बारीक केलेला कोथिंबीर चिरलेली गरम तेलात डाळीच्या पिठात मीठ लाल तिखट कच्च तेल हळद सर्व घातलेले ह्यात बुडवून तापत्या तेलात तळलेले बटाटे वडे मी तयार केले. तसेच बटाटे याच सारण थोड बाजूला ठेवले. कणिक घेतली कणिक मध्ये लाल तिखट मीठ कच्च तेल हळद घातली. पाण्यात सर्व कणिक भिजवून ठेवली.गॅस पेटवून तवा ठेवला.पोळपाट लाटणे घेतले.कणिक याचा गोळा घेतला कणिक मध्ये बटाटा सारण भरलं.पोळी सारखे लाटून तापत्या तव्यावर पोळी व बटाटा सारण एकत्र केलेले पराटा दोन्ही बाजूने भाजून तेल लावले.बटाटा पराटा तयार केला.कणिक मध्ये मीठ लाल तिखट कच्च तेल ह्यामुळे पापुद्रा याला पराटा याला चव चांगली आली.