आपले स्वागत आहे!

Archive for जून 27, 2012

ब्लॉग पोस्ट ६७९ वा !

ब्लॉग पोस्ट ६७९ वा : माझा ब्लॉग पोस्ट दिनांक तारीख २७ जून (६) २०१२ साल ला
वार बुधवार ला ६७९ सहाशे एकूण ऐंशी वा ब्लॉग पोस्ट होत आहे.खरचं खूप लिखाण
करायला मिळाले आहे. मला ! १२ ज्योतिर्लिंग खेळ श्री नामदेव गाथा येशू ब्रिज वटपौर्णिमा
शनीप्रदोष एकादशी फादर्स डे मदर डे खिचडी अशा वेगवेगळ्या प्रकार ची माहिती ब्लॉग मध्ये
लिहिली आहे. वाचन करून लिहिली त्यामुळे खूप लक्षात राहते.संगणक मध्ये एवढी माहिती एका
ब्लॉग मराठी त आहे हे वासुधालय ब्लॉग ला महत्व आहे वैशिष्ठ आहे. आपण सर्वांनी ब्लॉग वाचन केले.
प्रतिक्रिया दिल्यात भेटी पण दिल्यात त्या बध्दल धन्यवाद ! धंयवाद !
हा ब्लॉग लिही पर्यंतच्या भेटी : ५५,७२९

DSCF2667

गंगापूजन

गं गा पू ज न –
गंगापूजन :
मान सरोवर हृदयांत वसते गात्रांत स्फूर्ति अणू
डोळ्यांतून दोन झरती धाराच गंगा म्हणू.
हाती दोन नित्य वसुधा ‘ साकार ‘ अन् ‘ सुधीर ‘
मस्तकी उन्नत त्या तिथेच समजा ‘ विश्वातला ईश्वर ‘
मी कोण हे मला उमजणे होवो निया उन्मत
यात्रा या चार धामच बघा हेच गंगापूजन
२ . २ . १९६८ कोल्हापूर श्रीकांत चिवट

अक्का आक्का माझ्या आत्येसासूबाई त्या वेळेला रेल्वेने यात्रा करून आल्या होत्या. त्यावेळेला गंगापूजन मी व हे ह्यांनी गंगापूजन केले. होते. त्याची आठवण आहे.झाली.
आता माझ्या ब्लॉग १२ ज्योतिर्लिंग याची माहिती लिहिली आहे.म्हणून परत गंगापूजन लिहिले आहे. १२ ज्योतिर्लिंग याची माहिती लिहितांना मुलांनी खूप मदत केली आहे संगणक मधून शोधून लिहिली आहे, देव कृपेने माझे महाराष्ट्रातील सर्व ज्योतिर्लिंगांचे दर्शन झाले आहे, त्या ज्योतिर्लिंग बद्धल स्वतः च्या अनुभवातून लिहिले.


DSCF1953


DSCF1953

ज्योतिर्लिंग १२ – औंढा नागनाथ

हिंगोली जिल्ह्यात मधील औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचा अनुभव अगदी विस्मयकारी होता. लिंग जमिनीच्या खाली स्थापन करण्यात आले आहे. लिंग पर्यंत जाण्यासाठी वाकून ३-४ पायऱ्या उतरून जावे लागते. खाली गेल्यावर देव दर्शन साठी व बसण्यासाठी छोटीशी गुहे सारखी जागा आहे. मन अगदी पवित्र होते. ही जागा स्वतः जाऊन अनुभवण्यास पाहिजे.

नागनाथ म्हणजे नागांचा देवता. मनुष्याची कुंडलिनी योनी हि एका सर्प  सारखी मानली जाते. कुंडलिनीतील उर्जा व सर्प यांचा देवता म्हणजे नागनाथ.

आत्ता पर्यंत दर्शन झालेले सर्व ज्योतिर्लिंग यांचा अनुभव अगदी संस्मरणीय व पवित्रात्मक होता. देव कृपेने सर्व दर्शन व लिखाण पार पडले.

शिवो हं… शिवो हं!

%d bloggers like this: