आपले स्वागत आहे!

Archive for जून 3, 2012

महात्मा


महात्मा
जन्मभर स्वत:साठी
कांही ठेउन न घेता
मागणाऱ्यांना सर्वकांही ‘
नुसते देत गेला
आयुष्यभर त्याला कांही
चुकून – कमी नाही पडले
आभाळाने स्वत: च
त्यावर सावली धरली संपूर्ण
आणि त्याच्या यशाची गुढी
नेली सुर्यापार
शेवटी इश्र्वाराने आत्मा
मागितल्यावर
तोही सहज देऊन टाकला
‘ कितिवेळ हे ओझे
मी सांभाळत राहू ‘ म्हणून
दहाव्या दिशेच्या मस्तकावर
पाउल ठेउन ठाम उभे राहून
‘ हसत हंसत एक पाउल
नुसते पुढे टाकले
अन
चतुर्थीचा चंद्र होउन
प्रकाशात राहिला
अवघे चराचर
कार्तिक वद्द , ४, १९१०
२६.११.१९८८
श्रीकांत CHIVATE

मीलन

                                   ॐ
मीलन
भाळावर रेखून सूर्य गोल लालसा छान
ही उषा हांसते हरवून अपले भान
चांदणी चमकते .. उमलत्या रम्य सकाळी
अन् कल्या जागती .. उरात स्वप्ने भोळी

मधुगंध पसरतो अवीट दाही दिशांत
हा धुंद पवन जो चौखूर आकाशांत
रात रती रमलेली उषा होऊनी चूर
झुकविते मान अन् जपत मनी लकेर

तो ऐटीत मागून डोकावे रविराज
दो डोळे करती उभयातात कि हितगूज
हरवते नीज अन् रेंगाळत लाली गाली
– आभाळ उतरते जणू भूमीवर खाली
श्रीकांत चिवटे
५.१.१९६७

%d bloggers like this: