आपले स्वागत आहे!

Archive for जून 23, 2012

ज्योतिर्लिंग ८ – त्रंबकेश्वर

महाराष्ट्रातील नाशिक जवळ त्रंबक गावात गोदावरी काठी त्रंबकेश्वर चे प्रसिध्द ज्योतिर्लिंग आहे. गोदावरी हि भारतातील सर्वात मोठी नदी. त्रंबकेश्वर नाशिक पासून अतिशय सहज जाण्या सारखे आहे.

त्रंबकेश्वर मधील लिंगा मध्ये आणखीन तीन लिंगं आहेत. त्यांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश असे मानतात. हे तीन देव इथे वसले म्हणून नाव त्रंबकेश्वर. हि जागा गजबजलेली आहे, आणि दर्शन घेण्यास वेळ लागू शकतो पण अतिशय उत्साहवर्धक वातावरण आहे.

आम्ही पहिल्यांदी महाकुंभ येथे हात पाय ओले केले, येथे दर १२ वर्षांनी शिव पूजक एकत्र जमतात. महाकुंभातील पाणी गोदावरी च्या उगमस्थाना पासून येते असे म्हणतात.

नंतर केदारेश्वराचे दर्शन घेतले. केदारेश्वराच्या बाबतीत ५ व्या ज्योतिलिंग ह्या ब्लॉग मध्ये लिहिले होते. त्या केदारेश्वराची प्रतिमा त्रंबकेश्वर येथे आहे. नंतर चिंतामणी पाषाण (गणपती) चे दर्शन घेऊन त्रंबकेश्वर चे मनापासून दर्शन झाले.

%d bloggers like this: