आपले स्वागत आहे!

Archive for जून 9, 2012

 

 

ब्रीज


टॉवरब्रीज : लंडनमधील हा पूल जगभरातील पर्यटकांच्या
आकर्षणाचे केंद्र आहे.एकोणीसाव्या शतकातील अखेरीस
‘ट्रॅफिक जाम’ सारख्या घटना होत नसतील असे आपल्याला
वाटू शकते,मात्र अशाच कारणामुळे लंडन ब्रीजला पर्याय म्हणून
या पुलाची निर्मिती करण्यात आली आर्किटेक सर होरॅस जोन्स
आणि इंजिनियर सर जॉन वुल्फ बेरी यांनी १८८६ मध्ये या पुलाचे
बांधकाम सुरु केले.१८९४ मध्ये तो वाहतुकी साठी खुला करण्यात आला.


चेंगयांग ब्रीज : चीन मधील डोंग समाजातील लोकांनी काही
‘वारे व पावसाचे पूल’ बांधले आहेत हा पूल ही त्यापैकीच आहे.
हे लोक सखल भागात राहत व त्यांना नेहमीच नदीच्या पुराचा
पुराचा सामना करावा लागे मात्र ते पूल बांधण्यात अतिशय कुशल
असल्याने त्यांनी अशा पुलांची निर्मिती करून आपले अस्तित्व टिकविले.
या पुलांवरून त्यांना नुसती नदी पार करता येत होती असे नव्हे तर या पुंलावर
ते राहूही शकत असत.या सर्व पुलांमध्ये हा चेंगयांग पूल अनेक बाबतीत
वैशिष्ट्य पूर्ण आहे. लिंक्सी नदीवर तो बांधलेला आहे

%d bloggers like this: