आपले स्वागत आहे!

Archive for मे, 2012

बुध्दिबळ

बुध्दिबळ

‘पंचमा ‘नंद

विश्वनाथन आनंद पाचव्यांदा

वर्ल्ड चॅम्पियन , गेलफंड चीत

त्रेत्याकॉव आर्ट गलॅरीतील वर्ल्ड चेस चॅम्पियनशीपदरम्यान

पुन्हा एकदा आला. सलग चौथांदा आणि एकंदरीत पाचव्यांदा

वर्ल्ड चॅम्पियन चा मान आनंदने रुबाबात पटकावला.

पुढील दोन वर्ष २०१४ पर्यत आनंद च्या डोक्यावर जगज्जेतेपदाचा मुकुट असेल .

DSCF2627

बटाटा चा किस

                                  ॐ
बटा टा चा किस : दोन मोठे बटाटे घेतले.धुतले.
किसनिने ताटात किसले परत थोड पाणी घालून धुतले .
खर तर परत किस धुत नसतात.मोकळा होण्याकरता धुतला.
गॅस पेटवुन पातेले गॅस वर ठेवले .तूप जिरे याची फोडणी केली.
हिरवी मिरची दगडी खलबत्ता त ठेचून घेतली.चिरलेली मिरची व ठेचलेली मिरची
ह्यात चव वेगळी लागते.हिरवी मिरची ठेचलेली तूप जिरे फोडणीत घातली.टाकली.
किसलेला बटाटा टाकला झाकण ठेवून किसलेला बटाटा ठेचलेली हिरवी मिरची तूप जिरे ची फोडणी
सर्व वाफ आणल्या नंतर मीठ घातले.शेंगदाने याचा कूट घातला लिंबू पिळले.परत एक वाफ आणली .
बरोबर शेंगदाने कूट लाल तिखट मीठ घालून चटणी केली.
किसलेला बटाटा शेंगदाने कूट ठेचलेली हिरवी मिरची मीठ तूप जिरे याचा बटाटा कीस तयार केला.झाला.

                                   DSCF2626

श्री नामदेव गाथा

                                         ॐ
                                श्री नामदेव गाथा
                              श्रीज्ञानेश्वरांची आदि
[ ८७७ ]
ऐसा नित्यानित्य चालतां सुपंथी | पदोपदी कीर्ति नामघोष || १ ||
आला आळंकापुरी इंद्रायणी -तीरी | स्नानसंध्या करी देवपूजा || २ ||
देखोनी सुब्राह्मण केलेंस नमन | वंदिले चरण सिदोपंतीं || ३ ||
कोण तुमचा गांव आलेति कोठून | काय अभिधान गमन कोठें || ४ ||
विठ्ठलाचें नाम रामेश्वरीं भाव | वृत्ति आपेगांव गोदातीरी || ५ ||
मातापिता वृध्द वसताती तेथें | व्दारकादि तीर्थें करुनी आलों || ६ ||
आजि धन्य भाग्य स्वामीचें आगमन | आश्रम पावन कीजे माझा || ७ ||
आणुनी मंदिरीं सारुनी भोजन | निद्रा करविली पूर्ण तया हातीं || ८ ||
तंव स्वप्न अवस्थेमाजी येउनि पंढरीनाथ | म्हणे कन्या सालंकृत द्दावी यासी || ९ ||
प्रात:काळ जाला नित्यनेमु सारिला | मग नमस्कार केला सिदोपंतीं || १० ||
वंदोनिया चरण सांगीतलें स्वप्न | कान्यापाणिग्रहण कीजे तुम्ही || ११ ||
हासोनी उत्तर बोले पैं सारांशें | आज्ञा श्रीनिवासें केली नाहीं || १२ ||
आजिचा सुदिन स्वस्थ करुनी मन | वंदिले चरण सिदोपंतीं || १३ ||
ऐसे सुसंकल्प हेवावती मनीं | तुळसीवृंदावनीं निद्रा केली || १४ ||
मग विश्वीं विश्वंभर व्यापुनियां स्थानीं | येऊनियां स्वप्नीं काय बोले || १५ ||
भक्ति आणि ज्ञान वैराग्य आवडी | हे वसती उघडीं तुझ्या अंगीं || १६ ||
मूर्तिमंत चारी जन्मती इच्या उदरीं | म्हणोनि स्वीकारी आज्ञा माझी || १७ ||
उठोनि विठ्ठलें स्वप्न सांगितलें | हरुषें वंदिले सिदोपंतीं || १८ ||
पाचारोनी जोशी घटीतार्थ पाहिले | गुण उतरले छत्तीसही || १९ ||
निर्धारिलें लग्न मिळाले ब्राह्मण | निर्विघ्न पूजन केलें आधीं || २० ||
देवकप्रतिष्ठा ब्राह्मणपूजन | घटिका जाली पूर्ण म्हणती व्दिज || २१ ||
कुळदेवस्मरण म्हणती सावधान | उभयतांचें मन पांडुरंगीं || २२ ||
जालें पाणिग्रहण विधीसी अर्पण | वंदिले चरण सिदोपंती || २३ ||
पांडुरंगक्षेत्रा मिळालीसे यात्रा | आले पंढरपुरा भक्तराज || २४ ||
गरुडटके पताका मृदगं वाजती | वैष्णव गर्जती जयजयकारें ||२५ ||
गरुडपारीं उभें दाटी वैष्णवांची | उपमा वैकुंठीची पंढरीये || २६ ||
राउळाभीतरीं प्रवेशलीं दोघें | देखियेले उभे पांडुरंग || २७ ||
कायावाचामनीं पारुषले नयनीं | मस्तक चरणीं ठेवियेला || २८ ||
विठ्ठलासी ध्यान रामकृष्णमाळा | हृदयीं जिव्हाळा श्रीमूर्ति राया || २९ ||

श्री नामदेव गाथा

                                            ॐ
                                  श्री नामदेव गाथा
श्रीज्ञेश्वरांची आदि
[८७४ ]
बैसलियां दोघें भ्रतारवल्लभें | उदरींचा गभ्रे तेंचि ध्यान || १ ||
भक्ति नवमास भरले पूर्ण दिवस | आलें वैराग्य डोळस मुर्तिमंत || २ ||
विठ्ठल आवडी ठेवियेले नाम | निराईस प्रेम गहिनीनाथीं || ३ ||
[ ८७५ ]
व्रतबंधदीक्षा उपदेश गायत्री | ॐ कार मूळमंत्री स्वर सोळा || १ ||
केलें वेदपठण काव्य आणि व्याकरण | जालासे निपुण शात्रवक्ता || २ ||
मग पुष्करादि तीर्थें पाहावीं समस्तें | अनुताप चित्तें धरियेला || ३ ||
वैराग्यपुतळा ज्ञानगम्य मुर्ति | निघालासे भक्ति तीर्थाटणा || ४ ||
विठ्ठलें वंदुनी मातापिता दोन्ही | मग तीर्थाटणीं मुहूर्त केला || ५ ||

श्री नामदेव गाथा

                                                 ॐ
                                      श्री नामदेव गाथा
श्रीज्ञानेस्वरांची आदि
[ ८७२ ]
जगत्रयजीवन अंतर्निष्ठ ज्ञान | तरी संतासीं शरण रीघिजे भावें || १ ||
हेचि भक्ति ज्ञान वैराग्याचे निधी | विवेकेंसीं बुद्धि (बुध्दी) नांदे माझी || २ ||
हे श्रवणाचे श्रवण माननाचे मनन | हेचि निजध्यासन वैरग्याचे || ३ ||
म्हणोनि बैसलों संताचे संगती | गोविंदा विश्रांति गहिनीनाथ || ४ ||
[८७३ ]
बैसोनि एकांतीं गुरुगम्य गोष्टी | वेदांत परिपाठी शास्त्र बोध || १ ||
नित्यशुध्दबुध्द निर्विकार पूर्ण | उमेसी जें ज्ञान शिव सांगे || २ ||
तेचि सच्चिदानंद साकार जीव प्राण | शरीर जाय क्षीण जयापरी || ३ ||
तेंचि हें १सर्व विठोबाचें नाम | निराईस प्रेम गहीनीनाथीं || ४ ||
१ सर्वत्र (बा.)

रवा याचा सांजा

                                                 ॐ
रवा याचा सांजा : रवा एक भांड भर घेतला .दोन कांदे विळीने चिरून घेतले.
दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या थोडी कोथीबींर चिरून घेतली.रवा पातेल्यात
पातेल्यात घेतला. गॅस पेटवून रवाचे पापेले ठेवले. रवा उलथ नाने हलवून रवा तांबूस
भाजून घेतला. दुसरे पातेले गॅस पेटलेल्या शेगडीवर ठेवले. तेल तापवून मोहरीची फोडणी
केली. फोडणी मध्ये चिरलेला कांदा हिरव्या मिरच्या घातल्या टाकल्या.कांदा तांबूस झाल्या
नंतर भांड भर पाणी घातले .पाणी उकळू दिले हळद मीठ हिंग घातले टाकले.भाजलेला रवा
उकळलेल्या पाणी ह्यात घातला टाकला.रवा कांदा मीठ हळद हिंग हिरवी मिरची लिंबू पिळले .सर्व उकळू दिले.
वाफ आणली.रवा पाणी व सर्व मसाल्यात चांगला शिजला.हळद टाकली की सांजा म्हणतात व बिन
हळदीचा याला उपमा म्हणतात. सुक खोबर किसून घेतले. सांजात कडेला घातले.सादुक साजूक तूप
सांजा त घालून वाफ आणली.डिश मध्ये सांजा घेतला .सुक खोबर घातले.अशा प्रकारे सांजा तयार केला मी !

                                              DSCF2622

श्री नामदेव नामदेव

     


 

श्री नामदेव गाथा
[४४३ ]
१ विनजापूर (पं .व शि.)
दानें तपें व्रतें बळी | तोही घातला पाताळीं |
अद्दापि राहिला जवळी | चरणतळीं पद देऊनी || ११ ||
रेणापुरीं देवी रेणुका | लाधली जमदग्नीस देखा |
तिचें उदरीं विश्वतारका | परशुराम जन्मला || १२ ||
असुरीं वधीयेली माया | म्हणे धांवे पुत्रराया |
अवचित पातला धांवया | सहत्रार्जुन मारिला || १३ ||
अयोध्या नाम नगरी | जन्म कौसल्ये उदरीं |
देवभक्तांचा कैवारी | दशरथ नंदन राघव || १४ ||
राम त्रिलोक्यीं वीर दारुण | तेणें वधियेला रावण |
अढळपद देऊन | राज्यीं बिभीषण स्थापिला || १५ ||
मथुरा नामें नगरी | वसुदेव देवकी उदरी |
कृष्ण आठवा अवतारी | लीलाविग्रहि जन्मले || १६ ||
कंस चाणूर मदिंले | विमलार्जुन उन्मळिले |
सप्त गर्भांचे सूड घेतले | रक्षियेले गाई गोपाळ || १७ ||
बौध्द श्रीवत्साच्या घरीं | जन्म शांभवीच्या उदरीं |
राजा कांतिये नगरीं | निरंतर रूपें राहिला || १८ ||
ध्यान मुद्रा मांडूनियां | वत्रें शस्त्रें त्यजुनियां |
राहिला पैं निरंजनिया | भक्तीभाव ओळखे तो || १९ ||
१ कल्कि जसरायाचा पुत्र | सावित्री देवीचा कुमर |
२ शंभलापुरीं करील अवतार | दाहीं रूपें प्रगटला || २० ||
ऐसा अमूर्त मूर्ति विटेवर | उभा राहिला निरंतर |
विष्णुदास नाम्याचा दातार | विठ्ठल पंढरीये ||२१ ||
१ कलंकी (शि .) २ सिगलपुरी (शि.) शिंगळापुरी (पं .)

श्री नामदेव गाथा

                                   ॐ
                      श्री नामदेव गाथा
               श्रीविठ्ठलस्तुती आणि भक्तवत्सलता
[ ४४३ ]
होसि भक्तांचा कोंवसा | तुझीं ब्रीदें हृषिकेशा |
निवविलें सायासा | कृपासिंधु सुरारी || १ ||
अंबऋषिकारणें | दहा वेळ गर्भवासा येणें |
अवतार धरिला नारायणें | १गजापूर नगरीं || २ ||
अंदुरायाच्या घरीं बाळ जनसेनाच्या कुमरीं |
मत्स्य रूप अवतार धरीं | वेद हरनकैवारी नारायण || ३ ||
विद्दापूर नगरीं | अंधरू राजा राज्य करी ||
श्रियादेवी त्या सुंदरी | उदरी कुमरु जन्मला || ४ ||
पृथ्वी रसातळवटीं | जातां थोर आंदोळली सृष्टी |
धांवण्या धांविन्नले जगजेठी | धरा पृष्ठीं सांवरिली || ५ ||
मर्गजपुरीं पुरपती | हिरण्याक्ष चक्रवर्ती |
अग्नि असे जनवंती | घरी बाळावराह || ६ ||
त्रिदशदेवश्रिया चाडा | हिरण्याक्ष वधिला गाढा |
भूगोल धरूनियां दाढा | केला निवाडा स्वर्गींचा || 7 ||
कर्पूरपूरपाटण | हरिभक्तीचें हें स्थान |
सदयादेवी प्रिया नंदन | उदरीं नृसिंह जन्मला || ८ ||
पित्या पुत्रा जाली कळी | स्तंभी प्रगटला तये वेळीं |
असुर मारिला करकमळीं | भक्त प्रल्हाद रक्षिला || ९ ||
कश्यपनंदनवर्धन | कोवळादशेचा वामन |
खुजट रूप धरून | महेंद्रपुरीसी आला || १० ||

श्री नामदेव गाथा

                                     श्री नामदेव गाथा
                         श्रीविठ्ठलस्तुती आणि भक्तवत्सलता
[४४१ ]
अवताराची राशी तो हा उभा विटेवरी |
शंखचक्रगदापद्मसहित करीं हरी || १ ||
देखिला देखिला देवादि देव बारावा |
समाधान जीवा पाहतां वाटे गे माये || २ ||
सगुण चतुर्भुज रुपडें तेजं पुंजाळती |
१ वंदी चरणरज नामा विनवीतसे पुढतीं २गे माये || ३ ||

वंदुनी ( पं.)

२ ‘गे माये ‘ (पं.) च्या काही प्रतीत नाही.
[ ४४२ ]
भक्ताचिया काजा अवतार धरी | कृपाळू श्रीहरि सांचीकार || १ ||
तो हा महाराज चंद्रभागे तीरी | उभा विटेवरी पांडुरंग || २ ||
३वेद नेले म्हणोनि मत्स्य जाला हरी | शंखासुराला मारी आफळोनि || ३ ||
समुद्र मंथनी मंदार बुडाला | ४कांसव तो जाला तया तळीं || ४ ||
हिरण्याक्षें धरा नेतां रसातळां | ५वराहरूपें त्याला वधियेलें || ५ ||
प्रल्हादासी पिता गांजी नानापरी | स्तंभी नरहरी प्रगटला || ६ ||
६देवाचिया काजा वामन भूतळीं बळीसी पाताळीं घातियेला || ७ ||
भूमिभार जाला क्षत्रियांचें कुळीं | केली नि:क्षत्रिय परशुरामें || ८ ||
सितेचियां ७काजा रावण मर्दिला | सूर्यवंशीं जाला रामचंद्र || ९ ||
गोकुळीं जन्मला श्रीकृष्ण आठवा | होऊनि पांडवा साहाकरी || १० ||
८भक्ताचिया काजा भौध्द अवतार | जाला दिगंबर अवनिये || ११ ||
९कलंकि अवतार होणार श्रीहरी | तेव्हां पृथ्वीवरी तृण न उरे || १२ ||
नामा म्हणे तुझे अनंत अवतार | काय मी पामर बोलूं वाचे || १३ ||१०
३ ब्रह्मयाचे वेद चोरू शंखासूर | मत्स्य अवतार तयालागीं || (आ.)
४ कूर्म रूप जाला तये वेळीं || (आ.) ५ क्रौडरुपें (गहू.पं.शि.) ६ देवकाजी जाला (आ.)
७ व्याजा (पं. व धु.) ८ व्रतभंगासाठी (आ.) ९ कल्की अवतार होणार पुढारे (धु.)
१० (धु.) प्रतीत प्रत्येक चरणाच्या शेवटी – तोची महाराज चेंद्रभागे तीरीं |
उभा विटेवरी पांडुरंग || असे धु.पद आढळते.

श्री नामदेव गाथा

                                                      ॐ
                                         श्री नामदेव गाथा
[ ७३ ]
नंदें सोडविलें तेव्हां त्या कृष्णासी | नासू दे ग यासी दहीदूध || १ ||
मजला लेकरें नाहींत गे फार विश्रांतीस थार एवढेंचि || २ ||
निवारिलें विघ्न देवें हे केवढें | पडती जरी झाडें याजवरी || ३ ||
आजपासूनि यासी बोलसी कठीण | देईन मी प्राण तुजवरी || ४ ||
स्फुंद स्फुंद रडे तेव्हां नारायण | देई त्यासी स्तन भूकेलासे || ५ ||
येश्वदा बाहातसे न ये वनमाळी | धांवोनि कुरवाळी वदन त्याचें || ६ ||
सामाजावोनि देवा पाजितसे स्तन | घालीत भोजन नामा म्हणे || ७ ||
अभंग ७३ – (धु.)
                                                                                                       . . .

                                श्री नामदेव गाथा

श्री नामदेव गाथा

                                        ॐ
                             श्री नामदेव गाथा
[ ७१ ]
दामोदरा केशवा वामना देवा कृष्णा | परंज्योति नारायणा तुज नमो || १ ||
विश्वव्यापका जनार्दना वासुदेवा निर्गुणा | अव्यया जगजीवना तुज नमो || २ |||
अनंत अवतार घेसी भक्तांसाठीं | कृपाळु जगजेठी तुज नमो || ३ ||
यज्ञेशा सर्वेंशा दयानिधी हृषीकेशा | पुराणपुरुषा तुज नमो || ४ ||
धन्य हा दिवस देखिले तुझे पाय | कृपादृष्टी पाहे आम्हाकडे || ५ ||
जोडोनियां हात करिती विनंति | देई तुझी भक्ति जन्मोजन्मी || ६ ||
करूनि नमस्कार हळूहळू चालती | वेळोवेळां पाहती कृष्णाकडे || ७ ||
मोडताचि वृक्ष धांवोनियां येती | मग पाहताती नामा म्हणे || ८ ||
[ ७२ ]
समस्तां सांगती लहानाली मुलें | नवल देखिलें आम्हीं आतां || १ ||
वृक्ष मुळीहुनी दोघे नाघाताती | पायासी लागती कान्होबाच्या || २ ||
यशोदेचे मनी जालासे विवेक | वैकुंठनायक येथें आला || ३ ||
नामा म्हणे तिसी घालितसे माया | अपराध तयां काय असे || ४ ||

                         श्री नामदेव गाथा

श्री नामदेव गाथा

                   ॐ
          श्री नामदेव गाथा
[ ६९ ]

कृपा उपजली | उभा राहे वनमाळी || १ ||
धरुनि आणिला | आजी बांधीन मी तुला || २ ||
दावें सोडुनियां | बांधितसे देवराया || ३ ||
फार करितोसी खोड्या | गोपी दाविती १वाकुड्या || ४ ||
दावीं अनंत लावीत | दोन बोटे उणें येत || ५ ||
करिताती चोज | परि नव्हेचि उमज || ६ |||
श्रमतसे वारंवार | पुढती करी जगदोध्दार || ७ ||
विष्णुदास नामा पुढें २आतां उध्दारिले झाडें || ८ ||
१ वांकुल्या ( आ.) वाकुडि (धु.) २ आला जेथें उभी झाडें | (आ.) 
                    ॐ
         श्री नामदेव गाथा
[ ७० ]
कुबेराचे पुत्र मदोन्मत्त जाले | म्हणूनि शापिले नारदानें || १ ||
वहाल तुम्हीं वृक्ष ऐकोनी सावध | जाला अपराध ऋषिराया || २ ||
विमलार्जुन वृक्ष वहाल गोकुळांत | उश्शाप वदत कृपाळुवा || ३ ||
कृष्णाचा चरण लागेल तुम्हांसी | आपुल्या स्थळासी याल वेगीं || ४ ||
मोडितसे तेव्हां वृक्ष लक्ष्मीचा पती | दोघे निघताती दिव्य पुरुष || ५ ||
नामा म्हणे म्हणे तेव्हां दिव्य करिताती स्तुती | पापें दग्ध होती ऐकतांची || ६ ||

              श्री नामदेव गाथा

पेरुच रायत

                                            ॐ
                                         पेरु

पेरुच रायत :पेरु दहा रुपयाला चार ४ पेरु आणले.पेरु धुतले .

पेरु दाताने पण खातात.दोन हातात दाबुन फोडतात. चिरून पण पेरू

खातात.पेरूचं रायत कोशीबींर पण करतात.मी पेरू प्रथम दगडी खलबत्ता त

बारीक ठेचून घेतले.बी साल सगट पेरू ठेचले बारीक केले.दोन हिरव्या मिरच्या ठेचल्या

दगडी खलबत्ता तच हिरव्या मिरच्या ठेचून बारीक करून घेतल्या.एका काचेच्या बाऊल मध्ये

पेरूच्या सालासगट व बिया सगट ठेचलेले पेरू हिरवी मिरची ठेचलेली काचेच्या बाऊल मध्ये घातले .

ठेचलेल्या पेरू मिरचीत चवी प्रमाणे मीठ हिंग घातले. दुधाची साय व दही घातले. ठेचलेला पेरू ठेचलेली हिरवी मिरची

मीठ हिंग दही दुधाची साय सर्व एकत्र केले पेरू चे रायत किंवा कोशींबीर केली.दगडी खलबत्ता घरी असल्यामुळे दगडी खलबत्ता

त करण्यास चांगल वाटतं ! मिस्कर मधून पण असे करता येते.

                                       DSCF2615

                  DSCF2618

श्री नामदेव गाथा

                           ॐ
                श्री नामदेव गाथा
[ ६७ ]
मुलें सांगताती | माती खातो गे श्रीपती || १ ||
लांकुड घेऊनी हातांत | माती खात असे पुसत || २ ||
भावा भूलालासे खरा | कांपतसे थरथरा || ३ ||
मुख तिये उघडोनि | दावी तेव्हां चक्रपाणि || ४ ||
ब्रह्मांडें देखिलीं | नामा म्हणे वेडी जाली || ५ ||
[६८ ]
यशोदा घुसळीत | स्तन मागे भगवंत || १ ||
घालोनी पदर | पाजीतसे जगदीश्वर || २ ||
दूध जातसे उतोन | उठे कृष्णासी टाकून || ३ ||
मंथनपात्रातें फोडीत | पळे तेथूनि त्वरित || ४ ||
२मागें धावली यशोदा | धरावया त्या गोविंदा || ५ ||
हाती न लगे जगजेठी | नामा म्हणे होय कष्टी || ६ ||
२ धाव घालित (पं.)

                       श्री नामदेव गाथा

श्री नामदेव गाथा

                              ॐ
                  श्री नामदेव गाथा
[ ६५ ]
गाऱ्हाणें सांगाया | आल्या गोकुळाच्या स्त्रिया || १ ||
यशोदा ऐकत | पळे बाहेरी भगवंत || २ ||
एक म्हणे लोणी | माझें भक्षी चक्रपाणि || ३ ||
फोडितसे भांडें | १वर्जिलिया म्हणे रांडे || ४ ||
गाई वासरें सोडितो | येऊन आम्हांसी सांगतो || ५ ||
अष्टदळ काढिलें अंगणीं | वरी मुते चक्रपाणि || ६ ||
घेऊनियां आला अग्न | तुझ्या घरासी लावीन || ७ ||
देईन मी तोंडावर | तुझ्या बापाचे हें घर || ८ ||
घेतसे वरखडे | शिव्या देऊनियां रडे || ९ ||
देखोनिया गरोदर | म्हणे केवढें उदर ||१० ||
सांगती गाऱ्हाणीं | नामा म्हणे ऐका कानीं || ११ ||
१ विर्जिलिया (आ.) २ येकीस म्हणे गरोदर | पाडु तुझा हा डोंगर || (पं. व धु.)
[ ६६ ]
एक म्हणे धरी स्तन | त्याचे उपटीन कान ||१ ||
यशोदे तुला येईल राग | आपुल्या पोरा कांहीं सांग || २ ||
अंधारी लपत | पोरें करिती आकांत || ३ ||
सांगतसे शिकवणा | खोडी नको करू कान्हा || ४ ||
तोंड करूनि वांकडें | मला म्हणे तशीच रडे || ५ ||
पोरा शिकवीत | गोरस आणारे समस्त || ६ ||
१आम्हीं निजलों समस्त | काजळ मुखासी लावीत || ७ ||
मेले आणूनिया सर्प | माझ्या पोरा दावी दर्प || ८ ||
योगियांचे न लक्षा | त्यासी लावू म्हणती शिक्षा || ९ ||
अनंत गाऱ्हाणीं | नामा म्हणे किति वानीं || १० ||
१ काजळ मुखासी लावित | चिमटें घोवोनि उठवित || (पं.)

श्री नामदेव गाथा

                                                      ॐ
                                            श्री नामदेव गाथा
[ ६३ ]
मुतुनियां हातें भूमी सारविती | पोटासी पुसती दोघेजण || १ ||
घेऊनियां काष्ट घाशिताती दांत | वाकुल्या दावीत नंदालागीं || २ ||
जेवितां जेवितां बाहेर पळती | श्वानासी बाहाती युयु करुनी || ३ ||
तयापुढें दोघे ठेवूनियां वाटी | घालिताती मिठी गळां त्याच्या || ४ ||
देखोनियां जन खदखदां हांसती | यशोदे सांगती कवतुक || ५ ||
भीती धरूनियां उभे राहताती | आधार जगतीं ज्यांच्या असे || ६ ||
उभयता जाती बिदी खेळावया | कुरवंडी काया नामयाची || ७ ||


श्री नामदेव गाथा
[ ६४ ]
मिळवुनी सौंगडे सांगती तयासी | चला गोरसासी देतों तुम्हां || १ ||
गेली असे एक गौळण जळाला | सांगे गोपाळाला तेथें जाऊं || २ ||
न पुरेचि हात दूध शिंक्यावरी | करावें मुरारी कैसें तेथें || ३ ||
पाटावरी पाट रची वनमाळी | पाडीतसे डुळी मोहोरीनें || ४ ||
बडवोनी टिरी नाचतसे पेंदा | भली ले गोविंदा युक्ती केली || ५ ||
उगला ले बेते कलुं नका गलबला | थांबाला ले गोला लोनियाचा || ६ ||
कोणी पिती दूध कोणी खाती दही | आली लवलाही गौळण ते || ७ ||
अहर्निशी धरुं मी जपतसें तुज | जासी कैसा आज चोरटिया || ८ ||
मुखीहुनि पय टाकी तिच्या डोळा | नामा म्हणे पळा सांगतसे || ९ ||

श्री नामदेव गाथा

                                                    ॐ

                                              श्री नामदेव गाथा

                                                   कुंडली

                                                      .

श्री संत नामदेव महाराज

जन्म शके ११९२ , प्रमोदनाम संवत्सरे,कार्तिक शुध्द ११ , घ ३२ , प १४,

सुर्यास्तानंतर उत्तराभाद्रपदा , चरण तृतीया , ता. 26 OCT 1270

(JULEAN YEAR ) रोहिणीतारा उदित (UDITA )

                         DSCF2613

श्री नामदेव गाथा

                                  ॐ
                     श्री नामदेव गाथा
[ ६१ ]
परीक्षिती राया सांगतसे शुक | वैकुंठनायक रांगतसे || १ ||
दुडदुडा पळती मुखीं घाली माती | शेणांत लोळती दोघेजण || २ ||
नंदाच्या पुढील ओढीताती ताट | मिटक्या मटमट वाजविती || ३ ||
कटी कडदोरा वांकी घुंघुरूंवाळा | पिंपळपान भाळा शोभतसे || ४ ||
देवातें झोंकिती वर्जिल्या रडती | घडोघडी येती बिदिमाजीं || ५ ||
वत्साचिये पुच्छे बळें ओढीताती | खोडी न सोडिती दोघेजण || ६ ||
विमानांची दाटी येताती सुरवर | नाम्याचा दातार पाहावया || ७ ||
[ ६२ ]
मृगचिये श्रुंगे SHRUMGE धरोनि धरोनि नाचती | जन हासताती खादाखदां || १ ||
भोजना बैसती घांस घेती हातीं | मांजरें देखती दुरोनिया || २ ||
गळां त्यांच्या तेव्हां धरी मेघ:श्याम | पुच्छ बळिराम ओढीतसे || ३ ||
यशोदा धांवत खदखदां हांसत | गौळणी समस्त पाहताती || ४ ||
पुसतांची मामा चोंगई दाविती | मर्कटाचे धरिती दोन्ही कान || ५ ||
रोहिणी म्हणे डसतील बाळा | किती म्यां याजला सांभांळावें || ६ ||
पाणी उडविती प्रतिबिंब पाहाती | गोरस सांडिती भूमीवरी || ७ ||
नामा म्हणे स्वामी सर्वांचा जो साक्षी | धरितसे पक्षी चुकवुनी || ८ ||

                             श्री नामदेव गाथा

श्री नामदेव गाथा

                                          ॐ
                               श्री नामदेव गाथा
[ ५९ ]
तुझिया पुत्रासी लागलेसे मूळ | करील निर्मूळ सर्वत्रांचें || १ ||
बाळकाचे अंगीं अवचिन्हें बहुत | नेऊनीं गर्तेंत टाका यासी || २ ||
लोभ धरूनियां ठेवाल बाळकासी | ग्रासील सर्वांसी एकदांची || ३ ||
ऐकोनी यशोदा गहिंवरोनी बोले | गर्गानीं कथियेलें उत्तम गुण || ४ ||
अमंगळ वाणी पुनरपि बोलिला | गर्ग तो चुकला गणितासी || ५ ||
स्तनपान करीत असतां श्रीकृष्ण | मांडिलें विंदान नामा म्हणे || ६ ||
[ ६० ]
ठाईहुनि जातीं उखळें उडताती | मस्तकीं आदळती येवोनियां || १ ||
पाटे वरवंटे वासुपार्त्रालागीं | जीव त्या प्रसंगीं येता जाला || २ ||
घाबरे दुर्जन पळाया पाहत | आडव्या ठाकत बाजा पुढें || ३ ||
जानवें तुटलें पंचांग फाटलें | धोतरही गळालें ढुंगणाचें || ४ ||
पाठीवरी होती बदाबदा मार | तेथुन सत्वर पळता जाला || ५ ||
आयुष्याची कांहीं बाकी उरली होती | म्हणुनी श्रीपती सोडी त्यातें || ६ ||
नामा म्हणे जीव घेऊनि पळाला | मथुरेसी आला कंसापासीं || ७ ||

                            श्री नामदेव गाथा

श्री नामदेव गाथा

                                ॐ
                      श्री नामदेव गाथा
[५७ ]
श्रीकृष्ण जन्मला वार्ता ऐकोनी | चिंता कंसा मनीं प्रवर्तली || १ ||
उव्दिग्न मानसीं कंस तो बैसला | सन्मुख देखिला महाबळ || २ ||
गौरवोनी त्यासी सांगे वर्तमान | शत्रूसीं जाऊनि कोण मारी || ३ ||
महाबळ दैत्य प्रतिज्ञा बोलत | शत्रूसी त्वरित मारीन मी || ४ ||
नामा म्हणे ऐसा बोलूनि निघाला | वेष धरियेला कपाटाचा || ५ ||
[ ५८ ]
विप्रा वेष तेव्हां घेऊनि निघाला | गोकुकासी आला लागवेगें || १ ||
पुत्रोत्सव कोठें लोकांस पुसत | भाविक सांगत नंदाघरीं || २ ||
ऐकोनियां ऐसें आला अकस्मात | यशोदा देखत सन्मुख त्या || ३ ||
श्रीकृष्णासी तेव्हां वोसंगीं घेतलें | दंडवत केले ब्राह्मणासी || ४ ||
सन्मुख बैसोनि वर्तमान पुसे | बाळाचें यां कैसें चिन्ह सांगा || ५ ||
पंचांग त्या वेळीं काढिलें कपाटानें | मान तुकोवानी पाहातसे || ६ ||
नामा म्हणे मैंदें पंचांग पाहून | यशोदे लागून बोलतसे || ७ ||

                    श्री नामदेव गाथा

श्री नामदेव गाथा

                             ॐ
                श्री नामदेव गाथा
[ ५५ ]
आला गोकुळासी | हर्ष न माये मानसीं || १ ||
नंदे गर्गातें देखिलें | १पूजा स्तवनी तोषविलें || २ ||
भूतभविष्य वर्तमान | तुम्हां कळे हो संपूर्ण || ३ ||
पाहा सामुद्रिक लक्षण | याचें काय सांगा चिन्ह || ४ ||
बोले तेव्हां गर्गऋषी | झणीं कळेल कंसासी || ५ ||
रोहिणीनंदादि बैसती | गर्ग घेउनी एकातीं || ६ ||
घालुनियां मंगलस्नान | आरंभी पुण्याहवाचन || ७ ||
ऐसी वदे शुकवाणी | नामा म्हणे ऐका कानीं || ८ ||
[ ५६ ]
जन्मजन्मांतरीं जाला तुज श्रम | म्हणोनियां ब्रह्म आलें येथें || १ ||
राखातील गाई मारतील दुष्ट | न करी बोभाट जनामध्यें || २ ||
व्दादश गांव अग्नि करील प्राशन | वांचवील प्राण सकळांचे || ३ ||
चोरूनियां गाई नेईल सौंगडे | लावील हा वेद ब्रह्मयासी || ४ ||
उचलील पर्वत हरील हा गर्व | तारील हा सर्व नाममात्रें || ५ ||
समुद्रीं हा नगरी रचील क्षणांत | चरित्र अद् भुत करील हा || ६ ||
सोळा सहत्र स्त्रिया अष्ट त्या नायका | करील बाईका तुझा कृष्ण || ७ ||
३त्रीलोक्यांत हाची उदाराचा राणा | देईल ब्राह्मणा हेमपुरी || ८ ||
सांगुनिया ऐसें आशीर्वाद देऊनि | नामा म्हणे मुनि जाता जाला || ९ ||

३ त्रैलोक्यांतरे उदाराचा राजा | (धु.)

कार्ले याची भाजी

कारले कार्ले याची भाजी : दहा रुपये याची दोन २ कारली कार्ली आणली. कारलेकार्ली धुवून घेतली.विळीने गोल गोल बिया सगट कापली.चिरली.फोडी काप कार्ले भाजीचे केले.कारले कार्ले काप ला मीठ लावून अर्धा तास ठेवले. गॅस पेटवून पातेले ठेवले.तेल व मोहरी ची फोडणी केली.मीठ लावलेले कारले  कारले कार्ले व मीठ ह्यातील पाणी न पिळता फोडणीत टाकले.कारलेकार्ले शिजण्याकरता  पाणी भांड भर टाकले.कारले कार्ले लावलेले मीठ पाणी शिजवू दिले.त्या शिजलेल्या कार्ल्यात
लाल तिखट हळद टाकली परत मीठ टाकले नाही.कारले कार्ले याला लावलेले मीठ बरोबर  आहे.होते.ते पुरले. पुरते.अशा प्रकारे मिठाचे कार्ले चे पाणी न पिळता पाण्यात शिजवून हळद  लाल तिखट घालून कार्ले कारले चिंच गूळ न घालता कार्ले कारले याची भाजी चांगली लागते.  कार्ले कारले जरूर महिना तून एकदा खावेतं.परतून पण कार्ले याची भाजी करता येते चावण्यास  त्रास होतो म्हणून थोडी शिजवून खावी.

 

श्री नामदेव गाथा

                                          ॐ

                              श्री नामदेव गाथा

[ ५३ ]

मांडीवरी घेत यशोदा सुंदरी | आळवी श्रीहरी नाना युक्ती || १||

तूंची माझा प्राण तूं माझी माउली | तूं माझी बहिणुली कान्हाबाई || २ ||

गणगोत भाऊ तूंची माझा सखा | संसार लटिक तुजवीण || ३ ||

तूंचि माझें धन तूंचि माझें जीवन | चुंबीत वदन वेळोवेळा || ४ ||

नामा म्हणे भार घाली मांडीवरी | ठेवी भूमीवरी कृष्णजीला || ५ ||

[ ५४ ]

कंसें पाठविला आला तृणावर्त | धुळीने समस्त व्यापियेलें || १||

दुष्टबुध्दी तेव्हां उचली देवासी | धरियेलें त्यासी कंठीं देवें || २ ||

यशोदा पाहात न दिसे श्रीकृष्ण | ऊर बडवूनी शोक करी || ३ ||

गौळणींचा मेळा मिळाला समस्त | कोणी कृष्णनाथ नेला सये || ४ ||

न लगे घरदार बुडाला संसार | दावा गे श्रीधर तान्हें माझे || ५ ||

ठावें असतें ऐसें बांधित्यें पोटासी | कोठें गुंतलासी बाळा माझ्या || ६ ||

धांवा गे धांवण्या पाहा गे लेंकरूं | शोक अनिवार करीतसे || ७ ||

शिणल्या भागल्या येतों तुम्हां घरां | मुख हें उदारा दावी कृष्णा || ८ ||

सोडू पाहे प्राण यशोदा सुंदरी | हंबरडा फोडी कृष्णालागीं || ९ ||

चेपोनी नरडी गतप्राण केला | भूमीसी पाडिला दैत्य तेव्हां || १० ||

नामा म्हणे वरी खेळत गोविंद | पाहोनी आनंद सकळांचा || ११ ||

श्री नामदेव गाथा

श्री नामदेव गाथा
[ ५१ ]
पुण्यवंता दावी बाळलीला देव | पालथा केशव पडे तेव्हां || १ ||
नंदे उत्साहासी केलें तेव्हां पार | दिधलें अपार द्रव्य व्दिजां || २ ||
यशोदा घेतसे देवाचें चुंबन | तुजला न्हाणीन तान्हया माझ्या || ३ ||
चौंगईचा मुका घेताती गौळणी | हांसे चक्रपाणि आनंदानें || ४ ||
नामयाचा स्वामी मंदमंद हांसे | यशोदा करितसे निंबलोण || ५ ||
[ ५२ ]
करावया वनभोजन | जाती गोकुळींचे जन || १ ||
कोणी भोजन करिती | कोणी देवा खेळविती || २ ||
डोळे झांकीती श्रीपती | दावी निद्रेची आकृती || ३ ||
बहुत खेळलासे खेळा | आतां निजवा गे बाळा || ४ ||
वस्त्रें घालूनी शकटातळीं | निजविती वनमाळी || ५ ||
क्षण एक निजला देव | रडे उठे वासुदेव || ६ ||
मुलांलागीं म्हणें तेव्हां | माझा कान्होबा खेळवा || ७ ||
रागेंरागें झाडी लात | गाडा मोडोनी पडत || ८ ||
नामा म्हणे वाटी धन | नंद वांचला नंदन || ९ ||

DSCF2588

श्री नामदेव गाथा

                                                         ॐ
                                            श्री नामदेव गाथा
[ ४९ ]
कंसें पाठविली मायाची पुतना | देवोनियां स्तना बाळे मारी || १ ||
दीन दुर्बळांची मारीत बालकें | करिताती शोक मायबाप || २ ||
गहिवरोनि तेव्हां पुसे परीक्षिती | भगवंताची मूर्ती बाळरूप || ३ ||
अभय देतसे बापा नको रडूं | ते काय घुंगुर्डु मारुं शके || ४ ||
जेथें पुराणें कीर्तन होत नामघोष | तेथें यम त्रास घेत असे || ५ ||
पळती तेथुनि असुरादिक वैरी | तेथें नाहीं उरीं पाप तापा || ६ ||
नामा म्हणे आली नंदाचिये घरीं |स्वरूपें देवांगना || ७ ||
[ ५० ]
कृष्णा लावितेसे स्तनीं | तिसी मारी चक्रपाणि || १ ||
भयाभीत प्रेत | जन विस्मय करीत || २ ||
रडे तेव्हां माया | वांचलासी बा तान्ह्या || ३ ||
१मिळोनियां समस्त | भाळीं आंगारा लावीत || ४ ||
वसुदेवें सांगीतलें | नंद म्हणे तैसें जालें || ५ ||
कुऱ्हाडी आणिती | शास्त्रें करूनि तोडिती || ६ ||
नामा म्हणे दिला अग्नी | वास न मायें गगनीं || ७ ||
१ सकळ वेल्हाळि ( धु.)

श्री नामदेव गाथा

                                   ॐ
                       श्री नामदेव गाथा
[ ४७ ]
पाटावरी बैसविती | गोपी अक्षवाणें करिती || १ ||
ब्रह्मादिक न देखती माथा | त्यासी लाविती अक्षता || २ ||
नव्हे प्राकृत बालक | परस्परें म्हणती लोक || ३ ||
ध्वज वज्रांकुश चिन्हां | आला वैकुठीचा राणा || ४ ||
लोक येती वेळोवेळां नामा म्हणे पाहती डोळा || ५ ||
[ ४८ ]
द्रव्य द्दावयासी | नद गेला मथुरेसी || १ ||
तेथें भेटे वासुदेव | सांगितलें गुह्य सर्व || २ ||
कंसाचे मानसीं | घात इच्छी गोकुळासी || ३ ||२
जाई जाईरे त्वरित | गोकुळी आघात || ४ ||
नामा म्हणे ऐसें सांगें | नंद तेथुनियां निचे || ५ ||
२ हा चरण काही प्रतींत सापडत नाही (धु.)

              DSCF2559

श्री नामदेव गाथा

                                        ॐ
                              श्री नामदेव गाथा
[ ४५ ]
तुतारे भोवारें वाजंत्री वाजती | अप्सरा नाचती ४ थैथै कारें || १ ||
झणझणा झणझणा झांजा गर्जताती | ५ नौबता वाजती धो धो धो धो || २ ||
सुरवर येती विमानांची दाटी | करिती पुष्पवृष्टी देवावरी || ३ ||
नारद तुंबर गंधर्व किन्नर | गाती १सर्व सप्त स्वरीं तेव्हां || ४ ||
कीर्तनाचा घोष टाळांचा गजर | मृदंग वीणे सुस्वर वाजताती || ५ ||
केशरी गंध टिळा लावितसे भाळा | घाली पुष्पमाळा व्दिजाकंठी || ६ ||
घरोघरी नंद धाडी शर्करेसी | वस्त्रें सुहृदांसी नामा म्हणे || ७ ||
[ ४६ ]
ब्राह्मण आशिर्वाद देती | नंद पुसोनि निघती || १ ||
चलाचला म्हणती लोक |पाहूं नंदाचें बालक || २ ||
नरनारी अलंकार | शृंगारिलें हो नगर || ३ ||
दैन्य दारिद्र अपेश | पळती मानुनियां त्रास || ४ ||
आणिताती बाललेण | स्त्रिया पाहताती कृष्ण || ५ ||
नामा म्हणे पाहतां मुख | हारपली तहान भूक || ६ ||
१ वयोमिं (धु.) VYOMIA

                             DSCF2559

कोकमं

                                             ॐ
कोकमं : कोकमं हे फळ आहे. ते वाळविले की अमसूल बनतात.
ओले कोकम मी १५ रुपये पावकिलो आणले. कोकम याचे हातानेच
कापून तुकडे करतांना त्यातील बी बिया काढून टाकल्या.कोकम याचे
केलेले हाताने कालेले तुकडे बरणीत घातले.त्यात पाव किलो साखर घातली.
आठ दिवस साखर व हाताने केलेले कोकम चे तुकडे भिजवू दिले.साखर व
कोकम छान भिजले. कोकम व साखर याला पाणी सुटले.आले.ते कोकम व
साखर याचे पाणी ग्लास मध्ये चमचा भर घेतले.त्यात चव येण्या करता कोकम
व साखर याच्या रसात मीठ घातले.पाऊण ग्लास गार पाणी कोकम साखर रसात
मीठ ह्यात ग्लास मध्ये घातले.मस्त कोकम सरबत तयार झाले केले मी.अजून
काहेच्या बरणीत कोकम साखर याचा रस आहे.केव्हां ही कोकम सरबत करता
येते.कोकम साखर याचा रस पाणी भरपूर दिवस राहते टिकते.

                   DSCF2569

               DSCF2571

                        DSCF2575

श्री नामदेव गाथा

                                    ॐ
                           श्री नामदेव गाथा
[ ४३ ]
नंदें करुनिया स्नान | वस्त्रें घेतलीं नूतन || १ ||
पाचारा ब्राह्मण | शृंगारावें देवसदन || २ ||
बाहा बाहा दशग्रांथी | त्यासी सांगो आणा पोथी || ३ ||
त्वरें बाहारे ज्योतिषी | नंद करी जातकासी || ४ ||
केलें देवतार्चन | व्दिज सांगाती तर्पण || ५ ||
फार त्याला सुख | पाहे कृष्णजीचें मुख || ६ ||
करी पुण्याहवाचनें | नामा म्हणे आनदांनें || ६ ||
[ ४४ ]
आला जगदोध्दार | त्याचे भरलें भाडांर || १ ||
सुशोभित दिसे मही | दोन लक्ष दिधल्या गायी || २ ||
तिळ तांदूळ पर्वत | द्रव्यें वांटी अगणित || ३ ||
एक जाती एक येती | ओझें उचलितां कुंथती || ४ ||
भाट वर्णिताती | नामा म्हणे ज्याची किर्ति || ५ ||

                    DSCF2559

हरबराडाळीचेसांडगे याची आमटी

                                             ॐ
                    हरबरा डाळीचे सांडगे याची आमटी
हरबरा डाळीचे सांडगे अंदाजाने घेतले.छोटे दोन कांदे बारीक
विळीवर चिरून घेतले.थोडा शेंगदाने कुट घेतला. हरबरा डाळीच्या
सांडगे तिखट मीठ असल्यामुळे थोडे घेतले देठा सगट लाल मिरच्या
घेतल्या.हळद हिंग घेतले.गॅस पेटवून पातेले ठेवले.तेल मोहरीची फोडणी केली.
प्रथम फोडणीत लाल मिरच्या टाकल्या. चिरलेला कांदा परतून घेतला हरबरा डाळीचे सांडगे परतून घेतले.
भांड भर पाणी कांदा व हरबरा डाळीच्या सांडगे ह्यात घातले झाकण ठेवून छान
बरपूर हरबरा डाळीचे सांडगे व चिरलेला कांदा शिजवू दिला. शिजल्यात शेंगदाने कुट
घातला थोड मीठ लाल तिखट हिंग हळद टाकली.सर्व भरपूर शिजविले.
हरबरा डाळीचे सांडगे चांगले शिजले.मस्त लाल देठा सगट मिरची चिरलेला कांदा हरबरा डाळीचे सांडगे
शेंगदाने कुट मीठ लाल तिखट सर्व याची हरबरा डाळीची आमटी तयार झाली.केली. मी.

                               DSCF2597

                                   DSCF2599

श्री नामदेव गाथा

                                     ॐ
                           श्री नामदेव गाथा
[ ४१ ]
शुक म्हणे राया ऐक परीक्षिती | श्रवण कंरितां तृप्ति नाहीं तुज || १ ||
माया जातां मथुरे होती ते निद्रिस्त | देखिला भगवंत यशोदेनें || २ ||
ब्रह्माडें उदरीं न कळे कोणाला | वाजविती थाळा जन्मकाळीं || ३ ||
यज्ञभोक्ता कृष्ण त्यासी देती बोळा |ध्यानीं ध्याय भोळा सदाशिव || ४ ||
गौळणी बाहाती नंदालागीं तेव्हां | पुत्र पाहा नामा म्हणे || ५ ||
[ ४२ ]
विश्वाचा जो बाप हातीं ज्याच्या सूत्र | म्हणवितो पुत्र नंदजीचा || १ ||
तीथें ज्याच्या चरणीं करिताती न्हाणी | यशोदा जननी म्हणताती || २ ||१
वेडावला शेष शिणले वेद चारी | निजे मांडीवरी यशोदेच्या || ३ ||
शरणागता देत क्षीरसिंधु २जाण | ३चोखीतसे स्तन आवडीनें || ४ ||
त्रेलोक्याचा राजा वर्णूं काय रंक | ऐकावें जातक नामा म्हणे || ५ ||
१ हा चरण काही ठिकाणी प्रतींत सापडत नाही.(धु.) २ दाणा (धु.)

                               DSCF2559

श्री नामदेव गाथा

                                        ॐ
                            श्री नामदेव गाथा
[ ३९ ]
तांतडीनें जाती | कंसा सेवक सांगती || १ ||
उपजला वैरी | त्यासी तूं रे त्वरें मारी || २ ||
त्वरें धांव घाली | पाहे कन्या उपजली || ३ ||
ज्याच्या धाक तुज | कन्या द्दावी मज || ४ ||
मारायाशीं खड्ग घाली | हातींची निसटूनियां गेली || ५ ||
तुजलागीं जो का वधी | उपजला मज आधीं || ६ ||
सांगे ब्रह्मज्ञान | देवकीचें समाधान || ७ ||
नामा म्हणे तयेवेळीं | त्यांची बंधने काढिलीं || ८ ||
[ ४० ]
बोलावुनी अवघीयातें | कंस पाहे विचारातें || १ ||
कोणी एक रे बोलति | आम्हां ठावी देववस्ती || २ ||
जेथें पुराण कीर्तन | गाईब्राह्मण करिती यज्ञ || ३ ||
तेथें असे नारायण | बधूं तयासी जाऊन || ४ ||
वैरी सहजची मरेल | ऐसे बोलताती बोल || ५ ||
कंसा मानवलें जाणं | करा मजसाठी यत्न || ६ ||
नामयाचा छंद | नंद करितो आनंद || ७ ||

                 DSCF2559

वरणातील फळ

वरणातील फळ

वरणातील फळ : प्रथम तुरीची डाळ एक वाटी भांड्यात घेतली धुतली. कुकर मध्ये पाणी घातले. भांड्यात तुरीच्या डाळीत पाणी व हळद घालून गॅस पेटवून कुकर गॅस वर ठेवला चार ४ पाच ५ शिट्या दिल्या. कुकर गार होई पर्यंत कणिक घेतली त्यात तेल मीठ घालून पाण्यात कणिक तींबवली. भिजविली तो पर्यंत कुकर गार झाला. कुकर मधील तुरुची डाळ शिजली.

दुसरे पातेले पेटत्या गॅस वर ठेवले. तेल मोहरी ची फोडणी केली फोडणीत शिजलेली तुरुची डाळ घातली. तिखट मीठ हिंग चिंच घातली. आमटी वरण उकळू दिले.तो पर्यंत कणिक याचे थोडे थोडे गोळे घेतले व त्यांना द्रोणाचा आकार दिला कडा पातळ केल्या व मध्ये जाड सर ठेवून कणिक याचे फळ केली.कणिक याचे फळ उकळलेल्या तुरीच्या डाळी वरणात आमटीत घातले परत वरण कणिक फळ उकळू दिले.

मस्त वरणात कणिक याचे फळ शिजली. खाण्या करता बाऊल मध्ये काढली.

थोड सादुक तूप वाढले घातले. मस्त वरणातील फळ तयार झाली केली मी.

आता मॅगी सर्रास करतात.पण वरणातील फळ जुनी पध्दत आहे.

श्री नामदेव गाथा

                             ॐ
                   श्री नामदेव गाथा
[ ३७ ]
२उचलिला कमळापती | पायींचीं ३ बंधनें गळती || १ ||
त्रैलोक्यांत जो न माय | त्यासी बंधन करील काय ? || २ ||
कवाडे उघडती | देखतांची देवाप्रती || ३ ||
मंद मंद पडे पाऊल | शिरी छाया करी शेष || ४ ||
पूर चढला अवचट | त्यासी लाविला अंगुष्ठ || ५ ||
त्वरें आला नंदाघरी | निद्रिस्त त्या नरनारी || ६ ||
ठेवी तेंथे क्रुष्णजीला | माया घेउनी निघाला || ७ ||
रडे माया करी आकांत | नामा म्हणे उठती दूत || ८ ||
[ ३८ ]
पूर्णब्रह्म मानी कंसाच्या भयासी | वाटेल मानसीं कोणाचिया || १ ||
इच्छामात्रे करी सृष्टीचा प्रलय | त्यासी असे भय कवणाचें || २ ||
नंदाचें सुकृत जालें अगणित | म्हणोनी भगवंत आला तेथें || ३ ||
सर्वां होय सुख तरतील लोक | नामा म्हणे शिक सांगतसे || ४ ||
२ उचालिता (पं. ) ३ पैजणें ( पं. )

श्री नामदेव गाथा

                                         ॐ
                               श्री नामदेव गाथा
[ ३४ ]
अयुत गाई ब्राम्हणासी | सोडी संकल्प मानसीं ||
ओळखिलें तुज आतां कळलासी मज || २ ||
धर्म स्थापावया | येथें येसी देवराया || ३ ||
आलिंगिंतां दोहीं बाहीं | नामा म्हणे डोई पायीं || ४ ||
सोडी सोडी मिठी | लपवा36 लपवा जगजेठी || १||
झणीं कंसासी कळेल | माझ्या बाळासी मारील || २ ||
१वासुदेव चिंता मनीं | तेज न माये गगनीं || ३ ||
नामा म्हणे आलें हांसें | देव तेव्हां सांगतसे || ४ ||
[ ३६ ]
नंदाच्या घराला | मज नेई गोकुळाला || १ ||
माया उपजली तेथें | ठेवी मज आणी येथें || २ ||
म्हणसी असे रक्षपाळ | ते म्यां मोहिले सकळ || ३ ||
आच्छादित रूप | नामा म्हणे माझा बाप || ४ ||

ब्लॉग पोस्ट ६०२ वां

ब्लॉग पोस्ट ६०२ वां

ब्लॉग पोस्ट ६०२ वां : २१ मे (५ ) २०१२ ला माझा ब्लॉग पोस्ट ६०२ वां होत आहे. मला खूप चांगल मस्त वाटत आहे. मी अभयारण्य ,धबधबे, वाळवंट पाककृती तसेच श्री नामदेव गाथा लिहिण्यास सुरुवात केली आहे.

श्री नामदेव गाथा खूप मोठी आहे. किती ही लिहिले तरी ते न संपणार आहे. तरीपण मी जी श्रीनामदेव गाथा लिहिते ती वाचून लिहिते. त्यामुळे मला त्यातील अर्थ समजतो. मनाला प्रसन्न व मन भरून येतं येते.मी लिहिलेली

श्री नामदेव गाथा गुजराथ मध्ये पण वाचतात.

ब्लॉग पोस्ट ६०२ वां आहेचे ! आहेचं! तसेच ब्लॉग भेटी ५०,२०३ आता पर्यंत ८.५२ ए. म. A . M . तसेच फुली दर्जा LIKE . च्या भेटी पण खूप आहेत.मी सर्व प्रकारचे लिखान करत आहे.आपण सार्वजन वाचन करून भेटी देतात. तसेच प्रतिक्रिया देतात.ह्यामुळे माझे लिखान उत्साह येऊन लिखान चालू आहे.

केबल सुरळीत असल्यामुळे मला लिखान करण्यास केंव्हा पण बसू सकते.

आपण सर्वांना व केबल यांना माझे

धंयवाद ! धन्यवाद !

                             DSCF2042

श्री नामदेव गाथा

                                        ॐ
                             श्री नामदेव गाथा
[ ३३ ]
कोटीशा आदित्य १गोठे एके ठायीं | तेजें दिशा दाही उजळल्या || १ ||
घाबरा होऊनी वसुदेव पाहे | हृदयी आश्चर्य करीतसे || २ ||
मुकुटावरीं रत्न नक्षत्रांचा मेळा | भाळीं शोभे टिळा केशराचा || ३ ||
व्यंकटा भ् रुकुटी कमलाकार नेत्र | नासीक विचित्र शुकचंचु || ४ ||
विद्दुल्लते झळकती कुंडले | अधर कोवळें अरुणोदय || ५ ||
कंबुग्रीव कंठ हृदयीं वच्छलांच्छन | ब्रह्मयासी २खूण न कळे अंत || ६ ||
चतुर्भुज शंखचक्रगदापद्म | चिमणा मेझ:शाम वर्ण ज्याचा || ७ ||
कौस्तुभ निर्मळ वैजयंती माळा | कासे सोनसळा हाटकवर्ण || ८ ||
रुणझुण रुणझुण वाजताती वाळे | आरक्त वर्तुळ नखीं शोभा || ९ ||
ध्वजवज्रांकुश जैसीं रातोत्पळें | नामा म्हणे डोळे दिपाताती || १० ||
१ घोटिले (धु.) २ सीण (पं. व.आ.)

                                    श्री नामदेव गाथा

कैरी चा साखर आंबा

                       ॐ
कैरी चा साखर आंबा : प्रथम एक कैरी घेतली.
धुवून धेतली.कैरीचे साल खाढले.किसनीने कैरी
किसली.एक पातेले घेतले.त्या पातेल्यात किसलेली
कैरी घातली.पाऊण वाटी साखर पातेल्यात कैरी मध्ये
घातली.अर्धा भांड पाणी घेण्यासाठी मी एक गडू ठेवला आहे.
तो वापरून पाणी स्वंयापाक करतांना वापरतं असते.अर्धा गडू
पाणी किसलेल्या कैरी च्या व साखर घातलेल्या पातेल्यात घातले.
गॅस पेटवून किसलेली कैरी साखर पाणी एकत्र केलेले.ठेवले.
सर्व शिजविले.पाणी खिसालेल्या कैरी व साखर ह्यातील पाणी
अटवून गेले.पातळ साखर व कसलेली कैरी राहिली.कैरी चा साखर व
जायफळ साखर आंबा तयार झाला केला,मी.

                   DSCF2565DSCF2566DSCF2567

संत कबीर

                                           ॐ
                                     संत कबीर
संत कबीर : हिंदी साहित्यातील सर्वश्रेष्ठ संत  कावींचा मान लाभलेल्या
संत कबीरांचा जन्म २० मे(५ ) १३९९ साली झाला.एका ब्राह्मण घरात
जन्मलेल्या कबीरांचा साहित्यामध्ये व विचारशैलीवर हिंदू ,मुस्लिम सुफी
योगमार्गी व नाथपंथीय विचार सरणीचा प्रभाव दिसून येतो.निरक्षर तरीही ज्ञानी
व बहुश्रुत असलेल्या कबीरांचा सर्व रचना मौखिक पध्दती ने अनुयां कडून ग्रंथित झाल्या आहेत.
कबीर ग्रंथावली, कबीर बीजक या अधिकृत संग्रहा खेरीज काही रचना गुरुग्रंथसाहिबात ही आढळतात.
साक्षातकारी ज्ञानाला महत्व देणाऱ्या कबीरांनी परमतत्व एकच असून ते सगुण निर्गुण भेदातील असल्याचे
प्रतिपादन केले. ईश्र्वराच्या उपासने साठी योगमार्ग व भक्तिमार्ग या दोन्हीं चा पुरस्कार कबीरांनी केला.
भक्तिमार्ग यावर विशेष भर दिला.

                                     DSCF1836

श्री नामदेव गाथा

                                         ॐ
                             श्री नामदेव गाथा
[ ३१ ]
मयुरादि पक्षी करताती | नद्दा वाहताती दोन्ही थड्या || १ ||
भूमीवरी सडे केशर कस्तुरी | आनंद अंतरी सकळांचा || २ ||
विमानांची दाटी सुरवर येती | गंधर्व गाताती सप्तस्वरें || ३ ||
मंदमंद मेघ गर्जना करिती | वाद्दें वाजताती नानापरी || ४ ||
नामा म्हणे स्वर्गी नगारे वाजती | अप्सरा नाचती आनंदानें || ५ ||
[ ३२ ]
दशरथें मारिला तोची होता मास | वर्षा ऋतू असे कृष्णपक्ष || १ ||
वसुनाम तिथीं बुधवार असे | शुक सांगतसे परीक्षिती || २ ||
रोहिणी नक्षत्र दोन प्रहररात्र | माया घाली वस्त्र रक्षपाळा || ३ ||
नवग्रह अनुकूल सर्वांचें जें मूळ | वसुदेव कपाळ धन्य धन्य || ४ ||
जयाचा हा वंश तयासी आनंद | माझ्या कुळीं गोविंद अवतरला || ५ ||
अयोनीसंभव नोहे कांहीं श्रमी | नामयाचा स्वामी प्रगटला || ६

                             DSCF2559

श्री नामदेव गाथा

                                        ॐ
                             श्री नामदेव गाथा
[ ३० ]
विमानांची दाटी अंतरिक्षीं देव | करिताती सर्व गर्भस्तुति || १ ||
अत्रा अक्षरांत असे तुझी मूर्ती | यज्ञेशा तुजप्रती नमो नमो || २ ||
साहाजणें भांडती नवजणी स्थापिती | न कळे कोणाप्रती अंत तुझा || ३ ||
आठराजणें तुझी वर्णिताती कीर्ति | गुणातीत श्रीपती नमो तुज || ४ ||
चौघा जणां तुझा न कळेचि पार | श्रमसी वारंवार आम्हांसाठी || ५ ||
अ ठ्ठायांशीं सहस्त्र वर्णिताती तुज | ब्रह्मांडाचे बीज तुज नमो || ६ ||
जन्ममरणाचें नाहीं तया भय | आठविती पाये तुझे देवा || ७ ||
नवजणी तुझ्या पायीं लोळताती | परब्रह्म मूर्ति तुज नमो || ८ ||
नामा म्हणे ऐशी करिताती स्तुती | पुष्पें वाहूनि जाती स्वस्थळासी || ९ ||

                             DSCF2559

श्री नामदेव गाथा

                                             ॐ
                                 श्री नामदेव गाथा
[ २८ ]
सातवा जो गर्भ योगमाया नेत | आश्र्चर्य करीत मनामाजी || १||
रोहिणी उदरीं नेवोनी घातला | न कळे कोणाला देवावीण || २ ||
कंसाचिया भेणें यादव पळाले | ब्राह्मण राहिले अरण्यांत || ३ ||
नाहीं कोणा सुख तळमळ मानसीं | बाधील दुष्टासी कोण आता || ४ ||
१विश्वाचा जेनिता कळेल तयाला | दावितसे लीला संभूतीची || ५ ||
अर्हनिशी २ध्यान भक्ताचें मानसीं | स्थापील धर्मासी नामा म्हणे || ६ ||
[२९ ]
देवकीचें तेज दिसे जैसा सूर्य | कंसाचें हृदय जळतसे || १ ||
हरणें पळती देखोनियां व्याघ्र | कापे थरथर तैसापरी || २ ||
अजासर्पन्यायें कीटकभ्रमर | दिसती नारीनर कृष्णरूप || ३ ||
जेवितां बोलतां शेजेसी तो निजे | आला आला मज मारावया || ४ ||
नासील हा आतां दैत्यांचे ते बंड | फाटलीसे गांड तेव्हां त्याची || ५ ||
नामा म्हणे भयें लागलेंसें ध्यान | चराचरी कृष्ण दिसतसे || ६ ||
१ जो आत्मा (आ.) २ सुख (धु )

                       DSCF2559

श्री नामदेव गाथा

                                           ॐ
                                   श्री नामदेव गाथा
[२७ ]
वसुदेवा देत देवकी बहीण | लग्नामध्ये विघ्न जालें ऐका || १ ||
आकाशीची वाणी सांगतसे कंसा | मानी भरवसा हा बोलण्याचा || २ ||
आठवा इचा पुत्र वधील तुजसी | ऐकोनी मानसीं क्रोधायाला || ३ ||
घेऊनियां खड्ग माराया धांवला | हात तो धरीला वसुदेवें || ४ ||
देईन मी पुत्र सत्य माझें मानी | ठेवा बंदीनको खानीं दूतां सांगे || ५ ||१
होतांचि प्रसूत नेऊनियां देत | सहासी मारीत दुराचारी || ६ ||
धन्य त्याचें ज्ञान न करीच शोक | वधितां बालक नामा म्हणे || ७ ||
१ चरण ५ व ६ यांच्या मध्ये (आ.) प्रतीत खालील चरण सापडतो तो असा
पुण्य सारावया भेटे देवऋषी | वधी बाळकांसी ठेवूं नको || (आ.)

                          DSCF2559

मी कविता


मी कविता
सूर्यास शोभे अरुणिमा
चन्दास जैसी पोर्णिमा
शब्दास तुझिया उपमा
राहीन मी.
आतां शब्दांचिया दिठी
अलगद पडावी मीठी
शब्द स्वरांनो उठा. उठी
सादाफुलीन मी.
शब्दांची शपथ मोडो
शब्दांनी स्वर घडो
नादांचिया काठी झडो
स्फूर्तिदा होईन मी
शब्द शब्द न राहावे
शब्द सूर एक व्हावे
तैसे माझे भान विरावे
तुजसी मी
श्रीकांत चिवटे
१४. १. १९६८

     DSCF0656

श्री नामदेव गाथा

                                               ॐ
                                     श्री नामदेव गाथा
[ २६ ]
पूर्वी तूं अनुज जालासी कनिष्ट | सोसियेले कष्ट मजसवें || १||
आतां तूं वडील होईगा सर्वज्ञा | पाळीन मी आज्ञा तुझी बारे || २ ||
देवकी उदरीं रहावें जावोनी | मायेसी मागूनि पाठवितों || ३ ||
योगमाया तुज काढील तेथून | घालील नेऊन गोकुळासी || ४ ||
लक्ष्मीशीं सांगे तेव्हां हृषिकेशी | कौंडण्यपुराशीं जावें तुम्ही || ५ ||
नामा म्हणे ऐसा करूनी विचार | घ्यावया अवतार सिध्द असे || ६ ||

                                      DSCF2559

अध्यात्मिकता

                                              ॐ
                                      अध्यात्मिकता
अध्यात्मिकता :घरोघरी अध्यामिकता च वळणं असते.असतं.
पूर्वी अंगणात सडा घालून अंगणात रांगोळी काढत असतं .आता कांही
ठिकाणी अजून ही फ्ल्याट च्या दारात रांगोळी काढतात.देवापुढे रांगोळी काढतात.
सण वाढदिवस समारंभ च्या वेळी पण दारात जेवतांना ताटा भोवती रांगोळी काढतात.
यालाच यालाच संस्कृती व आध्यात्मिक ताची वळण सवय असते.तसेच पूजे साठी बागेतील
किंवा विकत फुल आणने कधी कधी दाराला फूलांच तोरण लावणे.हे वळण व आध्यात्मिक ह्यात आहे
असं वाटत. ओटा पाण्यानं धुतला की ओटावार पण छोटी रांगोळी काढणे भांडी स्वच्छ धुवून जागच्या
जागी लावणे हे जे वळण आहे.संस्कृती आहे मनाला चांगल हा ! उच्छाही वाटण हेच वळण व आध्यात्मिक
बनत.रोज एक पोथी वाचन. एखादा उपवास कारण नियमित देवाला जाणं आठवडा तून एकदा तरी दत्त देवी
शनी अशा देवाला जाऊन फुल नारळ देण.हे सुध्दा वळण आध्यात्मिक ह्यात असते.घरात पण एका वारी
गुरूला देवाला हार घालणे नारळ फोडणे हे पण वळण व अध्यात्मिक ह्यात आहे.निटनिटके राहणे घर प्रसन्न
ठेवणे ह्यात वळण व अध्यात्मिक ता आहे. लोकान बरोबर बोलण्यात पण आपले मन आध्यात्मिक ता कडे
वळत प्रत्येक घरात देवा पुढे रांगोळी देवाला फुल कोणी कोणी तांब्याच तांब्या व त्यावर नारळ ठेवतात.हे
सर्व वळण व अध्यात्मिक ह्यातच वळत.असतं
एखादे गाण म्हणन एखाद वाद्द वाध्य शिकन वाजवीन विणकाम करणं
चित्र काढण अशा कलेच्या कामात मन लावण हे सर्व वळण अध्यात्मिक आहे.

                              दारातील रांगोळी

श्री नामदेव गाथा

                                       ॐ
                             श्री नामदेव गाथा
[ २४ ]
आकाशीं वाणी सांगे सकळांसी | तळमळ मानसी करूं नका || १ ||
देवकीच्या गर्भा येईल भगवान | रक्षील ब्राह्मण गाई भक्त || २ ||
उतरील भार मारील दैत्यांसी | आनंद सर्वांसी करील तो || ३ ||
रोहिणी उदरीं शेष बळीभद्र |यादव समग्र व्हारे तुम्ही || ४ ||
ऐकोनियां ऐसें आनंद मानसी | येती स्वस्थळासी नामा म्हणे || ५ ||
[ २५ ]
शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर | चला अवतार घेऊं आतां || १ ||
पृथ्वीवरी दैत्य २ते मातले फार | गाऱ्हांणें सुरवर सांगू आले || २ ||
शेष म्हणे मज श्रम जाले फार | या लागीं अवतार मी न घेचि || ३ ||
राम अवतारीं जालों लक्षुमण | सेविलें अरण्य तुम्हासवें || ४ ||
चौदा वर्षांवरी केलें उपोषण | जाणतां आपण प्रत्यक्ष हें || ५ ||
नामा म्हणे ऐसें वदे धरणीधर | हांसोनी श्रीधर काय बोले || ६ ||
२ मारिले ते फार (आ. )

                                       DSCF2559

श्री नामदेव गाथा

                                          ॐ
                                 श्री नामदेव गाथा
[ २३ ]
वासुदेवा ह्रषिकेशा माधवा मधुसूदना | करिताती स्तवना पुरुषसूक्तें || १||
पद्मनाभ त्रिलोकेशा वामन १शेशापायी | आम्हां कोणी नाहीं तुजवीण || २ ||
जनार्दना हरि श्रीवत्स गरुडध्वजा | पाव अधोक्षजा आतां आम्हां || ३ ||
वराहा पुंडरीका नृसिंह नरांतका | वैकुंठनायका देवराया || ४ ||
अच्युता शाश्वता अनंता अज अव्यया | कृपेच्या अभया देई आम्हां || ५ ||
नारायणा देवाध्यक्षा कैठभंजना | करीरे मर्दना दुष्टाचिया || ६ ||
चक्रगदाशंखपाणि नरोत्तमा | पाव पुरुषोत्तमा दासा तुझ्या || ७ ||
रामा हयग्रीवा भीमा रौद्रोद् भवा | आश्रय भूतां सर्वां तुझा असे || ८ ||
श्रीधरा श्रीपति चतुर्बाहो मेघ:शामा | लेकुरें आम्ही आम्हां पाव त्वरें || ९ ||
नामा म्हणे ऐसें करितां स्तवन | तोषला भगवान क्षीरब्धींत || १० ||
१ जळशाई (धु.

                          DSCF2559

श्रीएकादशीमाहात्म्य

                           ॐ
             श्रीएकादशीमाहात्म्य
२४ एकादशांची नावे
चैत्र शुध्द ११ कामदा वद्द ११ वरूथिनी
वैशाख शुध्द ११ मोहिनी वद्द ११ अपरा
ज्येष्ठ शुध्द ११ निर्जला वद्द ११ योगिनी
आषाढ शुध्द ११ शयनी वद्द ११ कामिका
श्रावण शुध्द ११ पुत्रदा वद्द ११ अजा
भाद्रपद शुध्द ११ परिवर्तिनी वद्द ११ इंदिरा
आश्र्विन शुध्द ११ पाशांकुशा वद्द ११ रमा
कार्तिक शुध्द ११ प्रबोधिनी वद्द ११ उत्पत्ति
मार्गशीर्ष शुध्द ११ मोक्षदा वद्द ११ सफला
पौष शुध्द ११ पुत्रदा वद्द ११ शट्तिला
माघ शुध्द ११ जया वद्द ११ विजया
फाल्गुन शुध्द ११ आमलकी वद्द ११ पापमोचनी
टीप : दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिकमासांतील दोन
एकादशां नाही नावे आहेत.
अधिक मासांतील शुक्लपक्ष तील एकादशीला ‘कमला’
व कृष्णपक्ष तील एकादशीला ‘कमला’ म्हणतात .

हिंदु धर्माच्या प्रत्येक महिना मध्ये दोन वेळा एकादशी येते.
एखाद्दा पंधरवाड्यात क्वचित, एकादशी दोन दिवस लागोपाठ येते.
त्यापैकी पाहिल्याला दिवसाला स्मार्त एकादशी म्हणतात तर दुसरे दिवसाला
भागवत एकादशी असे म्हणतात. श्रीशंकरांनी पहिल्या पूर्णतिथीचा स्वीकार केला,
तर श्रीविष्णूंनी दुसऱ्या शेष – तिथीचा स्वीकार केला.

श्री नामदेव

                                          ॐ
                                   श्री नामदेव
[ 22 ]
पापी जे अभक्त देत्य ते माजले | धरणीसी जालें ओझें त्यांचें || १ ||
दिधलासे त्रास ऋषि सर्वां | न पूजिती देवा कोणी एक || २ ||
राहिलेले यज्ञ मोडिलें कीर्तन | पळाले ब्राह्मण दैत्या भेणें || ३ ||
वत्सरुपी पृथ्वी ब्राह्मयापाशीं जाय | नेत्रीं वाहे तोय सांगतसे || ४||
बुडविला धर्म अधर्म जाला फार | सोसवेना भार मज आतां || ५ ||
ब्रह्मा इंद्र आणि बरोबरी शिव | चालियेले सर्व क्षीराब्धीशीं || ६ ||
नामा म्हणे आतां करतील स्तुती | सावधान चित्तीं परिसावें || ७ ||

                                 DSCF2559

%d bloggers like this: