आपले स्वागत आहे!

Archive for जून 7, 2012

येशू

                               ॐ
येशू :मग सहा दिवसांनंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ
योहान यांग आपणा बरोबर एक उंच डोंगरावर एकांती नेले.
म्हणजे तथे ते प्राथना करू शकतील. आणि तो प्रार्थना
करीत असता, त्याचे रूप त्यांच्या देखता पालटलें; त्याचें मुख
सुर्यासारखे तेजस्वी झालें आणि त्याची वस्त्रें प्रकाशासारखी शुभ्र
झाली.
आणि पहा मोशे व एलिया हे दोघे जण त्याज बरोबर संभाषण करीत होते.
ते तेजोमय दिसले, आणि तो जें आपले निर्याण यरूशलेमात पूर्ण करणार होता
त्या विषयीं ते बोलत होते.तेंव्हा मेघातून अशी वाणी झाली की ” हा माझा प्रिय पुत्र ,
माझा निवडलेला आहे,याचे तुम्ही ऐका.”हे ऐकून शिष्य पालथे पडले व फार भयभीत झाले.
येशूने जवळ येऊन त्यांस स्पर्श करून म्हटलें,उठा,भीऊं नका.तेंव्हा त्यांनी डोळे वर करून
पाहिलें तो येशू शिवाय कोणी त्यांच्या दृष्टिस पडला नाही

                                 DSCF0533

%d bloggers like this: