आपले स्वागत आहे!

Archive for जून, 2012

करुणाष्टके

                                      ॐ
|| श्रीहरि ||
श्रीसमर्थ रामदासस्वामीविरचित
करुणाष्टके (मराठी )
तुजवीण मज तैसें जाहलें देवराया | विलग विषमकाळीं तुटली सर्व माया |
सकळजनसखा तूं स्वामि आणीक नाहीं | वनकवमन जैसें त्यागिलें सर्व कांहीं || १० ||
स्वजनजनधनाचा कोण संतोष आहे.| रघुपतिविण आतां चित्त कोठें न राहे ||
जिवलग जिव घेती प्रेत सांडूनि जाती | विषय सकळ नेती मागुताजन्म देती || ११ ||
सकळ भवाचे आखिले वैभवाचे | जिवलग मज कैंचे चालते हेचि साचें ||
विलगविषम -काळीं सांडिती सर्व माळीं रघुविर सुखदाता सोडीव अंतकाळी || १२ ||
सुख सुख म्हणतां हें दु:ख ठाकूनि आलें | भजन सकळ गेलें चित्त दुश्र्चित्त झालें ||
भ्रमित मन कळेना हीत तें आकळेना | परम कठिण देहीं देहबुद्धी वळेना || १३ ||
उपरित मज रामीं जाहली पूर्णकामीं | सकळजनविरामीं रामाविश्रामधामीं ||
घडि – घडि मन आतां रामरूपीं भरावें | राविकूळटिळका ! रे आपुलेंसें करावें || १४ ||
जळचर जळवासी नेपाती त्या जालासी | निशि – दिन तुजपाशीं चुकलों गूणरासी ||
भुमिधर – निगमासी वर्णवेना जयासी | सकळ – भुवनवासी भेटि हे रामदासी || १५ ||

                                  DSCF2660

आषाढ एकादशी

आषाढ एकादशी : स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
दक्षिणायन ग्रीष्मऋतु आषाढ शुक्लपक्ष विशाखा नक्षत्र वृश्चि राशिप्रवेश
शनिवार ११ शयनी एकादशी शुक्ल आषाढ एकादशी आहे.पंढरपूर यात्रा आहे.
तसेच तारीख दिनांक ३० जून (६)२०१२ साल ला शयनी एकादशी आहे.


   

करुणाष्टके

                   ॐ
|| श्रीहरि: ||
श्रीसमर्थ रामदासस्वामीविरचित
करुणाष्टके ( मराठी )
जळत हृदय माझें जन्म कोट्यानुकोटी |
माजवरि करुणेचा राघवा पूर लोटीं |
तळमळ निववीं रे राम कारुण्यासिंधु |
षडरिपुकुळ माझें तोडिं याचा विरोधु || ६ ||
तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी |
सिणत-सिणत पोटीं पाहिली वाट तुझी |
झडकरि झड घालीं धांव पंचानना रे |
तुजविण मज जंबुकी वासणारे रे || ७ ||
सबळ जनक माझा राम लावण्यपेटी |
म्हणउनि मज पोटीं लागली आस मोठी |
दिवस गणित बोटीं प्राण ठेउनी कंठी |
अवचट मज भेटी होत घालीन मिठी || ८ ||
जननि -जनकमाया लेंकरुं काय जाणे |
पय न लगत मूखें हाणतां वत्स नेणे ||
जळधरकण आशा लागली चातकासी |
हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी || ९ ||

        DSCF2660

करुणाष्टके

मनाचे श्लोक व करुणाष्टके
करुणाष्टके
१ : अनुदिन अनुतापें तापलों
अनुदिन अनुतापें तापलों रामराया ! | परम दिनदयाळा !
निरसीं मोहमाया || अचपळ मन माझें नावरे आवरीतां |
तुजविण शिण होतों धांव रें धांव आता || १ || भजनरहित रामा सर्वही
जन्म गेला | स्वजनजनधनाचा व्यर्थ म्यां स्वार्थ केला || रघुपति !
मति माझी आपुलीशी करावी | सकळ त्यजुनि भावें कांस तुझी धरावी || २ ||
विषयजनित सूखें सौख्य होणार नाहीं | तुजविण रघुनाथा वोखटें सर्व कांहीं |
रविकुळटिळका रे हीत माझें करावें | दुरित दुरि हरावें सस्वरुपीं भरावें || ३ ||
तनु – मन – धन माझें राघवा ! रूप तुझें | तुजविण मज वाटे सर्व संसार वोझें |
प्रचलित न करावी सर्वथा बुद्धि माझी | अचळ भजनलीला लागली आस तुझी || ४ ||
चपळपण मनाचें मोडितां मोडवेना | सकळ – स्वजनमाया तोडितां तोडवेना |
घडिघडि बिघडे हा निश्र्चयो अंतरींचा | म्हणउनि करुणा हे बोलतों दीन वाचा || ५ ||

ब्लॉग पोस्ट ६७९ वा !

ब्लॉग पोस्ट ६७९ वा : माझा ब्लॉग पोस्ट दिनांक तारीख २७ जून (६) २०१२ साल ला
वार बुधवार ला ६७९ सहाशे एकूण ऐंशी वा ब्लॉग पोस्ट होत आहे.खरचं खूप लिखाण
करायला मिळाले आहे. मला ! १२ ज्योतिर्लिंग खेळ श्री नामदेव गाथा येशू ब्रिज वटपौर्णिमा
शनीप्रदोष एकादशी फादर्स डे मदर डे खिचडी अशा वेगवेगळ्या प्रकार ची माहिती ब्लॉग मध्ये
लिहिली आहे. वाचन करून लिहिली त्यामुळे खूप लक्षात राहते.संगणक मध्ये एवढी माहिती एका
ब्लॉग मराठी त आहे हे वासुधालय ब्लॉग ला महत्व आहे वैशिष्ठ आहे. आपण सर्वांनी ब्लॉग वाचन केले.
प्रतिक्रिया दिल्यात भेटी पण दिल्यात त्या बध्दल धन्यवाद ! धंयवाद !
हा ब्लॉग लिही पर्यंतच्या भेटी : ५५,७२९

DSCF2667

गंगापूजन

गं गा पू ज न –
गंगापूजन :
मान सरोवर हृदयांत वसते गात्रांत स्फूर्ति अणू
डोळ्यांतून दोन झरती धाराच गंगा म्हणू.
हाती दोन नित्य वसुधा ‘ साकार ‘ अन् ‘ सुधीर ‘
मस्तकी उन्नत त्या तिथेच समजा ‘ विश्वातला ईश्वर ‘
मी कोण हे मला उमजणे होवो निया उन्मत
यात्रा या चार धामच बघा हेच गंगापूजन
२ . २ . १९६८ कोल्हापूर श्रीकांत चिवट

अक्का आक्का माझ्या आत्येसासूबाई त्या वेळेला रेल्वेने यात्रा करून आल्या होत्या. त्यावेळेला गंगापूजन मी व हे ह्यांनी गंगापूजन केले. होते. त्याची आठवण आहे.झाली.
आता माझ्या ब्लॉग १२ ज्योतिर्लिंग याची माहिती लिहिली आहे.म्हणून परत गंगापूजन लिहिले आहे. १२ ज्योतिर्लिंग याची माहिती लिहितांना मुलांनी खूप मदत केली आहे संगणक मधून शोधून लिहिली आहे, देव कृपेने माझे महाराष्ट्रातील सर्व ज्योतिर्लिंगांचे दर्शन झाले आहे, त्या ज्योतिर्लिंग बद्धल स्वतः च्या अनुभवातून लिहिले.


DSCF1953


DSCF1953

ज्योतिर्लिंग १२ – औंढा नागनाथ

हिंगोली जिल्ह्यात मधील औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचा अनुभव अगदी विस्मयकारी होता. लिंग जमिनीच्या खाली स्थापन करण्यात आले आहे. लिंग पर्यंत जाण्यासाठी वाकून ३-४ पायऱ्या उतरून जावे लागते. खाली गेल्यावर देव दर्शन साठी व बसण्यासाठी छोटीशी गुहे सारखी जागा आहे. मन अगदी पवित्र होते. ही जागा स्वतः जाऊन अनुभवण्यास पाहिजे.

नागनाथ म्हणजे नागांचा देवता. मनुष्याची कुंडलिनी योनी हि एका सर्प  सारखी मानली जाते. कुंडलिनीतील उर्जा व सर्प यांचा देवता म्हणजे नागनाथ.

आत्ता पर्यंत दर्शन झालेले सर्व ज्योतिर्लिंग यांचा अनुभव अगदी संस्मरणीय व पवित्रात्मक होता. देव कृपेने सर्व दर्शन व लिखाण पार पडले.

शिवो हं… शिवो हं!

ज्योतिर्लिंग ११ – वैजनाथ

परळी वैजनाथ येथील वैजनाथ शिव मंदिर हे ११ वे ज्योतिर्लिंग आहे. अगदी प्रसन्न वातावरण आहे, मुख्य मंदिरा कडे जाताना थोड्या पायऱ्या चढून जावे लागते. मंदिरा च्य जवळच एक सुंदर असे छोटे दुसरे गोलाकार शिव मंदिर असून मध्यभागी लिंग आहे. अगदी छान गाभारा आहे.

वीरशैव समाजाने बांधलेल्या ह्या मंदिर वीरभद्र ची एक मोठी मूर्ती सुध्धा आहे. जेंव्हा आपल्या वडिलांकडून यज्ञाचे निमंत्रण शिव व सती यांना मिळाले नाही, तेंव्हा सती ने रागाच्या भरात यज्ञात उडी घेतली. हे ऐकून, रागावलेल्या शिवाने आपला एक केस उपटून जमिनीवर फेकला व त्यातून वीरभद्र, शिवाच्या रागाचे प्रतीक म्हणून निर्माण झाला. अशी आख्याईका आहे.

शिव शिव!

ज्योतिर्लिंग १० – घृष्णेश्वर

 
औरंगाबाद जवळ घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग च्या दर्शना साठी सकाळी ७ वा. पोहोचलो. काळ्या दगडांनी बांधलेले हे मंदिर नेटके व छान दिसले.
 
आम्ही फुलं, नारळ व इतर पूजा साहित्य घेऊन मनाप्रमाणे लिंग दर्शन घेतले. लिंगास हात लावून नमस्कार करून अगदी जवळून आपल्याला कृतज्ञ होता येते. पुरुषांना शक्यतो  वरती उघड्या अंगाने गाभार्यात जावे लागते. असे म्हणतात की मेस्र्दंड उघडा असल्यास उर्जा स्वीकारण्यास सोपे जाते.
 
ओम  नमः शिवाय!
 

ज्योतिर्लिंग ९ – रामेश्वर

 
तामिळनाडू मध्ये रामेश्वरम येथील  रामनाथस्वामी ज्योतिर्लिंग  मंदिरास तीन नारायणांनी  प्रतिभा आणली आहे. हे तीन नारायण म्हणजे – अपार, सुंदरर आणि तीरुग्णन सम्बंदर हे होत. हे मंदिर १२ व्या शतकात बांधले आहे. ह्या मंदिराचा गाभारा सर्व हिंदू मंदिरांमध्ये मोठा असल्याचे म्हंटले जाते.
 
ज्योतिर्लिंग म्हणजे ज्योतीचे लिंग किंवा एक स्तंभ जो ताठ आणि निश्चल उभा आहे, म्हणून त्याला ज्योतीचा स्तंभ असेही संबोधतात. हे रामेश्वर चे मंदिर १२ ज्योतिर्लिंग पैकी ९ वे  ज्योतिर्लिंग आहे.
 

ज्योतिर्लिंग ८ – त्रंबकेश्वर

महाराष्ट्रातील नाशिक जवळ त्रंबक गावात गोदावरी काठी त्रंबकेश्वर चे प्रसिध्द ज्योतिर्लिंग आहे. गोदावरी हि भारतातील सर्वात मोठी नदी. त्रंबकेश्वर नाशिक पासून अतिशय सहज जाण्या सारखे आहे.

त्रंबकेश्वर मधील लिंगा मध्ये आणखीन तीन लिंगं आहेत. त्यांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश असे मानतात. हे तीन देव इथे वसले म्हणून नाव त्रंबकेश्वर. हि जागा गजबजलेली आहे, आणि दर्शन घेण्यास वेळ लागू शकतो पण अतिशय उत्साहवर्धक वातावरण आहे.

आम्ही पहिल्यांदी महाकुंभ येथे हात पाय ओले केले, येथे दर १२ वर्षांनी शिव पूजक एकत्र जमतात. महाकुंभातील पाणी गोदावरी च्या उगमस्थाना पासून येते असे म्हणतात.

नंतर केदारेश्वराचे दर्शन घेतले. केदारेश्वराच्या बाबतीत ५ व्या ज्योतिलिंग ह्या ब्लॉग मध्ये लिहिले होते. त्या केदारेश्वराची प्रतिमा त्रंबकेश्वर येथे आहे. नंतर चिंतामणी पाषाण (गणपती) चे दर्शन घेऊन त्रंबकेश्वर चे मनापासून दर्शन झाले.

ज्योतिर्लिंग ७ – काशी विश्‍वनाथ

उत्तर प्रदेश मध्ये वाराणशी येथील  काशी विश्‍वनाथ शिव मंदिर अत्यंत पवित्र मानले जाते. आयुष्यात एकदा ह्या मंदिराची तीर्थयात्रा घडो अशी भक्तांची इच्छा असते. हे सातवे ज्योतिर्लिंग आहे.
 
येथे मुख्य प्रतिमा विश्वनाथ किंवा विश्वेश्वराय म्हणजे विश्वाचा ईश्वर ह्यांची आहे. हे शहर ३५०० वर्षान इतके जुने असून, जगातले सर्वात जुने गाव मानले जाते.
 

ज्योतिर्लिंग ६ – भीमाशंकर

 भीमाशंकर हे सहावे ज्योतिर्लिंग शिरढोण जिल्ह्यात पुण्यापासून १२७ किलो मीटर वर आहे. आम्ही हायवे सोडून घाट व गर्द  झाडांच्या सुंदर रस्त्या तून चाललो होतो. छान रंग दरी व उंच डोंगरांमध्ये दिसत होते. रस्ता छोटा व खड्यांचा होता. पण आमच्या ज्योतिर्लिंग च्या दर्शनाची आस साक्षात भगवान शिव ने उलाखाली असे वाटले जेंव्हा त्याच्या दूता सारखा एक सर्प आमच्या रस्त्यात आला. त्याच्या साठी थांबून आम्ही  रस्ता दिला प्रथम त्याचे दर्शन झाले व पुढे निघालो.
 
काळ्या दगडात  बांधलेले हे मंदिर एका छोट्या दरीत वसले आहे. साधारण पणे २०० पायऱ्या खाली उतरून जावे लागते. ह्या मंदिराच्या समोर एक नांदी व एक १७२९ सालची घंटा आहे. शिव लिंग अंधारात साधारण पणे ५ फूट जमिनी खाली आहे. खाली पायऱ्या उतरून जावे लागते. शिव लिंगाचे दर्शन आणि स्पर्श ज्योतिर्लिंगाचे तेज अंतर मना वर बिंबवते.

जोतिर्लिंग ५ – केदारनाथ

हिमालयातील रांगा मध्ये गढवाल येथे भगवान शिव चे अत्यंत पवित्र असे केदारनाथ मंदिर मंदाकिनी नदीच्या काठी वसलेले आहे. खराब हवामानामुळे हे मंदिर फक्त एप्रिल पासून कार्तिक पौर्णिमे पर्यंतच उघडे असते. हिवाळ्यात केदारनाथ मधील मूर्ती उकिमठ येथे आणून पुजल्या जातात. केदार खांदा चा भगवान असे म्हणून शिव ह्याला पूजले जाते.

गौरीखंड येथून १४ किलो मीटर चा खडतर प्रवास करून केदार नाथ जा जावे लागते. केदार नाथ हे १२ ज्योतिर्लिंगा पैकी ५ मानले जाते.

ज्योतिर्लिंग ४ – अमरेश्वर

ओंकारेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगा पैकी चौथे ज्योतिर्लिंग. शिवपुरी ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नर्मदा नदीच्या काठावरील एका बेटावर हे ज्योतिर्लिंग वसले आहे. ह्या बेटाचा आकार ॐ अक्षरा सारखा आहे असे म्हणतात.

इथे दोन देवळे आहेत. एक भगवान ओंकारेश्वर याचे. ओंकारेश्वर म्हणजे ॐ ह्या आवाजाचा ईश्वर. ॐ हे एक पवित्र अक्षर आहे, शक्यतो प्रार्थने नंतर याचे उच्चारण करतात. ॐ ह्या पवित्र अक्षराला प्रणव असेही म्हणतात.

दुसरे देऊळ अमरेश्वर ह्या शिव रूपाचे आहे. अमरेश्वर म्हणजे अमरत्व चे भगवान.

ज्योतिर्लिंग ३ – महाकालेश्वर

महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे प्रसिध्ध शिव ज्योतिर्लिंग पुराण उज्जैन, मध्य प्रदेशात रुद्र नदीचं काठी वसले आहे. हे शिव लिंग स्वयंभू आहे असे मानले जाते. स्वयंभू म्हणजे ज्याने स्वतःला स्वतःच स्थापन केले आहे. इतर मूर्ती शक्यतो मंत्र आराधना किंवा प्राण प्रतिष्ठेने स्थापन केलेल्या असतात.

आधी ६४ ज्योतिर्लिंग होती असे मानले जाते, त्यातील १२ अत्यंत शुभ आणि पवित्र मानली जातात. हे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग त्यातील तिसरे होत .

फादर्स डे

फादर्स डे

जून महिना तील तिसरा रविवार ” फादर्स डे ” म्हणून साजरा केला जातो.
जगातील ५५ पंच्चावन देशांमध्ये हा फादर्स डे दिवस साजरा करतात.
यावर्षी तिसरा रविवार २०१२ साल ला १७ जून ला ‘ फादर्स डे ‘ साजरा होत आहे.
सर्व सर्वांना शुभेच्छा !

 

माझ्या वडिलांचं पत्र व अक्षरं !

ज्योतिर्लिंग २ – श्री शैल्य मल्लिकार्जुन

श्री शैल्य मल्लिकार्जुन हे ज्योतिर्लिंग कृष्ण नदीच्या काठी आंध्र प्रदेशात कुर्नुल जिल्ह्यात वसले आहे. अतिशय सुंदर अशा स्थापत्य व कोरीव कामाने सजलेल्या ह्या शक्ती पिठात आदि शंकराचार्यांनी शिवनानंदा लिहिली असे मानले जाते.

ज्योतिर्लिंग १ – सोमनाथ

 सौराष्ट्र गुजरात येथील सोमनाथ हे १२ ज्योतिर्लिंग पैकी पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते. सोमनाथ म्हणजे, चंद्र देवाचा रक्षणकर्ता.  हे भगवान शिव चे मुख्य  निवास स्थान मानले जाते. आत्तापर्यंत हे मंदिर १६ वेळा उद्वस्त झाले व परत बांधले गेले आहे. बारा ज्योतिर्लिंग यांची थोडक्यात माहिती मी पुढे १२ वेगळ्या ब्लॉग मध्ये देईन

जवस व कारले चटणी

जवस व कारले याची चटणी : जवस लाल असतात.कारले काळे असतात. मी जवस व कारले पाव पाव किलो आणले २५ पंचवीस रुपये पाव किलो मिळाले.दोन्ही २५ / २५ रुपये. पातेल्यात थोडे जवस घेतले. गॅस पेटवून जवस याचे पातेले ठेवले जवस उडे पर्यंत जवस भाजले.ते पातेले तसेच ठेवले दुसऱ्या पातेल्यात कारले थोडे घेतले. ते पण गॅस पेटवून कारले चे पातेले ठेवले उडे पर्यंत कारले भाजले. मिक्सर मध्ये प्रथम जवस घातले लाल तिखट मीठ घातले चांगले भाजलेले जवस लाल तिखट मीठ एकत्र करून मिक्सर चालू केला पूड झाल्या नतंर मिक्सर बंद केला बाउल मध्ये जवस याची चटणी काढली.भाजलेले कारले मिक्सर मध्ये घातले त्यात पण लाल तिखट मीठ घातले मिक्सर चालू केला भाजलेले कारले लाल तिखा मीठ सर्व एकत्र पूड झाली कारले याची चटणी तयार झाली.कारले याची चटणी बाउल मध्ये काढली. फोटो छायाचित्र काढले जवस कारले चटणीचे !नतंर काचेच्या बरणीत भरून ठेवले भरपूर दिवस अशा चटण्या राहतात.तेल घालून चवी साठी खातात.

 

मनाचे श्लोक व करुणाष्टके

               ॐ
मनाचे श्लोक व करुणाष्टके
( मराठी )
मना पापसंकल्प सोडोनि द्दावा |
मना सत्यसंकल्प जीवीं धरावा |
मना कल्पना ते नको विषयांची |
विकारें घडे हो जनीं सर्व ची ची || ५ ||
नको रे मना क्रोध हा खेदकारी |
नको मना काम नाना विकारी |
नको रे मदा सर्वदा अंगिकारू |
नको रे मना मत्सरू दंभ भारू || ६ ||
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावें |
मना बोलणें नीच सोसीत जावें
स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावें |
मना सर्व लोकांसि रे नीनवावें || ७ ||

वहिनी !

वहिनी !

वहिनी, आम्ही सर्व भावंडे आईस वहिनी म्हणत असू. ओळखीचे पण  व गावातील नातेवाईक पण वहिनीच म्हणत असत. म्हणतो ! माझी आई.

वहिनी नेहमी म्हणत असे पुष्पा पहिल्या झटक्यात S . S .C . पास झाली.
त्यावेळेला H .S . C . असे ! मला S  . S  . C  . (H  . S . C  .) पन्न्नास (५०) वर्ष झाली आहेत.

कणिक कधी तेल मीठ शिवाय भिजवू नये सांगत.

विडा चं पान ह्यावर सूर्य चक्र काढत ते मी शिकले . साटोरी छान करत असे मी पण साटोरी करण्यास शिकले. कपडे स्वच्छ ठेवत मी पण कपडे नीट ठेवते. फुलाचे गजरे घालण्यास तिला आवडत आम्हाला ही आणून देत असतं.

केळी दुधाची पिशवी त्यावेळी बाटल्या असत ते ती धूत असे. भाजी पण चांगली धुवून करीत असे.

एकदा ती व मी पुरण पोळी व मी बटाटे वडे केले होते.एकाच गॅस शेगडीवर असल्यामुळे तिने पुरणाचा तवा माझ्या बाजूला ठेवला व वडा चं कढई तिच्या बाजूला ठेवली. म्हणजे तू गोड कर. असे असा खूप आठवणी जवळ आहेत !

चला पुढे चला !

खिचडी !

तांदूळ व पिवळे मुग याची खिचडी : तांदूळ व पिवळे मुग सम प्रमाणात पातेल्यात घेतले. मुगाची चव चांगली लागते. म्हणून सारखेच तांदूळ व मुग घेतले. धुतले. गॅस पेटवून कुकर ठेवला. कुकर मध्ये तेल मोहरी याची फोडणी केली. धुतलेले तांदूळ मुगडाळ फोडणीत टाकले. लाल मिरची फोडणीत टाकली. गरम पाणी तांदूळ व मुगडाळ मध्ये टाकले. काला मसाला हिंग मीठ चावी साठी लाल तिखट टाकले. हळद टाकली. प्रथम नुसते छान तांदूळ मुगडाळ याची खिचडी शिजवून घेतले. नंतर वाफ येण्या करता कुकरचे झाकण लावले.व खिचडी पण छान दबली. तो पर्यंत लिज्जत पापड भाजला भाजलेला ची चव चांगली लागते. तळण्यापेक्षा ! नंतर बाऊल मध्ये तांदूळ मुगडाळ याची तयार झालेली खिचडी वाढली काढली. तेल मोहरीची फोडणी खिचडीवर वाढली टाकली खिचडीला तुपा पेक्षा तेल मोहरी ची फोडणी चांगली लागते. मसाला मिरची तळली ती ठेवली वाढली. अशा प्रकारे तांदूळ पिवळे मुगडाळ काला मसाला मीठ लाल तिखट लाल मिरची पाणी हळद सर्व घालून
खिचडी छान चवदार केली. लागते. बरोबर भाजलेला पापड ! तेल मोहरीची फोडणी ! मस्त बेत मेनू ! खाण्याचा !

 

टेनिस


टेनिस : २०१२ फ्रेंच चॅम्पियन
पॅरिस : टेनिसपटू नदाल याने फ्रेंच ओपन स्पर्धेत
पुरुषांच्या एकेरी अजिंक्यपदावर सातव्यांदा विक्रमी
जेतेपद मिळविले .
नोवाक जाकोविच याच्यावर ६ -४ , ६ -३ ,२ -६ ,७ -५ ने मात केली
नदाल कारकिर्दीतील ११ वे गॅ ण्ड स्लॅ म जेते पद आहे नदाल टेनिसपटू

                                 DSCF2643

खेळ

खेळ : बसके खेळ असतात. मैदानी खेळ असतात.
बसके खेळ कॅरम बुध्दिबळ काचपाणी सागरगोटे बीट्या असे बसके खेळ आहेत. माती दगड असा खेळ विट्टीदांडू खोको हॉकी फुटबॉल बॅटमिंटन टेनिस असे भरपूर खेळ खेळले जातात.

काचा फुटलेल्या तुकडे झालेल्या काचा एकत्र करायच्या. तळ हातात घेऊन झेलाच्या एक काचेचा तुकडा चाफेकळी व मधल बोट
ह्यात काचेचा तुकडा धरून खाली सर्व काचा टाकायच्या. एक एक काच दुसऱ्या काचेला न लागता ईतर सर्व काचा एक एक उचलायच्या भरपूर वेळ लागतो.

मी मुंबईत सोसायटीत बॅटमिंटन खेळले आहे . सागरगोटे बिट्या विट्टीदांडू दगड माती हे सर्व खेळ खेळून झाले आहेत.

संगणक मध्ये खेळ शक्यतो एकटेच खेळतात. भरपूर वेळ एकटेच तास तास घालवितात. तसे तसं पाहिलं तर चांगल नाही. दोघ किंवा बरेच जण खेळत असतील तर बोलणे होते माहिती जास्त होते. लोकात मिसळण्याची सवय असते. संगणक मध्ये इंटरनेट चे पैसे द्यावे लागतात. माहिती म्हणून खेळणे ठीक असते. हल्ली टॅबलेट पण आहेत कार मध्ये सहज खेळता येते.

मी आमची मुल सौ सुनबाई असेच असेच देव दर्शन साठी जाताना भाड्याची गाडी घेऊन जाताना टॅबलेट वर मध्ये मी कनेर्ट फोर खेळ खेळलेली आहे. तसे सहज खेळण्यास मजा वाटत असते आणि एक दोन टॅबलेट मध्ये खेळ चालत्या गाडीत खेळले आहे. मुलाने टॅबलेट मध्ये खेळायला शिकविले त्यावेळा. मी आपलं संगणक मध्ये लिखाण करते करत आहे.

ॐ शान्ति : | शान्ति : | शान्ति : ||

ॐ भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा: |
भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा: ||
स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूभि: |
व्यशेम देवहितं यदायु: || १ ||
ॐ स्वस्ति न इन्द्रो वृध्दश्रवा: |
स्वस्ति न: पूषा विश्र्ववेदा: ||
स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि: |
स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु || २ ||
ॐ शान्ति : | शान्ति : | शान्ति : ||

अर्थ :
हे देवांनो ! आम्ही कानांनी शुभ ऐकावे. आम्ही डोळ्यांनी
पवित्र-मंगल पाहावे.स्थिर – उत्तम अवयवांनी व सुदृढ
शरीरांनी युक्त होऊन आम्ही तुमची उपासना व स्तुती करतच
तुम्ही – देवांनी दिलेले हे आयुष्य व्यतीत करावे. ( अशी आमची प्रार्थना आहे.) [ १ ]
तो महाकीर्तिमान इंद्र आमचे कल्याण करो. ज्ञानसंपन्न आणि
वैभवसंपन्न ‘पूषा ‘ देव आमचे कल्याण करो. ज्याच्या गतीला अडथळा नाही
असा तो आकाशात संचार करणारा देव आमचे कल्याण करो आणि तो
तो वाणीला अधिपती देवगुरु आम्हांला श्रेयस् प्राप्त करून देवो. [ २ ]

व्यक्तींमध्ये शांतता नांदो.
समाजात शांतता नांदो.
जगात सर्वत्र शांतता नांदो.
_____________________________

येशू

                                          ॐ
                                          येशू
येशूचे स्वर्गारोहण
नंतर त्यानें त्यांस बेथानी पर्यंत बाहेर नेलें, आणि हात वर
करून त्यांस आशीर्वाद दिला.मग असे झाले की तो त्यांस
आशीर्वाद देत असतां त्यांजपासून वेगळा झाला आणि सर्गात
वर घेतला गेला.आणि मेघानें त्याला त्यांच्या दृष्टीआड केले.
तो जात असतां ते आकाशाकडे निरखून पाहत होते, पाहा, शुभ्र वस्त्रे
परिधान केलेले दोन पुरुष त्यांच्या जवळ उभे होते, ते म्हणाले,
” अहो गालील करांनो, तुम्ही आकाशाकडे कां पाहत उभे राहिला ?
तुम्हांपासून वर आकाशांत घेतला गेला आहे तोच येशू,, जसे तुम्हीं
त्याला आकाशांत जाता पाहिले तसाच येईल. या प्रमाणे प्रभू येशू
त्यांजबरोबर बोलल्या नंतर वर स्वर्गात घेतला गेला, आणि देवाच्या
उजवीकडे बसला.
तेंव्हा ते त्याला नमन करून मोठ्या आनंदाने यरुशलेमांस
माघारे गेले.आणि ते मंदिरांत देवाचा धन्यवाद नित्य करीत राहिले.

               DSCF0533

येशू

                                    ॐ
येशू : येशू म्हणाला ” स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व आधिकार मला
दिला आहे.यासतव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा.
त्यास पित्याच्या पुत्राच्या व पवित्र आम्याच्या नामानें बाप्तिसमा द्दा.
जे सर्व कांही मीं तुम्हास आज्ञापिले ते पाळावयास त्यांस शिकवा.जो
विश्वास धरितो व बाप्तिस्मा घेतो त्याचें तारण होईल,आणि जो विश्वास
धरित नाहीं तो दंडास योग्य ठरेल. आणि विश्वास धारणाऱ्या बरोबर ही चिन्हे
असत जातील, ते माझ्या नामाने भूतें काढतील, नव्या नव्या भाषा बोलतील ,
सर्प उचलतील, व कोणताहि प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांस बाधणारच नाही;
त्यांनी दुखणाइतांवर हात ठेविले म्हणजे ते बरे होतील. युगाच्या समाप्ती पर्यंत मी
सदोदित तुम्हांसबरोबर आहे.

                        DSCF0533

 

 

ब्रीज


टॉवरब्रीज : लंडनमधील हा पूल जगभरातील पर्यटकांच्या
आकर्षणाचे केंद्र आहे.एकोणीसाव्या शतकातील अखेरीस
‘ट्रॅफिक जाम’ सारख्या घटना होत नसतील असे आपल्याला
वाटू शकते,मात्र अशाच कारणामुळे लंडन ब्रीजला पर्याय म्हणून
या पुलाची निर्मिती करण्यात आली आर्किटेक सर होरॅस जोन्स
आणि इंजिनियर सर जॉन वुल्फ बेरी यांनी १८८६ मध्ये या पुलाचे
बांधकाम सुरु केले.१८९४ मध्ये तो वाहतुकी साठी खुला करण्यात आला.


चेंगयांग ब्रीज : चीन मधील डोंग समाजातील लोकांनी काही
‘वारे व पावसाचे पूल’ बांधले आहेत हा पूल ही त्यापैकीच आहे.
हे लोक सखल भागात राहत व त्यांना नेहमीच नदीच्या पुराचा
पुराचा सामना करावा लागे मात्र ते पूल बांधण्यात अतिशय कुशल
असल्याने त्यांनी अशा पुलांची निर्मिती करून आपले अस्तित्व टिकविले.
या पुलांवरून त्यांना नुसती नदी पार करता येत होती असे नव्हे तर या पुंलावर
ते राहूही शकत असत.या सर्व पुलांमध्ये हा चेंगयांग पूल अनेक बाबतीत
वैशिष्ट्य पूर्ण आहे. लिंक्सी नदीवर तो बांधलेला आहे

आंबे जांभळ मोगरा

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
तसेच २०१२ साल ह्यावर्षातील आंबे जांभळ कैऱ्या
कोकमं हि फळ मोगरा व बकुळी दवणा हि फुल आता
मिळणे कमी झाली.ह्या मधील संपुन नवीन फळ व फुल
मिळतील. आंबे आता १४० एकशे रुपये डझन व २०० दोनशे
रुपये पेटी कांही आंबे अजून ही महाग आहेत जांभळ ४०चाळीस
रुपये पाव किलो होते आज मला १५ पंधरा रुपये पाव किलो मिळाले .
मोगरा १० रुपये आहे कैरी लोणचं छोट्या १० रुपये ४ आणल्या.
तेवढ चंच लोणचं घरी केले.किती ही महाग असले तरी थोड थोड
खाण्यात येते..

 

लक्ष्य

                       ॐ
‘ लक्ष्य
संगतित ईश्वराच्या मनरमणा रमणे
साधनेस, निराकारा,नामगमते,गमणे
रमणे गमणे जीवनी,ध्यास सतत धारणा
धारणे रे मना, नाम सतत चिंतना
चित्त चिन्ता नाशता, नाम हरी कामना
हरीच पूर्ण कामना, जीवनाला याचना
याचना करीत जाने, हरीस तूं पावना
पावना, न म्हणो रसना, जारी नामना
१८.७.९०
श्रीकांत चिवटे

येशू

                               ॐ
येशू :मग सहा दिवसांनंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ
योहान यांग आपणा बरोबर एक उंच डोंगरावर एकांती नेले.
म्हणजे तथे ते प्राथना करू शकतील. आणि तो प्रार्थना
करीत असता, त्याचे रूप त्यांच्या देखता पालटलें; त्याचें मुख
सुर्यासारखे तेजस्वी झालें आणि त्याची वस्त्रें प्रकाशासारखी शुभ्र
झाली.
आणि पहा मोशे व एलिया हे दोघे जण त्याज बरोबर संभाषण करीत होते.
ते तेजोमय दिसले, आणि तो जें आपले निर्याण यरूशलेमात पूर्ण करणार होता
त्या विषयीं ते बोलत होते.तेंव्हा मेघातून अशी वाणी झाली की ” हा माझा प्रिय पुत्र ,
माझा निवडलेला आहे,याचे तुम्ही ऐका.”हे ऐकून शिष्य पालथे पडले व फार भयभीत झाले.
येशूने जवळ येऊन त्यांस स्पर्श करून म्हटलें,उठा,भीऊं नका.तेंव्हा त्यांनी डोळे वर करून
पाहिलें तो येशू शिवाय कोणी त्यांच्या दृष्टिस पडला नाही

                                 DSCF0533

सण !

मी ब्लॉग मध्ये स्वस्ति श्रीशालिवाहन शक महिनातील सर्व सण व घरातील प्रत्येक सण याचे छायाचित्र लावून माहिती दिली आहे. आमच्या घरात सर्व सण केले जातात.चैत्र महिनात चैत्र महिनात कैरी डाळ व पन्ह केले जाते. रामनवमी चा उपवास केले. रामाचा जन्म च्या वेळी देवळात जात रामरक्षा म्हणत देवळात. वैशाखात बुध्द पौर्णिमा नसली तरी पौर्णिमा म्हणून व अक्षय्य त्रीतीया केली जाते. जेष्ठ पौर्णिमा ला वड च्या झाडाची वट पौर्णिमा केली जाते. आषाढ महिना त गुरु पौर्णिमा केली जाते.आषाढ एकादशी केली
जाते. श्रावण पौर्णिमा नारळी पौर्णिमा राखी पौर्णिमा नारळ साखर गूळ याच गोड व वान बरोबर बोलणे राखी पाठविणे केले. नदी समुद्र याची पूजा करतात. श्रावण सोमवार मी करत भाद्रपद महिनात गणपती गौरी खड्याच्या गौरी आणल्या. आश्र्विन महिनात नऊ दिवस ते दसरा पर्यंत कोल्हापूर महालक्ष्मी दर्शन केले आहे.कार्तिक कार्तिक स्वामीच देवळात जाऊन दर्शन घेतले.दिवाळी त धन पूजा लक्ष्मीपूजन पाडवा भाऊबीज केले.स्वत: कुबेर यंत्र व महालाक्षी यंत्र काढून पूजा घरात केली.मार्गशीष महिना हे गुरुवार करत
पौंश महिनात सुगडीचे वाण साखर डाळी तांदूळ केळी केले.त्याच उद्दपण केले.माघ महिनात गणपतीला तिळगुळ याचा लाडू देत. गणपती जन्म च्यावेळी देवळात जात.फाल्गुन महिनात पुरण पोळी करून सार्वजनिक होळीत टाकते. बारामहिने गुरुवार ह्यांचे घरात असत. हे सर्व सण मी माहिती देऊन छायाचित्र फोटो घरातील दाखविले आहेत. नदीचे समुद्र चे फोटो गणपतीचे पूजेचे फोटो वडाचे फांदी चे फोटो दाखविले आहेत अशा प्रकारे आमच्या घरात पूजा केली जाते.घरोघरी असते.पण मी आपले
लिहून फोटो दाखवून केले आहे ब्लॉग मध्ये.

वड !

वड याच झाड रांगोळी ने काढायचं किंवा कागद घेऊन वडाच रंगीत चित्र काढावे.  फांध्या पारंब्या पण काढाव्यात.व पूजा घरात केल्यामुळे घर भररेल व प्रसन्न वाटत.  म्हणून घरी कोणतीही पूजा केली मी मनाला समाधान असतं अद्दात्मिक ता निर्माण असते.

५ जून

५ . जून (६ ) ला आमचा लग्नाचा वाढदिवस !

 

वट ज्येष्ठ पौर्णिमा

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
उत्तरायण ग्रीष्मऋतु ज्येष्ठ शुक्लपक्ष १५ नक्षत्र अनुराधा
राशिप्रवेश वृश्चिक सोमवार वट पौर्णिमा आहे.तसेच
तारीख दिनांक ४ जून (६) २०१२ ला वटपौर्णिमा आहे.
वडाच्या झाडाची किंवा वडाच्या फांदीची पूजा करतात.
पूर्वी भिंतीवर वडाच झाड काढून पूजा केलेली चित्र असे.
कोल्हापूर येथे बैल याची पूजा वटपौर्णिमा लाच करतात.
मातीचे बैल छान मिळतात.त्याची पण घरोघरी बैल याची पूजा करतात.

   

महात्मा


महात्मा
जन्मभर स्वत:साठी
कांही ठेउन न घेता
मागणाऱ्यांना सर्वकांही ‘
नुसते देत गेला
आयुष्यभर त्याला कांही
चुकून – कमी नाही पडले
आभाळाने स्वत: च
त्यावर सावली धरली संपूर्ण
आणि त्याच्या यशाची गुढी
नेली सुर्यापार
शेवटी इश्र्वाराने आत्मा
मागितल्यावर
तोही सहज देऊन टाकला
‘ कितिवेळ हे ओझे
मी सांभाळत राहू ‘ म्हणून
दहाव्या दिशेच्या मस्तकावर
पाउल ठेउन ठाम उभे राहून
‘ हसत हंसत एक पाउल
नुसते पुढे टाकले
अन
चतुर्थीचा चंद्र होउन
प्रकाशात राहिला
अवघे चराचर
कार्तिक वद्द , ४, १९१०
२६.११.१९८८
श्रीकांत CHIVATE

मीलन

                                   ॐ
मीलन
भाळावर रेखून सूर्य गोल लालसा छान
ही उषा हांसते हरवून अपले भान
चांदणी चमकते .. उमलत्या रम्य सकाळी
अन् कल्या जागती .. उरात स्वप्ने भोळी

मधुगंध पसरतो अवीट दाही दिशांत
हा धुंद पवन जो चौखूर आकाशांत
रात रती रमलेली उषा होऊनी चूर
झुकविते मान अन् जपत मनी लकेर

तो ऐटीत मागून डोकावे रविराज
दो डोळे करती उभयातात कि हितगूज
हरवते नीज अन् रेंगाळत लाली गाली
– आभाळ उतरते जणू भूमीवर खाली
श्रीकांत चिवटे
५.१.१९६७

साबुदाणा चं थालीपीठ

                                          ॐ
                           साबुदाणा चं थालीपीठ
साबुदाणा चं थालीपीठ : साबुदाणा एक भांडभर पातेल्यात घेतला.
साबुदाणा धुतला ४ /५ तास चार / पाच तास भिजवू दिला. चार पाच छोटे
गॅस पेटवून बटाटे कुकर मध्ये पाणी घालून चार / पाच शिट्या दिल्या.
गॅस बंद केला कुकर गार झ्या नंतर उकडलेले बटाटे पातेल्यात काढले.
बटाटाची साल काढली. बटाटा मध्ये भिजलेला साबुदाणा थोडा घातला .
शेंगदाणे याचा कूट अर्धी वाटी घातला.हिरवी मिरची दोन वाटलेली घातली
मीठ चवी पुरत घातलं.साबुदाणा बटाटा शेंगदाणे कूट हिरवी मिरची मीठ सर्व
छान एकत्र हाताने केले.खर तर करण्याची सवय इतकी झाली की माप घ्यावयाची
गरज च नसते.अंदाजाने सवय खूप झाली आहे तरी अंदाजाने मापं लिहित आहे.
सर्व साबुदाणा थालीपीठ याचं एकत्र केलेले केलेलं लोखंडी तवावर तूप लावून साबुदाणा
थालीपीठ च सारण थापले.गॅस पेटवून दोन्ही बाजूने भाजले.गॅस बंद केला बरोबर
शेंगदाणे कूट वाटलेली हिरवी मिरची मीठ दही एकत्र केलेले ठेवले.अशा प्रकारे
साबुदाणा थालीपीठ व दही मिरची मीठ खाण्यास दिले.मी लोखंडी तवा वरील वरच
साबुदाणा थालीपीठ दाखवीत आहे.

                               DSCF2634

प्रदोष व्रत माहात्म्य


प्रदोष व्रत माहात्म्य
सुर्यास्तापूर्वी एक दीडतास आणि सुर्यास्तानंतर एकदिडतास या वेळेला प्रदोषकाल मानतात.
शिवलिंग याची पूजा करतात . दिवस भर उपवास फळ शेंगदाने साबुदाणा खजूर रताळी
असे पदार्थ खाऊन उपवास करतात. सूर्यास्त व्हावयाचा आत जेवण करून पोळी भाजी
वरण भात सर्व जेवण करून प्रदोष उपवास सोडतात.
श्रावण किंवा कार्तिकमासी शुक्लपक्षी त्रयोदशी शनिवार आल्यास त्ये दिवस व्रताचे विशेष महत्व जाणावे.
शनिवार असता त्रयोदशीस म्हणती शनिप्रदोष.मंगळवार येता त्रयोदशी भौमप्रदष म्हणती
शुक्रवार च्या प्रदोषव्रते दीर्घायुष्य स्त्री समृद्धी प्राप्त होते.रविप्रदोष उत्तम आरोग्य साठी प्रदोषव्रत करावे.
सुखीजीवनासाठी श्रध्दावंतानी लग्नार्थी कुमारिकांनी सौभाग्यवर्धनासाठी सुवासिनींनी सोमप्रदोष व्रत करावे.
प्रदोष तिथी महिना तून दोनदा येते. व एकादशी नंतर प्रदोष दुसरे दिवस ला प्रदोष म्हणतात.
शिवशंकर करील त्यांचे कल्याण मनी स्मरावे उमामहेश्र्वर भगवान हे प्रदोषव्रत शंकर माहादेव याचं आहे.
ॐ नम: शिवाय | ॐ शिवाय नम: || ॐ शांति: शांति: शांति:||
||ॐ श्री सदाशिवायार्पणमस्तु ||
बारा महिने माझे वडील प्रदोष करीत करत असतं .

रांगोळी श्र्लोक  DSCF1843 DSCF1433

बुध्दिबळ !

बुध्दिबळ

बुध्दिबळ : बुध्दिबळ बुध्दिबळ खेळणारे यांना बुध्दिबळपटू म्हणतात.
काळे व पांधरे घर असतात ३२ बत्तीस पांढरे घर व ३२ बत्तीस काळे घर असे असतात.
काळे पांढरे घर दोन्ही मिळून ६४ चौंसष्ठ घर असतात.
पांढरा राजा काळा काळ्या घरात असतो. काळा राजा पांढरा पांढऱ्या घरात असतो.
राजाच्या उजवा हात ला घरात वजीर असतो वझीर असतो. उंट एक काळा घरात व पांढऱ्या घरात असतो.
एक राजाच्या शेजारी व वझीर च्या शेजारी घरात उंट असतो उंट च्या शेजारी काळा व पांढऱ्या घरात घोडा असतो.
पांढऱ्या घरात व काळ्या घरात हत्ती असतो. प्यादी ८ आठ असतात.पांढऱ्या व काळ्या घरात असतात.
बुद्धिबळ पट लावतांना उजवा हात याला पांढरे घर असते.
राजा तिरपा सरळ एक घर चालतो. वझीर सरळ कितीही घर चालतो. उंट तिरपा एक घर चालतो.घोडा अडीच घर चालतो.
हत्ती सरळ किती ही घर चालतो.पाद पादी एक घर सरळ चालते.
अशा प्रकारे बुद्धिबळ खेळ आहे.
तसेच वाघ शेळी चा एक खेळ आहे.चार ४ वाघ (चार उंट ) एकत्र मधल्या घरात असतात. व शेळी म्हणजे सर्व प्यादी
कडेच्या घरात असतात.वाघ एक घर चालतो. व प्यादी एक घर चालतात.शेळी वाघांना बांधून अडकवून ठेवतात .
वाघ अडकत नाही असा हा बुद्धिबळ चा दुसरा खेळ आहे.
मी लहान पाणी माझा भाऊ डॉ शरद यांच्या बरोबर खेळत असे..आता आमची मूलांनी कॉलेज मध्ये असतांना
घरात बुध्दिबळ पट सोंगट्या आणल्या तेवेळेला मी मुलां च्या बरोबर राजा वझीर हा खेळ खेळले आहे.
मला थोडीफार बुध्दिबळ याची माहिती आहे.जुना पट व सोंगट्या आज ही घरात आहे. याच मला खूप चांगल वाटत आहे.


 

आंब्रखंड !

                                                ॐ
आंब्रखंड (श्रीखंड ) : अर्धा लिटर दूध घेतले.आणले. दूधाची पिशवी धुतली.
दूध पातेल्यात काढले. गॅस पेटवून दूधाचे पातेले ठेवले दूध तापवून गॅस बंद केला
दुध दुपार पर्यंत गार केले.एका बरणीत दूध व साय एकत्र केली. एक डाव दही दुधात
घातले. विरजण लावले.दिवस व रात्र भर दूध दही एकत्र झाले त्याचे दही झाले.केले.दुसरे दवस LAA
स्वच्छ पांढरे कापड घेतले.सर्व दही त्या कपड्यात घातले चांगली गाठ बांधली घातली.व ५ /६ पाच व सहा तास
दही कपड्यात टांगून ठेवले.त्याचा मस्त चक्का केला झाला.दोन आंबे याचा साल काढून फोडी केल्या.
थोडी पिठी साखर घेतली.चक्का मध्ये पिठी साखर व आंबे याच्या फोडी घातल्या.डावाने सर्व चक्का पिठीसाखर
आंबा याचा फोडी एकत्र केल्या. मस्त आंब्रखड घरी तयार केले मी !आंबा याचा रस पण घालतात.आंबा याच्या फोडी
दाताला चांगल्या लागतात.मी खूप पूर्वी असे आंब्रखड केले त्याची आठवण झाली.

                         DSCF2607

                  DSCF2611DSCF2608

श्री नामदेव गाथा

                                       ॐ
                           श्री नामदेव गाथा
                             काकड आरती
[ ४८४ ]
उठा पांडुरंगा प्रभातसमयो पातला | वैष्णवांचा मेळा गरुडपारीं घातला || १ ||
वाठवंटापासूनि महाव्दारापर्यंत | सुरवरांची दाटी उभे जोडूनि हात || २ ||
शुकसनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी | कवाडाआडूनि पाहताती जगजेठी || ३ ||
सुरवरांची विमानें गगनीं दाटलीं सकळ रखुमाबाई माते वेगीं उठवा घननीळ || ४ ||
रंभादीक नाचती उभ्या जोडुनि हात |
त्रिशूळ डमरू घेउनी आला गिरजेचा कांत || ५ ||
पंचप्राण आरत्या घेऊनियां देवस्त्रिया येती
भावें ओवाळिती राई रखुमाबाई पती || ६ ||
अनंत अवतार घेसी भक्ताकारणें | कनवाळु कृपाळु दीनालागीं उध्दरणें || ७ ||
चौयुगांचा भक्त नामा उभा कीर्तनीं | पाठीमागें डोळे झांकुनी उभी ते जनी || ८ ||

                        DSCF2600 DSCF2601DSCF2605DSCF2603 DSCF2603 DSCF2606DSCF2559

   DSCF2604

श्री नामदेव गाथा

                                           ॐ
                                 श्री नामदेव गाथा
ताब्रपर्णि कदरास्वामि पुढें देखिलि आळुवानगरि कंन्याकुमारि आदिकेशव
आनंतशयनि देखिला हरि : तेथुनि येतां तीर्थे करितां महिद्र देखिला गिरि : पवनपुत्रे
हनुमंत उडाला : ते स्थान म्या वंदिलें सिरि : जनार्दन क्षेत्र देखिलें जेथें : शोभ
समुद्राचे तिरि : हेमाद्रि केलें माघस्नान पवित्र निर्मळ निरि : दक्षेणकासि गोकार्ण
पातलो महेश माहाबळेस्वरि : || आर्या वंदिलि समुद्रा माझारि स्नान केलें
हरहरेस्वरिं : आनुहातध्वनि होतो ब्रह्मस्थानि काये वर्णु तेथिल थोरि : देवाचें
निर्माल्य पातालिंहुनि तें अद्दापि येतें भुमिवरि : तेथुनि वंदिलि वेद माता महालक्ष्मि
कोल्हापुरि : पंचगंगा वरुणा :कृष्ण तेथें पुजियेलें श्रीहरि : कृष्णावेण्या संगमि :
स्नानें करुनियां नमन केलें मावळेस्वरि : संभुवेदिला पर्वतसिखरिं : मग मि पावलो
पम्धरि : भिमरेचे तिरि विठल उभा कर ज्याच्या कटावरि : ष्टि पुंडलिक बैसला
चंद्रभागासरोवरि लक्षोनि दोहिंकडे दोरु पिंगरुड ज्याचे समोरि : जिविचे अर्तृ पुरलें
आजि विठल धरुनि राहिलों अंतरि : पूर्वज उधरण तापत्रयहरण तें स्थान म्यां
वंदिलें : सिरि : नामा म्हणे माझे सकळ मनोरथ पुरले देखोनि पंढरि : || १४ ||
माझा स्वामि तो विठल हरि : पैल पाहा पंढरपुरि : उभा देहुडां विटेवरि :
समचरण ज्याच्या करकटावरि : माझा स्वामि तो विठल हरि : पैल पाहपां
पंढरपुरि तिर्थवळि संपुर्णमस्तु : सके १५०३ | राक्षससंवत्सरे भाद्रपद शुध्द S सप्तमिस
संपुर्णमस्तु : भोस्तु : ||

                                   श्री नामदेव गाथा
. . .

श्री नामदेव गाथा

                                      ॐ
                               श्री नामदेव गाथा
                                 परिशिष्ट ‘ ब ‘
                           अप्रकाशित अभंग
                                परिसा
                                 भागवत

[ ५४८ ]
आषाढ शुध्द एकादशी | नामा विणवी विठ्ठलासी |
आज्ञा द्दावी वो मजसि | समाधी विश्रांती लागीं || १ ||
आयुष्य कळसासिं आलें | अभंग सिद्धी (शिध्दी) नेले |
ज्ञानेश्वर संगती घडलें | तीर्थ मिसें जगद्रोध्हरण || २ ||
जन्मा आलियाचें कृत्य | जना लावाये सुपंथ |
विठ्ठल मंत्र त्रिभुवनांत | जग जानत महिमा हे || ३ ||
सर्व सिद्धी मनोरथ | तुझेनि कृपें पावलों समस्त
म्हणे परीस भागवत | नामा नाम जपतसे || ४ ||

                                श्री नामदेव गाथा
. . .

%d bloggers like this: