आपले स्वागत आहे!

Archive for जून 26, 2012

ज्योतिर्लिंग ११ – वैजनाथ

परळी वैजनाथ येथील वैजनाथ शिव मंदिर हे ११ वे ज्योतिर्लिंग आहे. अगदी प्रसन्न वातावरण आहे, मुख्य मंदिरा कडे जाताना थोड्या पायऱ्या चढून जावे लागते. मंदिरा च्य जवळच एक सुंदर असे छोटे दुसरे गोलाकार शिव मंदिर असून मध्यभागी लिंग आहे. अगदी छान गाभारा आहे.

वीरशैव समाजाने बांधलेल्या ह्या मंदिर वीरभद्र ची एक मोठी मूर्ती सुध्धा आहे. जेंव्हा आपल्या वडिलांकडून यज्ञाचे निमंत्रण शिव व सती यांना मिळाले नाही, तेंव्हा सती ने रागाच्या भरात यज्ञात उडी घेतली. हे ऐकून, रागावलेल्या शिवाने आपला एक केस उपटून जमिनीवर फेकला व त्यातून वीरभद्र, शिवाच्या रागाचे प्रतीक म्हणून निर्माण झाला. अशी आख्याईका आहे.

शिव शिव!

%d bloggers like this: