आपले स्वागत आहे!

Archive for जून 15, 2012

जवस व कारले चटणी

जवस व कारले याची चटणी : जवस लाल असतात.कारले काळे असतात. मी जवस व कारले पाव पाव किलो आणले २५ पंचवीस रुपये पाव किलो मिळाले.दोन्ही २५ / २५ रुपये. पातेल्यात थोडे जवस घेतले. गॅस पेटवून जवस याचे पातेले ठेवले जवस उडे पर्यंत जवस भाजले.ते पातेले तसेच ठेवले दुसऱ्या पातेल्यात कारले थोडे घेतले. ते पण गॅस पेटवून कारले चे पातेले ठेवले उडे पर्यंत कारले भाजले. मिक्सर मध्ये प्रथम जवस घातले लाल तिखट मीठ घातले चांगले भाजलेले जवस लाल तिखट मीठ एकत्र करून मिक्सर चालू केला पूड झाल्या नतंर मिक्सर बंद केला बाउल मध्ये जवस याची चटणी काढली.भाजलेले कारले मिक्सर मध्ये घातले त्यात पण लाल तिखट मीठ घातले मिक्सर चालू केला भाजलेले कारले लाल तिखा मीठ सर्व एकत्र पूड झाली कारले याची चटणी तयार झाली.कारले याची चटणी बाउल मध्ये काढली. फोटो छायाचित्र काढले जवस कारले चटणीचे !नतंर काचेच्या बरणीत भरून ठेवले भरपूर दिवस अशा चटण्या राहतात.तेल घालून चवी साठी खातात.

 

मनाचे श्लोक व करुणाष्टके

               ॐ
मनाचे श्लोक व करुणाष्टके
( मराठी )
मना पापसंकल्प सोडोनि द्दावा |
मना सत्यसंकल्प जीवीं धरावा |
मना कल्पना ते नको विषयांची |
विकारें घडे हो जनीं सर्व ची ची || ५ ||
नको रे मना क्रोध हा खेदकारी |
नको मना काम नाना विकारी |
नको रे मदा सर्वदा अंगिकारू |
नको रे मना मत्सरू दंभ भारू || ६ ||
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावें |
मना बोलणें नीच सोसीत जावें
स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावें |
मना सर्व लोकांसि रे नीनवावें || ७ ||

%d bloggers like this: