आपले स्वागत आहे!

Archive for जून 29, 2012

करुणाष्टके

                   ॐ
|| श्रीहरि: ||
श्रीसमर्थ रामदासस्वामीविरचित
करुणाष्टके ( मराठी )
जळत हृदय माझें जन्म कोट्यानुकोटी |
माजवरि करुणेचा राघवा पूर लोटीं |
तळमळ निववीं रे राम कारुण्यासिंधु |
षडरिपुकुळ माझें तोडिं याचा विरोधु || ६ ||
तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी |
सिणत-सिणत पोटीं पाहिली वाट तुझी |
झडकरि झड घालीं धांव पंचानना रे |
तुजविण मज जंबुकी वासणारे रे || ७ ||
सबळ जनक माझा राम लावण्यपेटी |
म्हणउनि मज पोटीं लागली आस मोठी |
दिवस गणित बोटीं प्राण ठेउनी कंठी |
अवचट मज भेटी होत घालीन मिठी || ८ ||
जननि -जनकमाया लेंकरुं काय जाणे |
पय न लगत मूखें हाणतां वत्स नेणे ||
जळधरकण आशा लागली चातकासी |
हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी || ९ ||

        DSCF2660

%d bloggers like this: