आपले स्वागत आहे!

Archive for जून 19, 2012

ज्योतिर्लिंग ४ – अमरेश्वर

ओंकारेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगा पैकी चौथे ज्योतिर्लिंग. शिवपुरी ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नर्मदा नदीच्या काठावरील एका बेटावर हे ज्योतिर्लिंग वसले आहे. ह्या बेटाचा आकार ॐ अक्षरा सारखा आहे असे म्हणतात.

इथे दोन देवळे आहेत. एक भगवान ओंकारेश्वर याचे. ओंकारेश्वर म्हणजे ॐ ह्या आवाजाचा ईश्वर. ॐ हे एक पवित्र अक्षर आहे, शक्यतो प्रार्थने नंतर याचे उच्चारण करतात. ॐ ह्या पवित्र अक्षराला प्रणव असेही म्हणतात.

दुसरे देऊळ अमरेश्वर ह्या शिव रूपाचे आहे. अमरेश्वर म्हणजे अमरत्व चे भगवान.

%d bloggers like this: