साबुदाणा चं थालीपीठ
ॐ
साबुदाणा चं थालीपीठ
साबुदाणा चं थालीपीठ : साबुदाणा एक भांडभर पातेल्यात घेतला.
साबुदाणा धुतला ४ /५ तास चार / पाच तास भिजवू दिला. चार पाच छोटे
गॅस पेटवून बटाटे कुकर मध्ये पाणी घालून चार / पाच शिट्या दिल्या.
गॅस बंद केला कुकर गार झ्या नंतर उकडलेले बटाटे पातेल्यात काढले.
बटाटाची साल काढली. बटाटा मध्ये भिजलेला साबुदाणा थोडा घातला .
शेंगदाणे याचा कूट अर्धी वाटी घातला.हिरवी मिरची दोन वाटलेली घातली
मीठ चवी पुरत घातलं.साबुदाणा बटाटा शेंगदाणे कूट हिरवी मिरची मीठ सर्व
छान एकत्र हाताने केले.खर तर करण्याची सवय इतकी झाली की माप घ्यावयाची
गरज च नसते.अंदाजाने सवय खूप झाली आहे तरी अंदाजाने मापं लिहित आहे.
सर्व साबुदाणा थालीपीठ याचं एकत्र केलेले केलेलं लोखंडी तवावर तूप लावून साबुदाणा
थालीपीठ च सारण थापले.गॅस पेटवून दोन्ही बाजूने भाजले.गॅस बंद केला बरोबर
शेंगदाणे कूट वाटलेली हिरवी मिरची मीठ दही एकत्र केलेले ठेवले.अशा प्रकारे
साबुदाणा थालीपीठ व दही मिरची मीठ खाण्यास दिले.मी लोखंडी तवा वरील वरच
साबुदाणा थालीपीठ दाखवीत आहे.