आपले स्वागत आहे!

Archive for जुलै, 2012

मनाचे श्लोक

   ॐ

|| श्रीहरि: ||
श्रीसमर्थरामदासस्वामीविरचित
मनाचे श्लोक
जगीं व्दादशादीत्य हे रुद्र आक्रा |
असंख्यात संख्या करी कोण शक्रा |
जगीं देव धुंडाळितां आढळेना |
जनीं मुख्य तो कैसा कळेना || १७६ ||
तुटेना फुटेना कदा देवराणा |
चळेना ढळेना कदा दैन्यवाणा |
कळेना कळेना कदा लोचनासी |
वसेना दिसेना जगीं मीपणासी || १७७ ||
जया मानला देव तो पूजिताहे |
परी देव शोधूनि कोण्ही न पाहे |
जगीं पाहतां देव कोट्यानकोटी |
जया मानली भक्ति जे तेचि मोठी || १७८ ||
तिन्ही लोक जेथूनि निर्माण जाले |
तया देवरायासि कोण्ही न बोले |
जगीं थोरला देव तो चोरलासे |
गुरुवीण तो सर्वथा हीं न दीसे ||१७९ ||

गुरु पाहतां पाहतां लक्ष कोटी |
बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी |
मनीं कामना चेटकें धातमाता |
जनीं वेर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता || १८० ||
नव्हे चेटकी चाळकु द्रव्यभोंदु |
नव्हे निंदकु मछरु भक्तिमंदु |
नव्हे उन्मतु वेसनी संगबाधु |
जगीं ज्ञानिया तो चि अगाधु || १८१ ||
नव्हे वाउगी चाहुटी काम पोटी |
क्रियेवीण वाचाळता ते चि मोठी |
मुखें बोलीयासारखें चालताहे |
मना सद्गुरु तो चि शोधूनि पाहे |
जनीं भक्त ज्ञानी विवेकी विरागी |
कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी |
प्रभु दक्ष वित्पन्न चातुर्य जाणे |
तयाचेन योगें समाधान बाणे || १८३ ||

दिवे

दिवे वेग वेगळे, पण सर्वांचा प्रकाश एकच!

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर 
दक्षिनायन वर्षाऋतु नक्षत्र मूळ राशिप्रवेश धनु 
श्रावण शुक्लपक्ष सोमवार १२ सोमप्रदोष आहे.
श्रावण महिना तील दुसरा सोमवार आहे.व शुक्लपक्ष 
मधील पहिला प्रदोष सोमवार आहे.म्हणून दिवा याचा छान 
फोटो छायाचित्र मिळाले आहे.ते पाहण्यास नक्कीच आवडेल !
तसेच तारीख दिनांक ३० जुलै (७ ) २०१२ साल आहे. शिवमुष्टि 
(तीळ) आहे.अख्खे तीळ महादेव शिव हयांना वाहतात.

मनाचे श्लोक

    ॐ
|| श्रीहरि: ||
श्रीसमर्थरामदासस्वामीविरचित
मनाचे श्लोक ( मराठी )
करी वृत्ति जो संत तो संत जाणा |
दुराशागुणें जो नव्हे दैन्यवाणा |
उपाधी देहेबुधितें वाढवीते |
परी सज्जना केवि बाधूं शके ते || १६८ ||
नसे अंत आनंत संता पुसावा |
अहंकार विस्तार हा नीरसावा |
गुणेंवीण निर्गूण तो आठवावा |
देहेबुधिचा आठऊं नाठवावा || १६९ ||
देहेबुधि हे ज्ञानबोधें तजावी |
विवेकें तये वस्तुची भेटि घ्यावी |
तदाकार हे वृत्ति नाहीं स्वभावें |
म्हणोनी सदा तें चि शोधीत जावें ||१७० ||
असे सार साचार तें चोरलेंसे |
येहीं लोचनीं पाहतां दृश्य भासे |
निराभास निर्गूण तें आकळेना |
अहंता कल्पितां हीं कळेना || १७१ || स्फुरे विषयीं कल्पना ते अविद्दा |
स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुचिता |
मुळीं कल्पना दों रूपें ते चि जाली |
विवेकें तरी सस्वरूपीं मिळाली || १७२ ||
स्वरूपीं उदेला अहंकार राहो |
तेणें सर्व आछ्यादिलें व्योम पाहों |
दिशा पाहतां ते निशा वाढताहे |
विवेकें विचारें विवंचूनि पाहे || १७३ ||
जया चक्षुनें लक्षितां लक्षवेना |
भवा भक्षितां रक्षितां रक्षवेना |
क्षयातीत तो आक्षै मोक्ष देता |
दयादक्ष तो साक्षिनें पक्ष घेतो || १७४ ||
विधी निर्मितां लिहितो सर्व भाळीं |
परी लिहिता कोण त्याचे कपाळीं |
हरू जाळितो लोक संव्हारकाळीं |
परी शेवटी शंकरा कोण जाळी || १७५ ||

श्रावण


श्रावण
श्रावण आले
किती उंच बांधले
पोरींनी हिंदोळे
श्रावण आले
घन आनंदले
तेज धुंद झाले
हिरव्या राईने
गाणे गायिले –
धुंद गंध हवा
धुंद अर्थ नवा
नव्या पावसाने
ऊन्हपाहीले –
वाऱ्याने गायिला
सुंगधितराणा
नवा अर्थ येई
हिरव्या सुरांना
गोड स्वप्न कसे चाफ्याला पडले
श्रावण आले
श्रीकांत
७.८.१९६७.
पुणे

मनाचे श्लोक

     ॐ
|| श्रीहरि: ||
श्रीसमर्थ रामदासस्वामीविरचित
मनाचे श्लोक ( मराठी )
नको रे मना वाद हा खेदकारी |
नको रे मना भेद नाना विकारी |
नको रे मना सीकऊं पूढिलांसि |
अहंभाव जो राहिला तूजपासीं || १६० ||
अहंतागुणें सर्व ही दुख होतें |
मुखें बोलिलें ज्ञान तें व्यर्थ जातें |
सुखी राहतां सर्व ही सूख आहे |
अहंता तुझी तूं चि शोधूनि पाहें || १६१ ||
अहंतागुणें नीति सांडी विवेकी |
अनीतीबळें श्लाघ्यता सर्व लोकीं |
परी अंतरी सर्व ही साक्ष येते |
प्रमाणांतरें बुद्धि सांडूनि जाते || १६२ ||
देहेबुधिचा निश्र्चयो दृढ जाला |
देह्यातीत तें हीत सांडीत गेला |
देहेबुधि ते आत्मबुद्धी करावी |
सदा संगती सज्जनाची धरावी || १६३ || मनें कल्पिता वीषयो सोडवावा |
मनें देव निर्गूण तो वोळखावा |
मनें कल्पितां कल्पना ते सरावी |
सदा संगती सज्जनाची धरावी || १६४ ||
देह्यातील प्रपंच हा चिंतियेला |
परी अंतरी लोभ निश्र्चीत ठेला |
हरीचिंतनें मुक्तिकांता वरावी |
सदा संगती सज्जनाची धरावी || १६५ ||
अहंकार विस्तारला या देह्याचा |
स्त्रियापुत्रमित्रादिकें मोह त्यांचा |
बळें भ्रांति हे जन्मचिंता हरावी |
सदा संगती सज्जनाची धरावी || १६६ ||
बरा निश्र्च्यो शाश्र्वताचा करावा |
म्हणे दास संदेह तो विसरावा |
घडीने घडी सार्थकाची करावी |
सदा संगती सज्जनाची धरावी || १६७ ||

मनाचे श्लोक

|| श्रीहरि: ||
श्रीसमर्थ रामदासस्वामीविरचित
मनाचे श्लोक ( मराठी )
बहूतां परी कूसरी तत्वझाडा |
परी पाहिजे अंतरी तो निवाडा |
मना सार साचार तें वेगळें रे |
समस्तांमध्यें येक तें आगळें रे || १५२ ||
नव्हें पिंडज्ञानें नव्हे तत्वज्ञानें |
समाधान कांहीं नव्हे तानमानें |
नव्हे योगयागें नव्हे भोगत्यागें |
समाधान ते सज्जनाचेनि योगें || १५३ ||
महांवाक्य तत्वादिक पंचिकणें |
खुणें पाविजे संतसंगे विवणें |
व्दितियेसि संकेत जो दाविजेतो |
तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो || १५४ ||
दिसेना जनीं तें चि शोधूनि पाहें |
बरें पाहतां गूज तेथें चि आहे |
करीं घेउं जातां कदा आडळेना |
जनीं सर्व कोंदाटलें तें कळेना || १५५ ||म्हणे जानता तो जनीं मूर्ख पाहे |
अतर्कासि तर्की असा कोण आहे |
जनीं मीपणें पाहतां पाहवेना |
तया लक्षितां वेगळें राहवेना || १५६ ||
बहू शास्त्र धुंडाळितां वाड आहे |
जया निश्र्चयो येक तो ही न साहे |
मती भांडती शास्त्रबोधे विरोधें |
गती खुंटली ज्ञानबोधें प्रबोधें || १५७ ||
श्रुति न्याय मीमांसकें तर्कशास्त्रें |
स्मृती वेद वेदांतवाक्यें विचित्रें |
स्वयें शेष मौनावला स्थीर पाहे |
मना सर्व जाणीव सांडून राहे || १५८ ||
जेणें मक्षिका भक्षिली जाणिवेची |
तया भोजनाची रुची प्राप्ति कैची |
अहंभाव ज्या मानसींचा विरेना |
तया ज्ञान हें अन्न पोटीं जिरेना || १५९ ||

प्रयत्न !

                                                ॐ
जेंव्हा व्यक्तिला खूप पैसा हवा वाटतो .आरामात शानदार मजेत रहावे वाटते.
घरात नवीन वस्तु पाहिजे वाटतात .खूप सोन सुंदर सुंदर कपडे हवे वाततात.बसून
आराम करावा वाततो.सर्व मिळाल समजा तर व्यक्ती कांही मिळविण्या करता धडपडच
करणार नाही.अभ्यास करून संशोधन करणार नाही.मग वेळ जाणार कसा.अभ्यास करून
पास होणे पदवी उच्च स्थान मिळविण्या करता व्यक्तीने धडपड करून मिळविले की त्यातील
समाधान भरलेलं असतं .हे नक्कीच .हे सहज व संत पण सांगतात.प्रत्येक व्यक्ती आपल्या
ताकदी ने काम करून जे आपणास पाहिजे ते मिळवितो.त्यात समाधान व आनंदी राहतो.
दुसरा खूप शिकला तरी कमी शिकलेला आहे त्यात खुश असतो.आपण जे काम करतो ते
मना पासून करतो बरोबर करतो म्हणून समाधानी असतो.ईतर वस्तू चे पण तसेच आहे.
खूप प्रकारे वेगवेगळ्या पध्दती ने व्यक्ती राहतात.आनंद आनंदी राहतात.समाधान समाधानी राहतात.
हे नक्कीच.नवीन शिकण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच करतात.

मनाचे श्लोक


|| श्रीहरि: ||
श्रीसमर्थ रामदासस्वामीविरचित
मनाचे श्लोक ( मराठी )
जगीं पाहतां साच तें काय आहे |
अती आदरें सत्य शोधूनि पाहें
पुढें पाहतां पाहतां देव जोडे |
भ्रमें भ्रांति अज्ञान हें सर्व मोडे || १४४ ||
सदा विषयो चितिंतां जीव जाला |
अहंभाव अज्ञान जन्मासि आला |
विवेकें सदा स्वस्वरूपीं भरावें |
जिवा ऊगमीं जन्म नाहीं स्वभावें || १४५ ||
दिसे लोचनीं तें नसे कल्पकोडी |
अकस्मात आकारलें काम मोडी |
पुढें सर्व जाईल कांहीं न राहे |
मना संत आनंत शोधूनि पाहें || १४६ ||
फुटेना तुटेना चळेना ढळेना |
सदा संचलें मीपणें तें कळेना |
तया एकरूपासि दूजें न साहे |
मना संत आनंत शोधूनि पाहें || १४७ || निराकार आधार ब्रह्मादिकांचा |
जया सांगता सीणली वेदवाचा |
विवेकें तदाकार होऊनि राहें |
मना संत आनंत शोधूनि पाहें || १४८ ||
जगीं पाहतां चर्मचक्षीं न लक्षे |
जगीं पाहतां ज्ञानचक्षीं न रक्षे |
जगीं पाहतां पाहणें जात आहे |
मना संत आनंत शोधूनि पाहें || १४९ ||
नसे पीत श्र्वेत ना शाम कांहीं |
नसे वेक्त आवेक्त ना नीळ नाहीं |
म्हणे दास विश्र्वासतां मुक्ति लाहे |
मना संत आनंत शोधूनि पाहें || १५० ||
खरें शोधितां शोधितां शोधताहे |
मना बोधितां बोधितां बोधताहे |
परी सर्व ही सज्जनाचेनि योगें |
बरा निश्र्चयो पाविजे सानुरागें || १५१ ||

मनाचे श्लोक


|| श्रीहरि: ||
श्रीसमर्थ रामदास्वामीविरचित
मनाचे श्लोक (मराठी)
भयें व्यापिलें सर्व भ्रह्मांड आहे |
भयाभीत तें संत आनंत पाहें |
जया पाहतां व्दैत काहीं दिसेना |
भय मानसीं सर्वथा ही असेना || १३६ ||
जिवां श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले |
परी जीव अज्ञान तैसेचि ठेले |
देहेबुधिचें कर्म खोटें टळेना |
जुनें ठेवणें मीपणें आकळेना || १३७ ||
भ्रमें नाडळे वीत ते गुप्त जालें |
जिवा जन्मदारिद्र टाकूनि आलें |
देहेबुधिचा निश्र्चयो ज्या टळेना |
जुनें ठेवणें मीपणें आकळेना || १३८ ||
पुढें पाहतां सर्व ही कोंदलेंसे |
अभाग्यास हें दृश्य पाषाण भासे |
अभावें कदा पुण्य गांठी पडेना |
जुनें ठेवणें मीपणें आकळेना || १३९ || जयाचें तया चूकलें प्राप्त नाहीं |
गुणें गोविलें जाहलें दुख देहीं |
गुणावेगळी वृत्ति ते ही वळेना |
जुनें ठेवणें मीपणें आकळेना || १४० ||
म्हणे दास सायास त्याचे करावे |
जनीं जाणता पाय त्याचे धरावे |
गुरुअंजनेंवीण तें आकळेना |
जुनें ठेवणें मीपणें तें कळेना || १४१ ||
कळेना कळेना कळेना ढळेना |
ढळे नाढळे संशयो ही ढळेना |
गळेना गळेना अहंता गळेना |
बळें आकळेना मिळेना मिळेना || १४२ ||
अविद्दागुणें मानावा ऊमजेना |
भ्रमें चूकलें हीत तें आकळेना |
परीक्षेविणें बांधलें दृढ नाणें |
परी सत्य मिथ्या असें कोण जाणे || १४३ ||

मटकी ची उसळ

                                                  ॐ
मटकी ची उसळ : १०० ग्रॅम मटकी आणली आठ (८ ) रुपये पावशेर मिळाली.
दिवस व रात्र चोवीस तास (घंटा) भिजत पाण्यात पातेल्यात भिजत ठेवली.
दुसरे दिवस मटकी चांगली भिजली.चाळणीत भिजलेली मटकी घातली.टाकली.
मटकी तले पाणी सर्व काढून टाकले.एका स्वछ कपड्यात भिजलेली मटकी घातली.
बांधून ठेवली.दुसरे दिवस ला मटकी ला छान चांगलेच मोड आलेत.मोड आलेली
मटकी मध्ये कच्चे शेंगदाने मुठ भर घातले.गॅस पेटवून पातेले ठेवले.पातेल्यात तेल
मोहरीची फोडणी केली दिली.फोडणीत भिजलेली मोड आलेली मटकी व कच्चे मुठभर
शेंगदाने घातले.भांडभर पाणी मटकी शेंगदाने ह्यात घातले.झाकण ठेवून मोडआलेली
मटकी व कच्चे शेंगदाने शिजवू दिले.चांगलेच शिजले.त्यात मीठ,लाल तिखट ,हळद,हिंग
घातले. घातला.परत मोड आलेली मटकी,कच्चे शेंगदाने,मीठ,तिखट.हळद,हिंग शिजवीले.
चांगली चं वाफ आणून थोडे उसळीत पाणी ठेवले.अशा प्रकारे मटकी ची उसळ घरी मोड आणून
तयार केली. मी !

               DSCF2697    DSCF2699

मनाचे श्लोक

     ॐ
|| श्रीहरि: ||
श्रीसमर्थ रामदासस्वामीविरचित
मनाचे श्लोक ( मराठी )
मना वासना वासुदेवीं वसों दे |
मना कामना कामसंगी नसों दे |
मना कल्पना वाउगी ते न कीजे |
मना सज्जना सज्जनीं वस्ति कीजे || १२८ ||
गतीकारणें संगती सज्जनाची |
मती पालते सूमती दुर्जनाची |
रतीनायिकेचा पती नष्ट आहे |
म्हणोनी मनातीत होऊनि राहें || १२९ ||
मना अल्प संकल्प तो ही नसावा |
मना सत्य संकल्प चित्तीं वसावा |
जनीं जल्प वीकल्प तो ही तजावा |
रमाकांत येकांतकाळी भाजावा || १३० ||
भजाया जनीं पाहतां राम येकु|
करी बाण येकु मुखीं शब्द येकु |
क्रिया पाहतां उधरे सर्व लोकु |
धारा जानकीनायकाचा विवेकु || १३१ || विचारुनि बोले विवंचूनि चाले |
तयाचेनि संतप्त ते ही निवाले |
बरें शोधिल्याविण बोलों नको हो |
जनीं चालणें शुध नेमस्त राहो || १३२ ||
हरीभक्त वीरक्त विज्ञानरासी |
जेणें मानसीं स्थापिलें निश्र्चयासी |
तया दर्शनें स्पर्शनें पुण्य जोडे |
तया भाषणें नष्ट संदेश मोडे || १३३ ||
नसे गर्व आंगी सदा वीतरागी |
क्षमा शांति भोगी दया दक्ष योगी |
नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा |
यहीं लक्षणीं जाणिजे योगिराणा || १३४ ||
धरीं रे मना संगती सज्जनाची |
जेणें वृत्ति हे पालटे दुर्जनाची |
बळें भाव सद्बुधि सन्मार्ग लागे |
महां क्रूर तो काळ विक्राळ भंगे || १३५ ||

मनाचे श्लोक

|| श्रीहरि: ||

श्रीसमर्थ रामदासस्वामीविरचित

मनाचे श्लोक ( मराठी )

विधीकारणें जाहला मछ वेगीं |
धरी कूर्म धरा पुष्टिभागीं |
जना रक्षणाकारणें नीच योनी |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी || १२० ||
महां भक्त प्रल्हाद हा कष्टवीला |
म्हणोनी तयाकारणें सिंह्य झाला |
न ये ज्वाळ वीपाळ संन्नीध कोण्ही |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी || १२१ ||
कृपा भाकितां जाहला वज्रपाणी |
तयाकारणें वामनु चक्रपाणी |
व्दिजांकारणें भार्गव च्यापापानी |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी || १२२ ||
अहिले सतीलागि आरण्यपंथे |
कुढावा पुढें देव बंदी तयातें |
बळें सोडितां घाव घाली निशाणी |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी || १२३ || तये द्रुपदीकारणें लागवेगें |
त्वरें धांवतु सर्व सांडूनी मागें |
कळीलागि जाला असे बोध्य मौनी |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी || १२४ ||
अनाथां दिनाकारणें जन्मताहे |
कलंकी पुढें देव होणार आहे |
जया वर्णितां सीणली वेदवाणी |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी || १२५ ||
जनाकारणें देव लीलावतारी |
बहूतांपरी आदरें वेषधारी |
तया नेणती ते जन पापरूपी |
दुरात्मे महां नष्ट चांडाळ पापी || १२६ ||
जगीं धन्य तो रामसूखें निवाला |
कथा ऐकतां सर्व तल्लीन जाला |
देहेभावना रामबोधें उडाली |
मनोवासना रामरूपीं बुडाली || १२७ ||

नागपंचमी

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर दक्षिणायन वर्षाऋतु श्रावण शुक्लपक्ष सोमवार ४/५ नक्षत्र पूर्वा रास कन्या नागपंचमी आहे. नवनागपुजन नागाची पूजा करतात. श्रावण सोमवार असल्यामुळे शिवमुष्टि (तांदुळ) महादेवाला वाहतात. घालतात. तसेच तारीख दिनांक २३ जुलै (७ ) २०१२ साल आहे. सोमवार आहे.

नागपंचमी असल्यामुळे भासक धान्य खातात. तवा, विळी, सुरी याचा वापर नागपंचमी चा दिवस म्हणून वापर करत नाहीत. शेतात नांगरणी व पेरणी झाल्यामुळे नाग बाहेर येतात. नागाची पूजा करतात. ज्वारीच्या लाह्या व दुध देतात. मी १० रुपये अर्धाशेर मापट लाह्या आणल्या. भट्टीची दुकान असतात.

तेथे खुप जणांनीज्वारीच्या लाह्या घेतल्या. प्लॅस्टिक पिशवीत बांधलेल्या मिळतात. मी कांही ज्वारीच्या लाह्याच मिक्सर मधून पीठ केले. ज्वारीच्या लाह्याच्या पिठात, हिरवी मिरची, मीठ, ताक, तेल मोहरीची फोडणी करून लाह्याच्या पिठात घातली. कांही लाह्या शेंगदाणे फोडणीत घातले मीठ,लाल तिखट, हळद घातली. फोडणी कोंबट झाल्या नंतर लाह्या घातल्या. गरम फोडणीत टाकले तर लाह्या आकसून बारीक होतात. पावसाला ऋतू मध्ये ज्वारीच्या लाह्या खातात.

DSCF2693  DSCF2694DSCF2695

श्रावण पौर्णिमा ला जसे भावाला बहिण राखी बांधणे याला महत्व आहे. तसेच नागपंचमीला बहिण भावाच्या पाठीवर हाताने काकडी फोडणे फोडण्याचा महत्व आहे. ती काकडी भाऊ बहिण खातात. का ते माहीत नाही.

मनाचे श्लोक


|| श्रीहरि ||
मनाचे श्लोक ( मराठी )
श्रीसमर्थरामदासस्वामीविरचित

जनीं सांगतां ऐकतां जन्म गेला |
परी वाद वेवाद तैसा चि ठेला |
उठे संशयो वाद हा दंभधारी |
तुटे वाद संवाद तो हीतकारी || ११२ ||
जनीं हीत पंडीत सांडीत गेले |
अहंतागुणें ब्रह्मराक्षेस जाले |
तयाहूंनि वित्पन्न तो कोण आहे |
मना सर्व जाणीव सांडूनि राहे || ११३ ||
फुकाचें मुखीं बोलतां काय वेचे |
दिसेंदीस अभ्यांतरी गर्व सांचे |
क्रियेवीण वाचाळता वेर्थ आहे |
विचारें तुझा तूं चि शोधून पाहें || ११४ ||
तुटे वाद संवाद तेथें करावा |
विवेकें अहंभाव हा पालटावा |
जनीं बोलण्यासारखें आचरावें |
क्रियापालटें भक्तिपंथे चि जावें || ११५ ||
बहू श्रापितां कष्टला अंबऋषी |
तयाचे स्वये श्रीहरी जन्म सोशी |
दिल्हा क्षीरसिंधू तया ऊपमानी |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी || ११६ ||
धुरू लेकरुं बापुडें दैन्यवाणें |
कृपा भाकितां दिधली भेटि जेणें |
चिरंजीव तारांगणीं प्रेमखाणी |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी || ११७ ||
गजेंद्रू महां संकटीं वास पाहे |
तयाकारणें श्रीहरी धांवताहे |
उडी घालती जाहला जीवदानी |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी || ११८ ||
अजामेळ पापी तया अंत आला |
कृपाळूपणें तो जनीं मुक्त केला |
अनाथासि आधार हा चक्रपाणी |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी || ११९ ||

 

 

 

रवा व बेसन याचे लाडु

रवा व बेसन याचे लाडु : अर्धा बाऊल पांढरा रवा घेतला. अर्धा बाऊल बेसन पीठ घेतले.
( हरबरा डाळीचे पीठ ). अर्धा बाऊल साखर घेतली.थोडे बदाम घेतले. जायफळ थोडे घेतले.
सादुक तूप अर्धा भांड घेतले.प्रथम गॅस पेटवून पातेल्यात रवा घातला.भाजून घेतला.

नंतर तूप सोडून भाजून घेतला.दुसऱ्या पातेल्यात तूप घातले.बेसन घातले.तूप बेसन एकत्र भाजले. नाही तर बेसन जळते.

रवा बेसन एकत्र केले.बदाम पूड केली.एका पातेल्यात साखरेचा पाक केला.साखर व साखर भिजेल असे पाणी घातले.टाकले.पाक चांगला झाला. साखर च्या पाकात रवा भाजलेला, बेसन भाजलेले, बदाम पूड,जायफळ सर्व एकत्र केले.

त्याचे गरम कोंबट चं लाडू वळले. तयार केले.बेसन व रवा याचे लाडू पण चांगले लागतात.कोणी कोणी खोबर फार खात नाहीत.म्हणून असे रवा व बेसन साखर याचा पाक करून लाडू करतात. हैद्राबाद हेदराबाद मराठवाडा येथे असे लाडू करतात.

 

मनाचे श्लोक


|| श्रीहरि: ||
मनाचे श्लोक ( मराठी )
|| श्रीसमर्थ रामदासस्वामीविरचित

क्रियेवीण नानापरी बोलिजेतें |
परी चीत दुश्र्चीत तें लाजवीतें |
मना कल्पना धीट सैराट धावे |
तया मानवा देव कैसेनि पावे || १०४ ||
विवेकें क्रिया आपुली पालटावी |
अती आदरें शुध क्रिया धरावी |
जनीं बोलण्यासारिखें चाल बापा |
मना कल्पना सोडि संसारतापा || १०५ ||
बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा |
विवेकें मना आवरी स्नानभ्रष्टा |
दया सर्व भूतीं जया मानवाला |
सदा प्रेमळु भक्तिभावें निवाला || १०६ ||
मना कोपआरोपणा ते नसावी |
मना बुधि हे साधुसंगीं वसावी |
मना नष्ट चांडाळ तो संग त्यागीं |
मना होइ रे मोक्षभागीं विभागी || १०७ ||
सदा सर्वदा सज्जनाचेनि योगें |
क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे |
क्रियेवीण वाचाळता ते निवासी |
तुटे वाद संवाद तो हीतकारी || १०८ ||
जनीं वाद वेवाद सोडूनि द्दावा |
जनीं सुखसंवाद सूखें करावा |
जगीं तो चि तो शोकसंतापहारी |
तुटे वाद संवाद तो हीतकारी || १०९ ||
तुटे वाद संवाद त्यातें म्हणावें |
विवेकें अहंभाव यातें जिणावें |
अहंतागुणें वाद नाना विकारी |
तुटे वाद संवाद तो हीतकारी || ११० ||
हिताकारणें बोलणें सत्य आहे |
हिताकारणें सर्व शोधूनि पाहें |
हिताकारणें बंड पाषांड वारी |
तुटे वाद संवाद तो हीतकारी || १११ ||

मनाचे श्लोक मराठी

|| श्री हरि: ||

मनाचे श्लोक मराठी
रामदासस्वामीविरचित

येथासांग रे कर्म तें हि घडेना |
घडे धर्म तें पुण्य गांठी पडेना |
दया पाहतां सर्व भूतीं असेना |
फुकाचे मुखीं नाम तें हि वसेना || १०० ||
जया नावडे नाम त्या येम जाची |
विकल्पें उठे तर्क त्या नर्क ची ची |
म्हणोनी अती आदरें नाम घ्यावें |
मुखें बोलतां दोष जाती स्वभावें || १०१ ||
अती लीनता सर्वभावें स्वभावें |
जना सज्जनालागिं संतोषवावें |
देहे कारणीं सर्व लावाति जावें |
सगूणीं अती आदरेंसी भजावें || १०२ ||
हरीकीर्तनें प्रीति रामीं धरावी |
देहेबुधि निरूपणीं वीसरावी |
परद्रव्य आणीक कांता परावी |
येदर्थी मना सांडि जींवी करावी || १०३ ||

मनाचे श्लोक


|| श्री हरि: ||
मनाचे श्लोक ( मराठी )
श्रीसमर्थ रामदासस्वामीविरचित
अती आदरें सर्व ही नामघोषें |
गिरिकंदरें जाइजे दूरि दोषें |
हरी तिष्ठतु तोषला नामतोषें |
विशेषें हरा मानसीं रामपीसें || ९२ ||
जगीं पाहतां देव हा अन्नदाता |
तया लागली तत्वता सार चिंता |
तयाचें मुखी नाम घेता फुकाचें |
मना सांग पां रे तुझें काय वेचे || ९३ ||
तिन्ही लोक जाळूं शके कोप येतां |
निवाला हरू तो मुखें नाम घेतां |
जपे आदरें पार्वती विश्र्वामाता
म्हणोनी म्हणा तें चि हें नाम आतां || ९४ ||
अजामेळ पापी वदे पुत्रकामें |
तया मुक्ति नारायणाचेनि नामें |
शुकाकारणें कुंटणी राम वाणी |
मुखें बोलतां ख्याती झाली पुराणीं || ९५ || महां भक्त प्रह्लाद हा देत्यकुळीं |
जपे रामनामावळी नित्यकाळीं |
पिता पापरूपी तया देखवेना |
जनीं दैत्य तो नाम मूखें म्हणेना || ९६ ||
मुखी नाम नाहीं तया मुक्ति कैंचि |
अहंतागुणें यातना ते फुकाची |
पुढें अंत येईल तो दैन्यवाणा |
म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा || ९७ ||
हरीनाम नेमस्त पाषाण तारी |
बहू तारिले मानवदेहधारी |
तया रामनामीं सदा जो विकल्पी |
वदेना कदा जीव तो पापरूपी || ९८ ||
जगीं धन्य वाराणसी पुण्यरासी |
तयेमाजि जातां गती पूर्वजांसी |
मूखें रामनामावळी नित्यकाळीं |
जिवा हीत सांगे सदा चंद्रमोळी || ९९ ||

मनाचे श्लोक


|| श्रीहरि ||
मनाचे श्लोक ( मराठी )
श्रीसमर्थरमदासस्वामीविरचित
विठोनें शिरीं वाहिला देवराणा |
तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा |
निवाला स्वयें तापसी चंद्रमौळी |
जिवां सोडवी राम हा अंतकाळी || ८४ ||
भजा राम विश्राम योगेश्वरांचा |
जपू नेमिला नेम गौरीहराचा |
स्वयें नीववी तापसी चंद्रमौळी |
तुम्हा सोडवी राम हा अंतकाळीं || ८५ ||
मुखीं राम विश्राम तेथेंचि आहे |
सदानंद आनंद सेऊनि राहे |
तयावीण तो सीण संदेहकारी |
निजधास हें नाम शोकापहारी || ८६ ||
मुखी राम त्या काम बाधूं शकेना |
गुणें इष्ट धारिष्ट त्याचें चुकेना |
हरीभक्त तो शक्त कामास मारी |
जगीं धन्य तो मारुती ब्रह्मच्यारी || ८७ || बहू चांगलें नाम या राघवाचें |
अती साजिरें स्वल्प सोपें फुकाचें |
करी मूळ निर्मूळ घेतां भवाचें |
जिवां मानवां हें चि कैवल्य साचें || ८८ ||
जनीं भोजनीं नाम वाचे वदावें |
अती आदरें गद्द घोषें म्हणावें |
हरीचिंतनें अन्न जेवित जावें |
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें || ८९ ||
न ये राम वाणी तया थोर हाणी |
जनीं वेर्थ प्राणी तया नाम काणी |
हरीनाम हे वेदशास्त्रीं पुराणीं |
बहू आगळें बोलिली व्यासवाणी || ९० ||
नको वीट मानूं रघूनायेकाचा |
अती आदरें बोलिजे राम वाचा |
न वेचे मुखीं सांपडे रे फुकाचा |
करी घोष त्या जानकीवल्लभाचा || ९१ ||

मनाचे श्लोक

   ॐ
|| श्रीहरि : ||
मनाचे श्लोक ( मराठी )
रामदासस्वामीविरचित
नव्हे कर्म ना धर्म ना योग कांहीं |
नव्हे भोग ना त्याग ना संग पाहीं |
म्हणे दास विश्र्वास नामीं धरावा |
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा || ७६ ||
करी काम नि:काम या राघवाचें |
करी रूप स्वरुप सर्वां जिवाचें |
करीं छेद निर्व्दंव्द हे गूण गातां |
हरीकीर्तनीं वृत्तिविश्र्वास होतां || ७७ ||
अहो ज्या नरा रामविश्र्वास नाहीं |
तया पामरा बाधिजे सर्व कांहीं |
महाराज तो स्वामि कैवल्यदाता |
वृथा वाहणें देहेसंसारचिंता || ७८ ||
मना पावना भावना राघवाची|
धरी अंतरी सोडिं चिंता भावाची |
भावाची जिवा मानवा भूलि ठेली |
नसे वस्तुचि धारणा वेर्थ गेली || ७९ || धरा श्रीवरा त्या हरा अंतरातें |
तरा दुस्तरा त्या परा सागरातें |
सदा वीसरा त्या भरा दुर्भरातें |
करा नीकरा त्या खरा मछरातें || ८० ||
मना मछरें नाम सांडूं नको हो |
अती आदरें हा निजध्यास राहो |
समस्तांमध्ये नाम हें सार आहे |
दुजी तूळणा तूळीतां ही न साहे || ८१ ||
बहू नाम या रामनामीं तुळेना |
अभाग्या नरा पामरा हें काळेंना |
विषा औषध घेतलें पार्वतीशें |
जिवा मानवा किंकरा कोण पूसे || ८२ ||
जेणें जाळिना काम तो राम ध्यातो |
उमेसी अती आदरें गूण गातो |
बहू ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथें |
परी अंतरीं नामाविश्र्वास तेथें || ८३ ||

मनाचे श्लोक मराठी

      ॐ
|| श्रीहरि ||
मनाचे श्लोक (मराठी)
श्रीसमर्थ रामदासस्वामीविरचित
बळें आगळा राम कोदंडधारी |
महां काळ विक्राळ तो ही थरारी |
पुढें मानवा किंकरा कोण केवा |
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा || ६८ ||
सुखानंदकारी निवारी भयातें |
जगीं भक्तिभावें भजावें |
विवेकें तजावा अनाचार हेवा |
प्रभाते मनी राम चिंतीत जावा || ६९ ||
सदा रामनामें वदा पूर्णकामें |
कदा बाधिजेनापदा नित्यनेमें |
मदालस्य हा सर्व सोडूनि द्दावा |
प्रभाते मनी राम चिंतीत जावा || ७० ||
जयाचेनि नामें महा दोष जाती |
जयाचेनि नामें गती पाविजेती |
जयाचेनि नामें घडे पुण्यठेवा |
प्रभाते मनी राम चिंतीत जावा || ७१ || न वेचे कदा ग्रंथिचे अर्थ कांही |
मुखें नाम उच्चारितां कष्ट नाहीं |
महां घोर संसार शत्रु जिणावा |
प्रभाते मनी राम चिंतीत जावा || ७२ ||
देहेदंडणेचें महां दुख आहे |
महां दुख ते नाम घेतां न राहे |
सदाशीव चिंतीतसे देवदेवा |
प्रभाते मनी राम चिंतीत जावा || ७३ ||
बहुतांपरी संकटें साधनाचीं |
व्रतें दान उद्दापने ते धनाचीं |
दिनाचा दयाळू मनीं आठवावा |
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा || ७४ ||
समस्तामधें सार साचार आहे |
कळेना तरी सर्व शोधून पाहें |
जीवा संशयो वाउगा तो तजावा |
प्रभाते मनी राम चिंतीत जावा || ७५ ||

मनाचे श्लोक

    ॐ
|| श्रीहरि ||
मनाचे श्लोक ( मराठी )
श्रीसमर्थ रामदासस्वामीविरचित
मना राम कल्पतरु कामधेनु |
निधी सार चिंतामणी काय वानूं |
जयाचेनि योगें घडे सर्व सत्ता |
तया साम्यता कायसी कोण आतां || ६० ||
उभा कल्पवृक्षातळीं दु:ख वाहे |
तया अंतरी सर्वदा तें चि आहे |
जनीं सज्जनीं वाद हा वाढवावा |
पुढें मागुता शोक जीवीं धरावा || ६१ ||
निजध्यास तो सर्व तूटेनि गेला |
बळें अंतरी शोक संताप ठेला
सुखानंद आनंद भेदें बुडाला |
मनीं निश्र्चयो सर्व खेदें उडाला || ६२ ||
घरीं कामधेनू पुढें ताक मागे |
हरीबोध सांडूनि वेवाद लागे | करीं सार चिंतामणी काचखंडें |
तया मागता देत आहे उदंडें || ६३ ||
अती मूढ त्या दृढ बुधी असेना |
अती काम त्या राम चित्तीं वसेना |
अती लोभ त्या क्षोभ होईल जाणा |
अती विषयी सर्वदा दैन्यवाणा || ६४ ||
नको दैन्यवाणे जिणें भक्तिऊणें |
अती मूर्ख त्या सर्वदा दु:ख दूणें |
धरीं रे मना आदरें प्रीति रामीं |
नको वासना हेमधामीं विरामीं || ६५ ||
नव्हे सार संसार हा घोर आहे |
मना सज्जना सत्य शोधूनि पाहें |
जनीं वीष खातां पुढें सूख कैचें |
करी रे मना ध्यान या राघवाचें || ६६ ||
घनशाम हा राम लावण्यरूपी |
महां धीर गंभीर पूर्णप्रतापी |
करी संकटीं सेवकाचा कुढावा |
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा || ६७ ||

मनाचे श्लोक

     ॐ
|| श्रीहरि ||
मनाचे श्लोक ( मराठी )
रामदासस्वामीविरचित
क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादें |
न लिंपे कदा दंभ वादें विवादें |
करी सूखसंवाद जो ऊगमाचा |
जगीं धन्य तो दासा सर्वोत्तमाचा || ५२ ||
सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकीं |
सदा सर्वदा सत्यवादी विवेकी |
न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा |
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा || ५३ ||
सदा सेवि आरण्य तारुण्यकाळीं |
मिळेना कदा कल्पनेचेनि मेळीं |
चळेना मनीं निश्र्चयो दृढ ज्याचा |
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा || ५४ ||
नसे मानसीं नष्ट आशा दुराशा |
वसें अंतरीं प्रेमपाशा पिपाशा |
ऋणी देव हा भक्तिभावें जयाचा |
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा || ५५ |
दिनाचा दयाळु मनाचा मवाळु |
स्नेहाळु कृपाळु जनीं दासपाळु |
त्या अंतरीं क्रोध संताप कैचा |
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा || ५६ ||
जगीं होईजे धन्य या रामनामें |
क्रिया भक्ति उपासना नित्यनेमें |
उदासीनता तत्वता सार आहे |
सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे || ५७ ||
नको वासना विषईं वृत्तिरूपें |
पदार्थीं जडे कामना पूर्वपापें |
सदा राम नि:काम चिंतीत जावा |
मना कल्पनालेश तो ही नसावा || ५८ ||
मना कल्पना कल्पितां कल्पकोटी |
नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी |
मनीं कामना राम नाहीं जयाला |
अती आदरें प्रीति नाहीं तयाला || ५९ ||

मनाचे श्लोक


|| श्रीहरि ||
मनाचे श्लोक ( मराठी )
श्रीसमर्थ रामदासस्वामीविरचित
मना रे जनीं मौन्यमुद्रा धरावी |
कथा आदरें राघवाची करावी |
नसे राम तें धाम सोडून द्दावें |
सुखालागि आरण्य सेवीत जावें || ४४ ||
जयाचेनि संगे समाधान भंगे |
अहंता अकस्मात येऊनि लागे |
तये संगतीची जनीं कोण गोडी |
जये संगतीनें मती राम सोडी || ४५ ||
मना जे घडी राघवांवीण गेली |
जनीं आपुली ते तुवां हानि केली |
रघूनायेकावीण तो सीण आहे |
जनीं दक्ष लक्ष लाऊनि पाहे || ४६ ||
मनीं लोचनीं श्रीहरी तो चि पाहे |
जनीं जाणता भक्त होऊनि राहे |
गुणीं प्रिती राखे क्रमू साधनाचा |
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा || ४७ ||
सदा देवकाजीं झिजे देह ज्याचा |
सदा रामनामें वदे नित्य वाचा |
स्वधर्में चि चाले सदा उत्तमाचा |
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा || ४८ ||
सदा बोलन्यासारिखें चालताहे |
अनेकीं सदा येक देवासि पाहे |
सगुणिं भजे लेश नाहीं भ्रामाचा |
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा || ४९ ||
नसे अंतरीं कामकारी विकारी |
उदासीन जो तापसी ब्रह्मच्यारी |
निवाला मनीं लेश नाहीं तमाचा |
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा || ५० ||
मदें मछरें सांडिला स्वार्थबुधी |
प्रपंचीक नाहीं जयातें उपाधी |
सदा बोलणें नम्र वाचा सुवाचा |
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा || ५१ ||

मनाचे श्लोक

         ॐ
|| श्री हरि ||
मनाचे श्लोक ( मराठी )
श्रीसमर्थ रामदासस्वामीविरचित
सदा सर्वदा देव सन्नीध आहे |
कृपाळूपणें अल्प धारिष्ट पाहे |
सुखानंद आनंद कैवल्यदानी |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी || ३६ ||
सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा |
उडी घालितो संकटीं स्वामि तैसा
हरीभक्तिचा घाव गाजे निशाणीं |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी || ३७ ||
मना प्रार्थना तुजला एक आहे |
रघूराज थकीत होऊनि पाहे |
अवज्ञा कदा हो येदथीं न कीजे |
मना सज्जना राघवीं वस्ति कीजे || ३८ ||
जया वर्णिता वेद शास्त्रें पुराणें |
जयाचेनि योगें समाधान बाणें |
तायालागि हें सर्व चांचल्य दीजे |
मना सज्जना राघवीं वस्ति कीजे || ३९ ||
मना पाविजे सर्वही सूख जेथें |
अती आदरे ठेविजे लक्ष तेथें |
विवेकें कुडी कल्पना पालटीजे |
मना सज्जना राघवीं वस्ति कीजे || ४० ||
बहू हिंडतां सौख्य होणार नाहीं |
सिणावें परी नातुडे हीत कांहीं |
विचारें बरें अंतरा बोधवीजे |
मना सज्जना राघवीं वस्ति कीजे || ४१ ||
बहुतांपरी हें चि आतां धरावें |
रघूनायका आपुलेंसें करावें |
दिनानाथ हें तोडरीं ब्रीद गाजे |
मना सज्जना राघवीं वस्ति कीजे || ४२ ||
मना सज्जना येक जीवीं धरावी |
जनी आपुलें हीत तूंवां करावी |
राघुनायेकावीण बोलों नको हो |
सदा मानसीं तो निजध्यास राहो || ४३ ||

मनाचे श्लोक

                ॐ
|| श्रीहरि ||
मनाचे श्लोक ( मराठी )
श्रीसमर्थ रामदासस्वामीविरचित
दिनानाथ हा राम कोंदडधारी |
पुढें देखतां काळ पोटीं थरारी |
जना वाक्य नेमस्त हें सत्य मानी |
नुपेक्षी कदा रामादासाभिमानी || २८ ||
पदीं राघवाचें सदा ब्रीद गाजे |
बळें भक्तरीपूशिरीं कांबि वाजे |
पुरी वाइली सर्व जेणें विमानीं |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी || २९ ||
समर्थाचिया सेवका वक्र पाहे |
असा सर्व भूमंडळीं कोण आहे |
जयाची लिळा वर्णिती लोक तिन्ही |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी || ३० || महां संकटीं सोडिले देवा जेणें |
प्रतापें बळें आगळा सर्व गूणें |
जयातें स्मरे शैलजा शूळपाणी |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी || ३१ ||
अहिल्या शिळा राघवें मुक्त केली |
पदीं लागतां दिव्य होउनि गेली |
जया वर्णितां सिणली वेदवाणी |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी || ३२ ||
वसे मेरुमांदार हे सृष्टिलीळा |
शशी सूर्य तारांगणें मेघमाळा |
चिरंजीव केले जनीं दास दोन्ही |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी || ३३ ||
उपेक्षा कदा रामरूपी असेना |
जिवां मानवां निश्र्चये तो वसेना |
शिरीं भार वाहे न बोले पुराणीं |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी || ३४ ||
असे हो जया अंतरी भाव जैसा |
वसे हो तया अंतरीं देव तैसा |
अनन्यास रक्षीतसे चापपाणी |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी || ३५ ||

मनाचे श्लोक

     ॐ
|| श्रीहरि ||
मनाचे श्लोक ( मराठी )
श्रीसमर्थ रामदासविरचित
बहू हिंपुटी होइजे मायपोटीं |
नको रे मना यातना तेचि मोठी |
निरोधें पचे कोंडिलें गर्भवासी |
अधोमूख रे दुख त्या बाळकासी || २० ||
मना वासना चूकवी येरझारा |
मना कामना सांडिं रे द्रव्यदारा |
मना यातना थोर हे गर्भवासीं |
मना सज्जना भेटवीं राघवासी || २१ ||
मना सज्जना हीत माझें करावें |
रघूनायका दृढ चित्तीं धरावें |
महाराज तो स्वामि वायूसुताचा |
जना उध्दरी नाथ लोकत्रयाचा || २२ ||
न बोले मना राघवेंवीण कांहीं |
जनी वाउगें बोलतां सूख नाहीं | घडीनें घडी काळ आयुष्य नेता |
देह्यांतीं तुला कोण सोडूं पहातो || २३ || ॐ
|| श्री हरि ||
मनाचे श्लोक
रघुनायकावीण वायां सिणावें |
जनासारिखे वेर्थ कां वोसणावें |
सदा सर्वदा नाम वाचें वसों दे
अहंता मनीं पापिणी ते नसों दे || २४
मना वीट मानूं नको बोलण्याचा |
पुढें मागुता राम जोडेल कैंचा |
सुखाची घडी लोटतां सूख आहे |
पुढें सर्व जाईल काआहिया न राहे || २५ ||
देहेरक्षणाकारणें येत्न केला |
परी सेवटी काळ घेऊनि गेला |
करी रे मना भक्ति या राघवाची |
पुढे अंतरीं सोडिं चिंता भावाची || २६ ||
भवाच्या भयें काय भितोसि लंडी |
धरी रे मना धीर धाकासि सांडी|
रघूनायका सारिखा स्वामि शीरीं |
नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी || २७ ||

मनाचे श्लोक

                                                 ॐ
|| श्रीहरि ||
श्रिसमर्थ रामदासस्वामीविरचित
मनाचे श्लोक ( मराठी )
मारे येक त्याचा दुजा शोक वाहे |
अकस्मात तोही पुढें जात आहे |
पुरेना जनीं लोभ रे क्षोम त्यातें |
म्हणोनी जनीं मागुता जन्म घेतें || १६ ||
मनीं मानव वेर्थ चिंता वाहातें
अकस्मात होणार होऊनि जातें |
घडे भोगणें सर्वही कर्मयोगें |
मतिमंद तें खेद मानी वियोगें || १७ ||
मना राघवेंवीण आशा नको रे |
मना मानवाची नको कीर्ति तूं रे |
जया वर्णिती वेद शाखें पुराणें |
तया वर्णिती सर्वही श्लाध्यवाणें || १८ ||
मना सर्वथा सत्य सांडूं नको रे |
मना सर्वथा मित्य मांडूं नको रे |
मना सत्य तें सत्य वाचें वदावें
मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्दावें || १९ ||

मनाचे श्लोक

       ॐ
|| श्री हरि ||
मनाचे श्लोक ( मराठी )
श्रीसमर्थ रामदासस्वामीविरचित
मना मानसीं दु:ख आणूं नको रे |
मना सर्वथा शोक चिंता नको रे |
विवेकें देहेबुधि सोडूनि द्दावी |
विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी || १२ ||
मना सांग पां रावणा काय जालें |
अकस्मात तें राज्य सर्वैं बुडालें |
म्हणोनी कुडी वासना सांडि वेगीं |
बळें लागला काळ हा पाठिलागीं || १३ ||
जिवा कर्मयोगें जनीं जन्माजाला |
परी सेवटीं काळमूखीं नामाला |
महां थोर ते मृत्यपंथेंचि गेले |
कितीयेक ते जन्मले आणि मेले || १४ ||
मना पाहतां सत्य हे मृत्यभूमी |
जितां बोलती सर्वही जीव मी मी |
चिरंजीव हे सर्वही मानिताती |
अकस्मात सांडूनियां सर्व जाती || १५ ||

मनाचे श्लोक


|| श्री हरि: ||
मनाचे श्लोक ( मराठी )
देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी |
मना सज्जना हेचि क्रीया धरावी |
मना चंदनाचे परी ता झिजावें|
परी अंतरीं सज्जना नीववावें || ८ ||
नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे |
अति स्वार्थबुधी न रे पाप सांचे |
घडे भोगणें तें कर्म खोटें |
न होतां मनासारिखें दुख मोठें || ९ ||
सदा सर्वदा प्रीति रामीं धरावी |
दुखाची स्वयं सांडि जीवीं करावी |
देहेदुख तें सूख मानीत जावें |
विवेकें सदा सस्वरूपी भरावें || १० ||
जनीं सर्वसूखी असा कोण आहे?
विचारें मना तूचिं शोधूनि पाहें |
मना तां ची रे पूर्वसंचीत केलें |
तयासारिखें भोगणें प्राप्त जालें || ११ ||

ब्लॉग पोस्ट ७०५

ॐ 

ब्लॉग पोस्ट ७०५ वां: दिनांक तारीख १२ जुलै (७ ) २०१२ ला ब्लॉग पोस्ट सातशे पाचवां ७०५ होत आहे. करुणाष्टके,आषाढ एकादशी, आषाढ पौर्णिमा, अन्नपूर्णा स्तोत्र संस्कृत व मराठी भाषांतर लिहिले आहेत. तसेच कडवे वाल उसळ आमटी, रवा याचे लाडू पण लिहिले आहेत. हे सर्व मी स्वत: वाचून लिहिले आहे.पौर्णिमा चा श्र्लोक मी संगणक चा वापर करून तो लिहिला आहे.तसेच रांगोळी ने पण लिहिला आहे. कागद पेन याचा वापर करून लिहिला आहे.एकच श्र्लोक तीन पध्दती ने लिहिला आहे. हे मुद्दाम मुध्दाम सांगावेसे लिहावेसे वाटत आहे. आत्ता पर्यंतच्या भेटी – ५८,५७४.

आपण सर्वांनी वसुधालय ब्लॉग पोस्ट वाचून प्रतिक्रिया दिल्यात भेटी दिल्यात 
त्या बध्दल बद्दल धन्यवाद ! धंयवाद !

संगणक मराठी मध्ये कांही दिवस वर्ष ह्यांनी 
अन्नपूर्णा स्तोत्र ! सार्थ श्रीरामरक्षा ! श्रीविष्णुसहस्त्रनामस्तोत्रम् !
व मी कांही अजुन स्त्रोत्रम् लिहिली आहेत त्याचीं पुस्तक संगणक 
मध्ये मराठी मध्ये होतील ! असे मला वाटतं ! बघू !

रवा खोबर याचे लाडू

रवा नारळ ( खोबर ) याचे लाडू :

एक बाऊल रवा घेतला. अर्धा बाऊल साखर घेतली. एक नारळ घेतले.मूठभर बदाम घेतले. साजूक तूप डेचक (भांड) घेतले. थोडे पाणी घेतले.जायफळ थोडे घेतले. प्रथम नारळ विळी बसून दोन्हीं हाताने ताटात खोवून खोऊन घेतले.

प्रथम रवा नुसता भाजला. तुपा बरोबर भाजला जात नाही.फुलतो. फसफसतो. रवा छान तांबूस भाजून घेतला. त्यात खोवलेले खोबर घातले.परत रवा खोबर भाजून घेतले.खोबर ओल असल्यामुळे वाफ आली.छान परत रवा भोबर.

नंतर सादूल तूप रवा व खोबर भाजलेल्या मध्ये घातले. परत एकसारखे रवा खोबर सादूक तूप एकत्र केले.पातेले गॅस बंद करून खाली ठेवले.

पातेल्यावर झाकण ठेवले रवा सर्व भाजलेले छान वास उडू नये म्हणून झाकण ठेवले.तो पर्यंत बदाम जायफळ मिस्कर मधून बारीक केले.दुसऱ्या पातेल्यात साखर घेतली.घातली.साखर भिजेपर्यंत पाणी घातले. गॅस पेटवून साखर व पाणी पातेले ठेवले.साखर पाणी उकळू दिले.पाक एक तारी केला.पाक रवा वर टाकून गोळा झाला का? पाहिला.

सर्व साखरेचा पाक रवा खोबर तूप बदाम जायफळ हे सर्व भाजलेले एकत्र केलेले ह्यावर साखरेचा पाक घातला. थोडा दबू दिला. सर्व एकत्र झालेले रवा लाडूचे मिश्रण याचे लहान मोठे लाडू वळले. लाडू तयार केले.मस्त रवा ओल खोबर तूप बदाम पावडर
जायफळ याचे भाजून लाडू तयार झाले.केले.

पूर्वी आह्मी पुण्यात दिवाळीत जात असू.सर्वांचे लाडू एकत्र  केले (आत्या सासूबाई आक्का यांनी) फराळाचे आलेले लाडवांचा व नंबर लावला. त्यांनी पुण्याचा लाडवाला १ पहिला नंबर तिला.माझ्या लाडवाला दुसरा नंबर दिला.मी त्यावेळा पांढरे लाडू दिसावे
म्हणून कमी भाजले होते.आतां सवय झाली.

अन्नपूरणा स्तोत्र पूर्ण लिहून झाले.वाटले गोड कांही करावे व रवा ओंल खोबर साखर तूप भाजून बदाम पावडर जायफळ याचे लाडू

चांगले मस्त झालेत!

DSCF2678 DSCF2679

अन्नपूर्णास्तोत्रम्

                                     ॐ
अन्नपूर्णास्तोत्रम् |
श्रीमच्छंकराचार्यविरचितम्
अन्नपूर्णे सदापूर्णे शड.करप्राणवल्लभे |शंकरप्राणवल्लभे |
ज्ञानवैराग्यासिध्दयर्थं भिक्षां देहि च पार्वती || १४ ||
भाषांतर – हे आई अन्नपूर्णे नेहमी पूर्ण रूप,शड.काराला (शंकराला )
प्राणांहूनही प्रिय असलेली ज्ञान आणि वैराग्याच्या प्राप्तीसाठी हे पार्वती
मला भिक्षा दे. || १४ ||
माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वर : |
भान्धवा: शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम् || १५ ||
भाषांतर – माझी आई पार्वती देवी, वदिल शंकर, नातेवाईक
शिवभक्त आणि माझा देश तिन्ही भुवने आहे. || १५ ||
इति श्रीमच्छंकराचार्यविरचितमन्नपूर्णास्तोत्रम् सम्पूर्णम् |

अन्नपूर्णास्तोत्रम्

                                             ॐ

                                   अन्नपूर्णास्तोत्रम् |
श्रीमच्छंकराचार्यविरचितम्
माहेश्वरीमाश्रितकल्पवल्लीमहंभवोच्छेदकरीं भवानीम् |
क्षुधार्तजायातनयाद्दुपेतसत्वामन्नपूर्णे शरणं प्रपद्दे || १२ ||
भाषांतर – हे आई अन्नपूर्णे महेश्वराची (शंकराची ) पत्नी असलेल्या ,
आश्रितांची कल्पवेल असलेल्या,अहंभाव नाहीसा करणाऱ्या, तुला पार्वतीला ,
बायको, मुलगा इत्यादीसहित भुकेलेले आम्ही शरण आलो आहोत. || १२ ||
दारिद्र्यदावानलदह्यमानं पाह्यन्नपूर्णे गिरिराजकन्ये |
कृपाम्बुधौ मज्जय मां त्वदीये तवत्पादपद्मार्पितचित्तवृत्तिम् || १३ ||
भाषांतर – हे आई अन्नपूर्णे दारिद्र्यरुपी वनव्यात भाजत असलेल्या माझे,
हे हिमालयाच्या कन्ये, तू रक्षण कर. मला तूझ्या कृपासागरात बुडव. मी
माझी चित्तवृत्ती तूझ्या चरणकमलावर अर्पण केली आहे.|| १३ ||

अन्नपूर्णास्तोत्रम्

                            ॐ
                 अन्नपूर्णास्तोत्रम् |
श्रीमच्छंकराचार्यविरचितम्
भगवति भवरोगात् पीडितं दुष्कृतोत्यात्
सुतदुहितृकलत्रोपद्रवेणानुयातम् |
विलसदमृतदृष्ट्या वीक्ष्य विभ्रान्तचित्तम्
सकलभुवनमातस्त्राहि माम् ॐ नमस्ते || ११ ||
भाषातंर – हे ऐश्वर्ययुक्त देवी संसाररूपी रोगाने पीडलेल्या माझे,
दुष्कर्म केल्यामुळे निर्मार्ण झालेल्यापासून, मुलगा, मुलगी, बायको
ह्यांच्या उपद्रवामुळे उव्दिग झालेल्या माझे, अमृतमयी आणि प्रसन्नतेने
शोभणाऱ्या दृष्टीने पाहून गोंधळून गेलेल्या माझे, हे सर्व जगाच्या आई रक्षण कर.
हे ॐ कार रुपी आई तुला नमस्कार असो. || ११ ||

अन्नपूर्णास्तोत्रम्

                                ॐ
                       अन्नपूर्णास्तोत्रम् |
श्रीमच्छंकराचार्यविरचितम्
क्षत्रत्राणकरी महा S भयकरी माता कृपासागरी
साक्षान्मोक्षकरी सदाशिवकरी विश्वेश्वरी श्रीधरी |
दक्षाक्रंदकरी निरामयकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलंबनकरी मातान्नपूर्णेश्वरी || १० ||
भाषांतर – हे आई अन्नपूर्णे क्षत्रियांचे रक्षण करणारी, मोथे अभय
करणारी,हे माता, कृपेचा समुद्र असलेली,प्रत्यक्ष मोक्ष देणारी, नित्य
कल्याण करणारी,विश्वेश्वरी पत्नी, सौंदर्य धारण करणारी,प्रजापतीला
आक्रोश करायला लावणारी,रोग दूर करणारी,काशी नगरीची अधीष्ठात्री देवता,
कृपेचा आधार असलेली, अन्न पुरविणारी मला भिक्षा दे. || १० ||

अन्नपूर्णास्तोत्रम्


अन्नपूर्णास्तोत्रम् |
श्रीमच्छंकराचार्यविरचितम्
चन्द्रार्कानलकोटिकोटिसदृशा चन्द्रांशुबिम्बाधरी
चन्द्रार्काग्निसमानकुंतलधरी चन्द्रार्कवर्णेश्वरी |
मालापुस्तकपाशसांकुशधरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलंबनकरी मातान्नपूर्णेश्वरी || ९ ||
भाषांतर – हे आई अन्नपूर्णे कोटी कोटी चंद्र, सूर्य व अग्नि यांच्या
समान तुझे तेज आहे,तुझे ओठ चंद्रबिंबाप्रमाणे शीतल आहेत,चंद्र
सूर्य आणि अग्नी यासारखे तुझे केस आहेत,चन्द्र आणि सूर्य यांच्या
प्रमाणे तुझा वर्ण आहे,तू एका हातात माळ एका हातात पुस्तक,एका
हातात पाषा व एका हातात अंकुश धारण केला आहेस,काशी नागरीची
अधिष्ठारी देवता, कृपेचा आधार असलेली, अन्न पुरविणारी
मला भिक्षा दे. || ९ ||

अन्नपूर्णास्तोत्रम्


अन्नपूर्णास्तोत्रम् |
श्रीमच्छंकराचार्यविरचितम्
देवी सर्वविचित्ररत्नरचिता दाक्षायणी सुन्दरी
वामा स्वादुपयोधराप्रियकरी सौभाग्यमाहेश्वरी |
भक्ताभीष्टकरी दशाशुभहरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलंनकरी मातान्नपूर्णेश्वरी || ८ ||
भाषांतर – हे आई अन्नपूर्णे देवी, सर्व प्रकारच्या विविध रत्नांनी
सुशोभित,दक्ष प्रजापतीची मुलगी, सौन्दर्यवती, आकर्षक, मधुर स्तनपान
देऊन प्रिय करणारी, सौभाग्यशाली सप्तमातांपैकी दुसरी माता,(माहेश्वरी ),
भक्तांच्या इच्छा पुऱ्या करणारी, दहा प्रकारची अशुभे नाहीशी करणारी काशी
नगरीची अधीष्ठात्री, देवता कृपेचा आधार असलेली,अन्न पुरविणारी
मला भिक्षा दे.|| ८ ||

अन्नपूर्णास्तोत्रम्

अन्नपूर्णास्तोत्रम् |
श्रीमच्छंकराचार्यविरचितम्
आदिक्षान्तसमस्तवर्णनकरी शंभोस्त्रिभावाकरी
काश्मिरात्रीपुरेश्वरी त्रिनयनी नित्यांकुरा शर्वरी |
कामाकांक्षकरी जनोदयकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलंबनकरी मातान्नपूर्णेश्वरी || ७ ||
भाषांतर – हे आई अन्नपूर्णे अ पासून क्ष पर्यंत सर्व वर्णांचे
वर्णन करणारी,शंभुच्या तीन भावनांची खाण, काश्मीरी, तीन
पुरांची अधीष्ठात्री देवता, तीन डोळे असलेली,नित्य अंकुर असलेली,
रात्री, इच्छा आणि आकांक्षा पुरी करणारी, लोकांचा उत्कर्ष करणारी,
काशी नगरीची अधीष्ठात्री देवता,कृपेचा आधार असलेली,अन्न पुरविणारी
मला भिक्षा दे. || ७ ||

अन्नपूर्णास्तोत्रम्

अन्नपूर्णास्तोत्रम् |
श्रीमच्छंकराचार्यविरचितम्
उर्वी सर्वजनेश्वरी भगवती मातान्नपूश्वरी
वेणीनीलसमानकुंतलहरी नित्यान्नदानेश्वरी |
सर्वानंदकरी सदाशुभकरी काशिपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलंबकरी मातान्नपूर्णेश्वरी || ६ ||
भाषांतर – हे आई अन्नपूर्णे तू मोठी आहेस,सर्व लोकांची
तू ईश्वरी आहेस, तू सर्व प्रकारच्या ऐश्वर्याने युक्त आहेस,
पूर्णान्न देणारी तू माता आहेस,तुझी वेणी गडद काळ्या समान
केसांच्या लहरिंनी शोभाय मान आहे, तू नित्य अन्नदान करणारी आहेस,
सर्वांना सतत आनंद देणारी आहेस,तू नेहमी शुभ करणारी आहेस,काशी नगरीची
अधिष्ठात्री देवता, कृपेचा आधार असलेली अन्न पुरविणारी, मला भिक्षा दे. || ६ ||

अन्नपूर्णास्तोत्रम्

अन्नपूर्णास्तोत्रम् |
श्रीमच्छंकराचार्यविरचितम्
दृश्यादृश्यप्रभूतवाहनकरी ब्रह्माण्डभाण्डोदरी
लीलानाटकसूत्रभेदनकरी विज्ञानदीपाड.कु री |
श्रीविश्वेशमन: प्रसादनकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपुर्णेश्वरी || ५ ||
भाषांतर – हे आई अन्नपूर्णे तू दृश्य आणि अदृश्य अशा
सगळ्यांचा चरितार्थ चालविणारी आहेस.तुझ्या पोटात हे त्रैलोक्य
सामावलेलं आहे,तू संसाररूपी नाटकाचा सहजतेने नाश करणारी आहेस,
तू विज्ञानाच्या दिव्याला प्रज्वलीत करणारी आहेस, तू श्रीविश्वनाथाचे मन
प्रसन्न करणारी आहेस, काशी नगरीची अधीष्ठात्री देवता,कृपेचा आधार
असलेली,अन्न पुरविणारी, मला भिक्षा दे. || ५ ||

अन्नपूर्णास्तोत्रम्

                                       ॐ
                           अन्नपूर्णास्तोत्रम्
श्रीमच्छंकराचार्यविरचितम्
कैलासाचलकन्दरालयकरी गौरी उमाशड्.करी
कौमारी निगमार्थगोचरकरी ॐ कारबिजाक्षरी |
मोक्षव्दारकपाटपाटनकरी काशिपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी || ४ ||
भाषांतर – हे आई अन्नपूर्णे कैलास पर्वताच्या
गुहेतच तू आपले घर मानले आहेस, तू गौरी, उमा,
पार्वती, कौमारी (कुमाराची आई ) वेदाचा अर्थ सोपा
करणारी, ॐकार मन्त्राचे अद्दाक्षर असलेली, मोक्षाचा
दरवाजा उघडा करणारी, काशी नगरीची अधिष्ठात्री देवता,
कृपेचा आधार असलेली, अन्न पुरविणारी, मला भिक्षा दे.|| ४ ||

अन्नपूर्णास्तोत्रम्

                                  ॐ
अन्नपूर्णास्तोत्रम्
श्रीमच्छंकराचार्यविरचितम्
योगानन्दकरी रिपुक्षयकरी धर्मार्थनिष्ठाकरी
चन्द्रार्कानल भासमानलहरी त्रैलोक्यरक्षाकरी |
सर्वैश्वर्यसमस्तवांछितकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलंबनकरी मातान्नपूर्णेश्वरी || ३ ||
भाषांतर – हे आई अन्नपूर्णे तू योग्यांना आनंद देणारी,
शत्रुंचा नाश करणारी, धर्म आणि अर्थ यात स्थैर्य देणारी,
चन्द्र, सूर्य आणि अग्नी यांच्या तेजाप्रमाने देदीप्यमान,
तिन्ही लोकांचे रक्षण करणारी, सर्व प्रकारचे ऐश्वर्य आणि
सर्व इच्छा पुरी करणारी, काशी नगरीची अधीष्ठात्री देवता,
कृपेचा आधार असलेली,अन्न पुरविणारी, मला भिक्षा दे. || ३ ||

अन्नपूर्णास्तोत्रम्

                                        ॐ
अन्नपूर्णा स्तोत्रम् |
नानारत्नाविचित्रभूषणकरी हेमांबराडंबरी
मुक्ताहारविलम्बमानविलसव्दक्षोजकुंभांतरी |
काश्मीरागुरुवासिता रुचिकरा काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलंबकरी मातान्नपूर्णेश्वरी || २ ||
भाषांतर – हे आई अन्नपूर्णे तू अनेक रत्नांचे आश्चर्यकारक
दागिने धारण करणारी,सोनेरी आकर्षक वस्त्रे धारण करणारी,
जिच्या कुंभासारख्या स्तनांवर लोंबत असणारा मोत्यांचा हार
शोभून दिसत आहे,काश्मीरी चंदनाने सुगंधित असलेली रुचिकर,
काशी नगरीची अधिष्टात्री देवता, कृपेचा आधार असलेली, अन्न
पुरविनारी, मला भिक्षा दे. || २ ||

अन्नपूर्णास्तोत्रम्

                                                      ॐ
अन्नपूर्णास्तोत्रम् |
श्रीमच्छंकराचार्यविरचितम्
श्रीगणेशाय नम: |
नित्यानन्दकरी वरा S भयकरी सौन्दर्यरत्नाकरी
निर्धूताखिलघोरपावनकरी प्रत्यक्षमाहेश्वरी |
प्रालेयाचलवंशपावनकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलंबनकरी मातान्नपूर्णेश्वरी || 1 ||
भाषांतर – हे आई अन्नपूर्णे तू नेहमी आनंद देणारी,
श्रेष्ठ अभय देणारी,सौंदर्याचा सागर असलेली,सर्व भय
नष्ट करून पावन करणारी,प्रत्यक्ष सप्त मातांपैकी दुसरी
माता (माहेश्वरी ), हिमालयाच्या वंशाला पावन करणारी,
काशी नगरीची अधिष्टात्री देवता, कृपेचा आधार असलेली,
अन्न पुरविणारी, मला भिक्षा दे. || १ ||
श्लोक १ ला सप्तमाता १ ब्राह्मी २ माहेश्वरी ३ कौमारी

४ वैष्णवी ५ वाराही ६ इन्द्राणी ७ चामुण्डा.

हि नावे अन्नपूर्णा ची सात आहेत.

करुणाष्टके (मराठी)

|| श्रीहरि ||

श्रीसमर्थ रामदासस्वामीविरचित

करुणाष्टके (मराठी)

६ : बुध्दि दे रघुनायका

युक्ति नाहीं बुध्दि नाहीं विद्दा नाहीं विवंचिता | नेणता भक्त मीं तुझा बुध्दि दे रघुनायका || १ ||
मन हे आवरेना कीं वासना वावरे सदा | कल्पना धावतें सैरा बुद्धि दे रघुनायका || २ ||
अन्न नाहीं वस्त्र नाहीं सौख्य नाहीं जनांमध्ये | आश्रयो पाहतां नाहीं बुध्दि दे रघुनायका || ३ ||
बोलतां चालतां येना कार्यभाग कळेचिना बहु मी पीडिलों लोकीं बुध्दि दे रघुनायका || ४ ||
तुझा मीं टोणपा झालों कष्टलों बहुतांपरी | सौख्य तें पाहतां नाहीं बुध्दि दे रघुनायका || ५ ||
नेटकें लिहितां येना वाचितां चुकतों सदा | अर्थ तो सांगतां येना बुध्दि दे रघुनायका || ६ ||
प्रसंग वेळ तर्केना सुचेना दीर्घसूचना | मैत्रिकी राखितां येना बुध्दि दे रघुनायका || ७ ||
कळेना स्फूर्ति होईना आपदा लागली बहु | प्रत्यहीं पोट सोडीना बुध्दि दे रघुनायका || ८ ||
संसार नेटका नाहीं उव्देगू वाटतो जिवीं | परमार्थु कळेना कीं बुद्धी दे रघुनायका || ९ ||
देईना पुर्विना कोणी उगेचि जन हासती | विसरू पडतो पोटीं बुध्दि दे रघुनायका || १० ||
पिशुनें वाटतीं सर्वे कोणीही मजला नसे | समर्था तूं दयासिंधु बुध्दि दे रघुनायका || ११ ||
उदास वाटतें जीवीं आतां जावें कुणीकडे | तूं भक्तवत्सला रामा बुध्दि दे रघुनायका || १२ ||
काया -वाचा – मनोभावें मीं म्हणवीतसें | हे लाज तुजला माझी बुध्दि दे रघुनायका || १३ ||
सोडवील्या देवकोटी भूभार फेडिता बळें | आश्रयो मोठा बुध्दि दे रघुनायका || १४ ||
उदंड भक्त तुम्हाला आम्हांला कोण पुसतें | ब्रीद हे राखणें आधीं बुध्दि दे रघुनायका || १५ ||
उदंड ऐकिली कीर्ति पतितपावना प्रभो | मी एक रंक दुर्बुध्दि बुध्दि दे रघुनायका || १६ ||
आशा हे लागली मोठी दयाळू बा दया करीं | आणिक नलगे कांही बुद्धि दे रघुनायका || १७ ||
रामदास म्हणे माझा संसार तुज लागला | संशयो पोटीं बुद्धि दे रघुनायका || १८ ||

_______________________________

करुणाष्टके

                                            ॐ
                                        || श्रीहरि ||
                               श्री रामदासस्वामीविरचित
                                   करुणाष्टके ( मराठी )
५ : दीन हातीं धरावें
नसे भक्ति ना ज्ञान ना ध्यान कांहीं |नसे प्रेम हें रामाविश्राम नाहीं ||
असा दीन अज्ञान मीं दास तुझा | समर्था जनीं घेतला भार माझा || १ ||
रघूनायका जन्मजन्मांतरीचा | अहंभाव छेदूनि टाकीं दिनाचा |
जनीं बोलती दास या राघवाचा | परी लेश नाहीं तयाचा || २ ||
रघूनायका दीन हातीं धरावें | अहंभाव छेदूनियां उद्धारावें ||
अगूणी तयालागिं गुणी करावें | समर्थ भवसागरी उतरावें || ३ ||
किती भार घालू रघूनायका | मजकारणें शीण होईल त्याला |
दिनानाथ हा संकटी धांव घाली | तयाचेनि हे सर्व काया निवाली || ४ ||
मज कोंवसा राम कैवल्यदाता | तयाचेनि हे फिटली सर्व चिंता |
समर्था तया काय उत्तीर्ण व्हावें | सदा -सर्वदा नाम वाचे वदावे || ५ ||
दिनाचें उणें दिसतां लाज कोणा | जनीं दास तूझा दिसे दैन्यवाणा ||
स्वामि तूं राम पूर्णप्रतापी | तुझा दास पाहे सदा शीघ्रकोपी || ६ ||

करुणाष्टके

                                               ॐ

|| श्री हरि ||
श्रीसमर्थ रामदासस्वामीविरचित
करुणाष्टके (मराठी)
४ : मागणें हेंचि आतां
उदासीन हे वृत्ति जिवीं धरावी | अती आदरें सर्व सेवा करावी ||
सदा प्रीति लागो तुझे गूण गातां | रघूनायका मागणें हेचिं आतां || १ ||
तुझें रुपडें लोचनीं म्यां पहावें | तुझे गूण गातां मनासी रमावें ||
उठो आवडी भक्तिपंथेची जातां | रघूनायका मागणें हेंचि आतां || २ ||
मनीं वासना भक्ति तुझी करावी | कृपाळूपणें राघवें पुरवावी ||
वसावें मज अंतरीं नाम घेतां | रघूनायका मागणें हेंचि आतां || ३ ||
योग तुझा घडावा | तुझे कारणीं देह माझा पडावा ||
नुपेक्षीं मज गुणवंता अनंता | रघूनायका मागणें हेंचि आतां || ४ ||
नको द्रव्य – दारा नको येर – झारा | नको मानसीं ज्ञानगर्वें फुगारा ||
सगुणीं मज लाविं रे भक्तिपंथा | रघूनायका मागणें हेंचि आतां || ५ ||
भवें व्यापलों प्रीतिछाया करावी | कृपासागरें सर्व चिंता हरावी ||
मज संकटीं सोडवावें समर्था | रघूनायका मागणें हेंचि आतां || ६ ||
मनीं कामना कल्पना ते नसावी | कुबुद्धी कुडी वासना निरसावी ||
नको संशयो तोडिं संसारवेथा | रघूनायका मागणें हेंचि आतां || 7 ||
समर्थापुढें काय मागों कळेना | दुराशा मनी बैसली हे ढळेना ||
पुढें संशयो नीरसीं सर्व चिंता | रघूनायका मागणें हेंचि आता || ८ ||
ब्रिदाकारणें दीन हातीं धरावें | म्हणे दास भक्तांसि रे उद्धारावें |
सुटो ब्रीद आम्हांसि सांडूनि जातां | रघूनायका मागणें हेचिं आतां || ९ ||

आषाढ पौर्णिमा


स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
दक्षिणायन ग्रीष्मऋतु नक्षत्र मूळ राशिप्रवेश धनु मंगळवार
आषाढ शुक्लपक्ष १५ व्यासपूजा, गुरुपौर्णिमा, आषाढ पौर्णिमा आहे .
तसेच दिनांक तारीख ३ जुलै (७)२०१२ साल ला गुरुपौर्णिमा आषाढ पौर्णिमा
व्यासपूजा आहे.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुदेर्वो महेश्र्वर: |
गुरु: साक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम: ||

DSCF2670 DSCF2671DSCF2671

करुणाष्टकें


|| श्रीहरि ||
श्रीसमर्थ रामदासस्वामीविरचित
करुणाष्टकें
३ : तुजवीण रामा मज कंठवेना
तुझिया वियोगें जीवित्व आलें | शरीरपांगे बहु दु:ख झालें |
अज्ञान दारिद्र माझें सरेना | तुजवीण रामा मज कंठवेना || १ ||
परतंत्र जीणें कंठू किती रे | उच्चाट माझे मनीं वाटतो रे |
ललाटरेषा जपीं पालटेना | तुजवीण रामा मज कंठवेना || २ ||
जडली उपाधी अभिमान साधी | विवेक नाहीं बहुसाल बाधी |
स्वामिवियोगें पळही गमेना | तुजवीण रामा मज कंठवेना || ३ ||
विश्रांति देहीं अणुमात्र नाहीं | कुळाभिमानें पडीलों प्रवाहीं |
स्वहीत माझें होतां दिसेना | तुजवीण रामा मज कंठवेना || ४ ||
विषयी जनानें मज लाजविलें | प्रपंच आयुष्य गेलें |
समयीं बहुक्रोध शांति घडेना | तुजवीण रामा मज कंठवेना || ५ ||
सदृढ झाली देहेबुद्धी देहीं | वैराग्य कांहीं होणार नाहीं |
अपूर्ण कामीं मन हे विटेना | तुजवीण रामा कंठवेना || ६ ||
निरुपणिं हे सद्वृत्ति होते | स्थळत्याग होतां सवेंचि जाते ||
काये करुं रे क्रिया घडेना | तुजवीण रामा मज कंठवेना || ७ ||
संसारसंगे बहु पीडलों रे | कारुण्यसिंधु मज सोडवीं रे ||
कृपाकटाक्षें सांभाळी दीना | तुजवीण रामा मज कंठवेना || ८ ||
जय जी दयाळा त्रैलोक्यपाळा | भवसिंधु हा रे मज तारिं हेळा |
धारिष्ट माझें हृदयीं वसेना | तुजवीण रामा मज कंठवेना || ९ ||
आम्हां अनाथा तूं एक दाता | संसारवेथा चुकवी समर्था |
दासां मनीं आठव विसावेना | तुजवीण रामा मज कंठवेना || १० ||

%d bloggers like this: