आपले स्वागत आहे!

Archive for जून 11, 2012

ॐ शान्ति : | शान्ति : | शान्ति : ||

ॐ भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा: |
भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा: ||
स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूभि: |
व्यशेम देवहितं यदायु: || १ ||
ॐ स्वस्ति न इन्द्रो वृध्दश्रवा: |
स्वस्ति न: पूषा विश्र्ववेदा: ||
स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि: |
स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु || २ ||
ॐ शान्ति : | शान्ति : | शान्ति : ||

अर्थ :
हे देवांनो ! आम्ही कानांनी शुभ ऐकावे. आम्ही डोळ्यांनी
पवित्र-मंगल पाहावे.स्थिर – उत्तम अवयवांनी व सुदृढ
शरीरांनी युक्त होऊन आम्ही तुमची उपासना व स्तुती करतच
तुम्ही – देवांनी दिलेले हे आयुष्य व्यतीत करावे. ( अशी आमची प्रार्थना आहे.) [ १ ]
तो महाकीर्तिमान इंद्र आमचे कल्याण करो. ज्ञानसंपन्न आणि
वैभवसंपन्न ‘पूषा ‘ देव आमचे कल्याण करो. ज्याच्या गतीला अडथळा नाही
असा तो आकाशात संचार करणारा देव आमचे कल्याण करो आणि तो
तो वाणीला अधिपती देवगुरु आम्हांला श्रेयस् प्राप्त करून देवो. [ २ ]

व्यक्तींमध्ये शांतता नांदो.
समाजात शांतता नांदो.
जगात सर्वत्र शांतता नांदो.
_____________________________

येशू

                                          ॐ
                                          येशू
येशूचे स्वर्गारोहण
नंतर त्यानें त्यांस बेथानी पर्यंत बाहेर नेलें, आणि हात वर
करून त्यांस आशीर्वाद दिला.मग असे झाले की तो त्यांस
आशीर्वाद देत असतां त्यांजपासून वेगळा झाला आणि सर्गात
वर घेतला गेला.आणि मेघानें त्याला त्यांच्या दृष्टीआड केले.
तो जात असतां ते आकाशाकडे निरखून पाहत होते, पाहा, शुभ्र वस्त्रे
परिधान केलेले दोन पुरुष त्यांच्या जवळ उभे होते, ते म्हणाले,
” अहो गालील करांनो, तुम्ही आकाशाकडे कां पाहत उभे राहिला ?
तुम्हांपासून वर आकाशांत घेतला गेला आहे तोच येशू,, जसे तुम्हीं
त्याला आकाशांत जाता पाहिले तसाच येईल. या प्रमाणे प्रभू येशू
त्यांजबरोबर बोलल्या नंतर वर स्वर्गात घेतला गेला, आणि देवाच्या
उजवीकडे बसला.
तेंव्हा ते त्याला नमन करून मोठ्या आनंदाने यरुशलेमांस
माघारे गेले.आणि ते मंदिरांत देवाचा धन्यवाद नित्य करीत राहिले.

               DSCF0533

%d bloggers like this: