आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 1, 2012

श्रावण पौर्णिमा

                               ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
श्रावण शुक्लपक्ष बुधवार १४ नारळी पौर्णिमा आहे.
तसेच १ ऑगस्ट २०१२ साल आहे.
त्या निमीत्त मी नारळ साखर तांदूळ तूप व इतर एकत्र करून नारळ याचा
नारळीभात केला आहे.
पाऊण बाऊल आंबेमोहर बारीक तांदूळ घेतले एक नारळ फोडून विळी वर बसून खोवून
खोऊन घेतले.पाऊण बाऊल साखर घेतली.लवंग ४/५ घेतल्या.सादुक तूप अर्धी वाटी घेतले.
बदाम थोडे घेतले.चारोळी,केशर रंग,जायफळ असे थोडे घेतले.
तांदूळ भांड्यात काढून धुतले.कुकर च्या ठेवण्याच्या भांड्यात तूप व लवंग गरम केले.
धुतलेले तांदूळ तूप व लवंग ह्यात घातले.थोडे परतले कुकर मध्ये पाणी घातले.
गॅस पेटवून कुकर ठेवला.कुकर च्या पाण्यात तांदूळ तूप लवंग हे पातेले ठेवले त्यात
दोन बाऊल पाणी गरम घातले.भात तांदूळ नेहमी सारखे चार शिट्या देऊन शिजवून घेतले
घेतला.कुकर गार झाल्या नंतर दुसरे पातेले गॅस पेटवून ठेवले.त्यात पण सादुक तूप ,लवंग ,
खोवलेले खोबर नारळ घातले.सर्व एकत्र केले.त्यात शिजलेले भात घातला.रंग ,जायफळ ,केशर ,
बदाम,चारोळी व साखर घातली.सर्व एकत्र हलवून वाफ आणली.साखर खोबर नारळ ओल असल्यामुळे
व भात पण ओला असल्यामुळे पाणी घालण्याची गरज नाही.छान वाफ आणली.परत चांगली वाफ आणली.
मस्त साखर भातात विरघळून नारळ,साखर,तांदूळ,तूप,लवंग,जायफळ,रंग व केशर यांचा एकत्र नारळा चा
नारळीभात गोड हवा तेवढा केला. झाला.मी नारळीभात केला आहे.जास्त गोड हव असल्यास साखर थोडी वाढवावी.
पण जास्त फार गोड झाल्यास जास्त भात जात नाही.म्हणून जेवढे तांदूळ तेवढीच साखर पुरते.

                        DSCF2705

                                      DSCF2709

मनाचे श्लोक

       || श्रीहरि: ||
श्रीसमर्थ रामदासस्वामीविरचित

मनाचे श्लोक ( मराठी )
नव्हें तें चि जालें नसे तें चि आलें |
कळों लागलें सज्जनाचेनि बोलें |
अनुर्वाच्य तें वाच्य वाचे वदावें |
मना संत आनंत शोधीत जावें || १८४ ||
लपावें अती आदरें रामरूपीं |
भयातीत निश्र्चीत ये सस्वरूपीं |
कदा तो जनीं पाहतां ही दिसेना |
सदा ऐक्य तो भिन्न भावें वसेना || १८५ ||
सदा सर्वदा राम सन्नीध आहे |
मना सज्जना सत्य शोधून पाहें |
अखंडीत बेटी रघूराज योगु |
मना सांडि रे मीपणाचा वियोगु || १८६ ||
भुतें पिंड ब्रह्मांड हें ऐक्य आहे |
परी सर्व ही सस्वरूपीं न साहे |
मना भासलें सर्व कांहीं पहावें |
परी संग सोडूनि सूखी रहावें || १८७ ||
देहेभान हें ज्ञानशस्त्रें ख्रुडावें |
विदेहीपणें भक्तिमागें चि जावें |
विरक्तीबळें निंद्द सर्वै तजावें |
परी संग सोडूनि सूखें रहावें || १८८ ||
मही निर्मिली देव तो वोळखावा |
जया पाहतां मोक्ष तत्काळ जीवा |
तया निर्गुणालागि गूणीं पहावें |
परी संग सोडूनि सूखें रहावें || १८९ ||
नव्हे कार्यकर्ता नव्हे सृष्टिभर्ता |
परेहूनि पर्ता न लिंपे विवर्ता |
तया निर्विकल्पासि कल्पीत जावें |
परी संग सोडूनि सूखें रहावें || १९० ||
देहेबुधिचा निश्र्चयो ज्या टळेना |
तया ज्ञान कल्पांतकाळीं कळेना |
परब्रह्म तें मीपणें आकळेना |
मनीं शून्य अज्ञान हें मावळेना || १९१ ||

%d bloggers like this: